मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे पुरावे सादर करण्याचे आवाहन

जिल्ह्यातील मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे पुरावे असलेल्या नागरिकांनी दि. 21 ते 24 नोव्हेंबर या कालावधीत जिल्हाधिकारी कार्यालयातील मराठा आरक्षण विशेष कक्षामध्ये सादर करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे. यवतमाळ जिल्ह्यात मराठा समाजास मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र निर्गमित करण्याच्या दृष्ट‍िने विविध विभागाकडून अभिलेख तपासणी करण्यात येत आहे. मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र पात्र व्यक्तींना देण्याबाबतची कार्यपध्दती विहित करण्यासाठी निवृत्त न्या. संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आलेली आहे. या समितीचे विभागनिहाय दौरे आयोजित करण्यात आले आहे. त्यानुषंगाने जिल्ह्यातील नागरिकांनी त्यांच्याकडील उपलब्ध असलेले पुरावे, वंशावळी, शैक्षणिक व महसूली पुरावे, संस्थानिकांनी दिलेल्या सनदा, राष्ट्रीय दस्तावेज इत्यादी जुनी अभिलेखे, सन 1967 पूर्वीची व नंतरचे पुरावे, कागदपत्रे दि. 21 ते 24 नोव्हेंबर या कालावधीत कार्यालयीन वेळत महसूल मिटींग हॉल, दुसरा मजला जिल्हाधिकारी कार्यालय, यवतमाळ येथे स्थापित मराठा आरक्षण विशेष कक्षामध्ये सादर करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी