तेलंगणा विधानसभा निवडणूक : जिल्ह्याच्या पाच किमी सीमाक्षेत्रात मद्यविक्रीस बंदी

भारत निवडणूक आयोगाद्वारे तेलंगणा राज्यात सार्वजनिक विधानसभा निवडणूक जाहीर केली आहे. या निवडणूक क्षेत्रात मतदान दि. 30 नोव्हेंबर रोजी व मतमोजणीची प्रक्रिया 3 डिसेंबर रोजी पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार तेलंगणा राज्याच्या सीमेपासून यवतमाळ जिल्ह्यातील पाच किमी क्षेत्रातील दि. 28 नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजेपासून ते 30 नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत व मतमोजणीच्या दिवशी प्रक्रिया संपेपर्यंत सर्व किरकोळ मद्यविक्रीच्या अनुज्ञप्त्या बंद राहतील, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी काढले आहे. जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी यापूर्वी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दि. 28 नोव्हेंबर रोजी सांयकाळी 6 वाजेपासून ते 30 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत बंदी आदेश काढले होते. यात अंशत: बदल करुन शुध्दीपत्रक काढण्यात आले आहे. महाराष्ट्र देशी दारू नियम, महाराष्ट्र विदेशी मद्य विक्री नियमाप्रमाणे तसेच भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी हे आदेश दिले आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी