जिल्हा कुष्ठरोग मुक्तीसाठी जनतेने सहकार्य करावे - डॉ. मैनाक घोष

Ø जिल्ह्यात 20 नोव्हेंबरपासून कुष्ठरोग व क्षयरोग शोध मोहीम : Ø जिल्हा समन्वय समितीची सभा संपन्न : Ø आशा स्वयंसेविका घरोघरी भेटी देवून करणार तपासणी : जिल्ह्यात कुष्ठरोग व सक्रिय क्षयरोग शोध मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेदरम्यान घरोघरी येणाऱ्या पथकाकडून जनतेने कुटुंबातील सदस्यांची तपासणी करुन जिल्हा कुष्ठरोगमुक्त करण्यास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी केले.
जिल्हा परिषद कार्यालयात डॉ. घोष यांच्या अध्यक्षतेखाली या मोहिमेअंतर्गत जिल्हा समन्वय समितीची सभा घेण्यात आली. या सभेला जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. सुखदेब राठोड, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. ठोंबरे, डॉ. सागर जाधव जिल्हा क्षयरोग अधिकारी, वैद्यकिय अधिकारी डॉ. गजानन खारोडे, उपशिक्षण अधिकारी श्रीधर कन्नाके, सावित्री ज्योतिबा फुले समाज कार्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिर्के, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. प्रिती दुधे आदी उपस्थित होते. या सभेत डॉ. मैनाक घोष यांनी जिल्ह्यात कुष्ठरोग व क्षयरोग शोध मोहीम दिलेल्या मार्गदर्शक सुचनेनुसार राबविण्यात यावी. जिल्हा कुष्ठरोगमुक्त करण्याच्या दृष्टीने प्रत्येक आरोग्य कर्मचारी व आशा स्वयसेविकांमार्फत कुष्ठरोग व क्षयरोग शोध मोहीम सर्वेक्षण करुन कुष्ठरुग्ण शोधण्याचे उद्दिष्ट पूर्ण करावे. तसेच जिल्हा कुष्ठरोग मुक्त होण्यास सहकार्य करावे. या मोहिमेदरम्यान प्रत्येक शाळेमध्ये विद्यार्थ्याची कुष्ठरोग व क्षयरोग आजारबाबत तपासणी करावी, असे आवाहन त्यांनी केले. जिल्ह्यात दि. 20 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर दरम्यान कुष्ठरोग व सक्रिय क्षयरोग शोध मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत आशा स्वयंसेविका व पुरुष स्वयंसेवक जिल्ह्यातील सर्व लोकांच्या घरोघरी भेटी देवून कुष्ठरोगाबाबत माहिती आणि प्रत्यक्ष तपासणी करणार आहेत.या मोहिमेअंतर्गत सर्वेक्षण करण्यात येणार आहे. जिल्ह्याची एकूण लोकसंख्या 26 लाख 31 हजार 997 ऐवढी असून 5 लाख 65 हजार 131 घरे आहेत. घरोघरी सर्वेक्षणासाठी 2 हजार 575 आशा व स्वयंसेवकांचे पथक काम करणार असून या पथकात 509 पर्यवेक्षकांची नेमणुक करण्यात आली आहे. या सभेकरीता सहाय्यक संचालक (कुष्ठरोग) डॉ. गोपाळ पाटील यांनी जिल्ह्यात अभियान राबविण्यासाठी केलेल्या नियोजनाबाबत माहीती दिली

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी