साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या योजनांचा लाभ घ्या ३० नोव्हेंबरला अमरावतीमध्ये मेळाव्याचे आयोजन

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने महामंडळामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहिती, प्रचार व प्रसारासाठी अमरावती येथे मेळाव्याचे आयोजन करण्यात ऑर आहे. हा मेळावा दि. ३० नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता डॉ. बाबासोहब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, समाज कल्याण कार्यालय अमरावती येथे होणार आहे. महामंडळामार्फत मांग, मातंग, मिनीमादींग, मादीग, दानखणी मांग, मांग महाशी, मदारी, राधेमांग, मांग गारुडी, मादगी व मादिगा या जातीतील समाज बांधवांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. या योजनांचा समाज बांधवांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ जिल्हा कार्यालय अमरावती व यवतमाळ तसेच प्रादेशिक कार्यालय अमरावती यांच्या वतीने होत असून या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक मनिष सांगळे, अध्यक्षस्थानी बार्टीचे महासंचालक सुनिल वारे, महामंडळाचे महाव्यवस्थापक अनिल मस्के आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. समाज बांधवांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रादेशिक व जिल्हा व्यवस्थापकांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी