जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची सभा संपन्न

जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची सभा प्रभारी जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी दि.२४ नोव्हेंबर रोजी महसूल भवनात पार पडली. या सभेला परिषदेचे सचिव जिल्हा पुरवठा अधिकारी सुधाकर पवार, शासकीय व अशासकीय सदस्य यांच्या उपस्थितीत अत्यंत प्रभावीपणे प्रत्येक प्रश्नाचे व समस्याचे सुसंवाद व समन्वयातून निराकरण करण्याच्या उद्देशाने सविस्तर चर्चा करीत ही सभा संपन्न झाली. अशासकीय सदस्यांनी मांडलेल्या समस्या व प्रश्नांना शासकीय सदस्यांनी समर्पक उत्तरे देऊन कार्यवाहीचे आश्वासन दिले व पुढील बैठकीमध्ये त्याचप्रमाणे लोकशाही दिनामध्ये राहिलेल्या अप्राप्त अहवाल व नियमानुसार केलेल्या कार्यवाहीचा अहवाल सादर करण्याचे आदेश प्रभारी जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे यांनी संबंधित विभागप्रमुखांना दिले. त्याचप्रमाणे प्रत्येक शासकीय सदस्यांनी या सभेला येतांना संबंधित विषयाची संपूर्ण माहिती घेऊनच उपस्थित राहण्याचे सांगितले. ज्या विभागाचे प्रमुख या सभेला अनुपस्थित होते त्यांना कारणे दाखवा नोटीस देऊन पुढील सभेला प्रत्यक्ष बोलवण्यात यावे, असे सांगितले. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी हे नियत वयोमानानुसार येत्या ३० तारखेला सेवानिवृत्त होत असून त्यांचा अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्यावतीने ग्राहक संरक्षण कायदा २०१९ व स्वामी विवेकानंदांचे पुस्तक जिल्हा सचिव प्रा.के.बी. चटुले व संघटनमंत्री हितेश सेठ यांच्या हस्ते भेट देऊन त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. सभेला उपस्थित शासकीय व अशासकीय सदस्यांचे सचिव जिल्हा पुरवठा अधिकारी सुधाकर पवार यांनी आभार मानले.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी