जिल्ह्यातील 80 शाळांना दिले जाणार आपत्ती व्यवस्थापनाचे धडे

उमरखेडच्या विवेकानंद इंग्लिश मीडियम स्कूलमधून सुरुवात
जिल्ह्यात विविध आपत्तीच्या काळात अधिकचे प्रशिक्षित मनुष्यबळ तयार करण्याच्या उद्देशाने जिल्हाधिकारी यवतमाळ डॉ.पंकज आशिया यांचे संकल्पनेतून जिल्ह्यातील 80 शाळांमध्ये आपत्ती व्यवस्थापन धोके कार्यक्रमांतर्गत स्कूल सेफ्टी प्रशिक्षण दिले जाणार आहे. जिल्ह्याचे शासकीय व खाजगी शाळा महाविद्यालयामध्ये मानवनिर्मित व नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या परिस्थितीमध्ये जीवितहानी व वित्तहानी टाळण्याच्या अनुषंगाने शाळांमधील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांना शोध व बचत प्रथमोपचार याबाबत आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण व जनजागृती केल्यास भविष्यात त्याचा जिल्ह्यात विविध आपत्तीच्या काळात अधिकचे प्रशिक्षित मनुष्यबळ तयार होईल व त्यांचा आपत्तीच्या प्रसंगी उपयोग होईल.
या प्रशिक्षणात शाळांचे मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक शिक्षक,विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचारी यांना शालेय सुरक्षा व आपत्ती व्यवस्थापन याबाबत पूर्वतयारी व उपायोजना, शालेय सुरक्षा आराखडा, प्रथमोपचार कृत्रिम श्वसन (CPR) कसे द्यावें, दोर व विविध गाठी बांधणे, बँडेज बांधणे, आणीबाणीच्या काळात उचल पद्धती राबविणे, स्ट्रेचरचे विविध प्रकार, त्यांची हाताळणी कशी करावी इत्यादी बाबत प्रशिक्षण दिले जाणार आहे सदर प्रशिक्षण कार्यक्रम हा जिल्ह्यात सर्व तालुक्यात 1 नोव्हेंबर ते 9 डिसेंबर2023 पर्यंत राबविल्या जाणार असून हे प्रशिक्षण शासनाचे आपत्ती व्यवस्थापन विभाग यांच्याकडून नियुक्त मास्टर ट्रेनर हरिश्चंद्र राठोड यांचे द्वारे दिले जाणार आहे .या कार्यक्रमाची सुरुवात ही बुधवारी उमरखेड तालुक्यातील विवेकानंद इंग्लिश मीडियम स्कूल या शाळेत प्रशिक्षण देऊन करण्यात आली आहे. 000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी