भरडधान्य खरेदीसाठी जिल्ह्यात पाच खरेदी केंद्र सुरु

Ø शेतकरी नोंदणीसाठी मोबाईल ॲप खरीप पणन हंगामांतर्गत राज्यात किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत ज्वारी, मका, बाजरी व रागी या भरडधान्य खरेदीसाठी जिल्ह्यातील महागाव, पांढरकवडा, झरी, पुसद, आर्णी या पाच तालुक्यात खरेदी केंद्र सुरु करण्यात आले आहे. शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी खरेदी केंद्रावर 1 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर 2023 पर्यंत सुरु आहे. यात तालुका खरेदी विक्री समिती महागांव, तालुका खरेदी विक्री समिती पांढरकवडा, झरी तालुक्यात बळीराजा फळे फुले भाजीपाला कृषी उत्पादन पणन व प्रक्रिया सहकारी संस्था पाटण, पुसद तालुक्यात किसान मार्केट यार्ड शेलु (बु), पुसद, आर्णी तालुक्यात शेतकरी कृषी खाजगी बाजार दत्तरामपुर, आर्णी या केंद्रांचा समावेश आहे. शेतकऱ्यांनी नोंदणी करतांना या हंगामापासून ज्यांचा सातबारा आहे. त्याच शेतकऱ्यांचा प्रत्यक्ष लाईव्ह फोटो अपलोड करणे आवश्यक आहे. त्याशिवाय नोंदणी पूर्ण होणार नाही. शेतकरी नोंदणी मोबाईल ॲपव्दारे होत असून लाईव्ह फोटो देखील या ॲपव्दारे अपलोड करता येणार आहे. ज्या शेतकऱ्यांना शेतमालाची विक्री करावयाची आहे. त्याच शेतकऱ्यांने लाईव्ह फोटो अपलोड करण्यासाठी मोबाईल ॲपचा वापर करुन नोंदणी करावी. ज्या शेतकऱ्यांना शेतमालाची विक्री करावयाची आहे. त्या शेतकऱ्यांनी नोंदणीसाठी आपल्या तालुक्यातील खरेदी केंद्रावर स्वत: हजर राहुन किंवा स्वत: मोबाईल ॲपव्दारे लाईव्ह फोटो अपलोड करावा. ज्वारी, मका, बाजरी व रागी हे भरडधान्य खरेदीसाठी शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी 30 नोव्हेंबरपर्यंत करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी भरडधान्य नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हा पणन अधिकारी अर्चना माळवे यांनी आवाहन केले आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी