जिल्हास्तरीय युवा महोत्सव 3 डिसेंबरला

युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि त्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी दरवर्षी क्रीडा विभागामार्फत युवा महोत्सावाचे आयोजन करण्यात येते. यंदाचा जिल्हास्तरीय युवा महोत्सव येथील अमोलकचंद महाविद्यालय येथे 3 डिसेंबर रोजी आयोजित करण्यात येणार आहे. या युवा महोत्सवासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड हे देखील उपस्थित राहणार आहेत. संयुक्त राष्ट्र संघाने आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष घोषित केलेले असल्याने यावर्षी युवा महोत्सवात तृणधान्य उत्पन्न वाढीसाठी विज्ञानाचा वापर, सामाजिक विकासात विज्ञानाचे योगदान ही संकल्पना दिलेली आहे. या संकल्पनेवर आधारित क्रीडा विभाग व कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने 15 ते 29 वर्ष वयोगटातील युवक व युवतींसाठी जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. या जिल्हास्तरीय युवा महोत्सवात सांस्कृतिक कला, कौशल्य विकासावर आधारित स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या विविध स्पर्धांमध्ये जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये, कृषी विद्यापीठ, युवक मंडळे, संगीत विद्यालय, स्वयंसेवी संस्थेतील युवा कलाकारांनी जास्तीत जास्त संख्येने प्रवेश नोंदवून महोत्सवात सहभाग घ्यावा. इच्छुक कलाकारांनी 30 नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत नावासह प्रवेश यादी, मोबाईल नंबर, संस्थेचे नाव व प्रत्येकाच्या जन्मतारखेचा दाखला व रहिवासी पुराव्यासह जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, यवतमाळ येथे आपला प्रवेश नोंदवावा. या महोत्सवात सांस्कृतिक कलेवर आधारित समूह लोकनृत्य, वैयक्तिक लोकनृत्य, समूह व वैयक्तिक लोकगीत, सोलो लोकगीत या स्पर्धा होणार आहेत. स्पर्धकांनी वाद्यवृंद व साहित्य सोबत आणणे आवश्यक आहे. लोकगित व लोकनृत्य सादर करणाऱ्या कलाकारांना पूर्वध्वनी मुद्रीत टेप अथवा रेकॉर्डींगवर कार्यक्रम सादर करता येणार नाही, लोकगीत व लोकनृत्य चित्रपटबाह्य असावे. साथसंगत सोबत असणे आवश्यक आहे. तसेच कौशल्य विकासावर आधारित कथा लेखन, फोटोग्राफी, पोस्टर स्पर्धा, इंग्रजी व हिंदी भाषेतील वक्तृत्व स्पर्धा होणार आहे. संकल्पनावर आधारित स्पर्धेत तृणधान्य उत्पन्न वाढीसाठी विज्ञानाचा वापर, सामाजिक विकासात विज्ञानाचे योगदान या विषयावर होणार आहेत. युवा कृतीमध्ये हस्तकला, वस्त्रोद्योग, अॅग्रो प्रोडक्ट या विषयावर स्पर्धा होणार आहेत. सर्व कलाकारांचे वय 15 ते 29 वर्ष वयोगटातील असावे. या महोत्सवात प्रथम क्रमांकाच्या स्पर्धकांना विभागीय महोत्सवासाठी प्रवेश देण्यात येईल. युवा महोत्सवाविषयी अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी संजय पांडे यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी