जिल्ह्यात विकसित भारत संकल्प यात्रा राबविण्यात येणार यात्रेच्या यशस्वीतेसाठी समन्वयाने नियोजन करा -प्र जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे

यवतमाळ, दि. 23 (जिमाका) : केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनांची माहिती आणि त्याचा लाभ लाभार्थ्यांपर्यंत पोहचवण्यासाठी जिल्ह्यात ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ 26 जानेवारीपर्यंत राबविण्यात येणार आहे. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी समन्वयाने नियोजन करावे, अशा सूचना प्र. जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. या यात्रेच्या अनुषंगाने प्र. जिल्हाधिकारी श्री.दुबे यांनी महसूल भवनात आढावा सभा घेतली. या सभेला निवासी उपजिल्हाधिकारी प्रकाश राऊत, जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी जालिंदर आभाळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुखदेव राठोड, जिल्हा आयोग्य अधिकारी डॉ. पी. एस. चव्हाण, उप मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत थोरात, कृषी उपसंचालक टी.एस.चव्हाण, जिल्हा पुरवठा अधिकारी सुधाकर पवार, डीटीओ डॉ. सागर जाधव, महावितरणचे उप कार्यकारी अभियंता हेमंत केवटे, माहिती अधिकारी पवन राठोड, जिल्हा परिषदेचे विअआ प्रशांत पाटील उपस्थित होते. तर सर्व तालुक्यातील गटविकास अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, आरोग्य अधिकारी दुरदृश्य प्रणालीव्दारे उपस्थित होते. यावेळी प्रभारी जिल्हाधिकारी श्री.दुबे यांनी जिल्ह्यात विकसित भारत संकल्प यात्रा यशस्वी करण्यासाठी समन्वयाने नियोजन करावे. केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी योजनांची माहिती आणि त्याचा लाभ लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी सर्व यंत्रणांनी जवाबदारीने काम करावे. योजनांची माहिती देणाऱ्या व्हॅन उपलब्ध आहेत. या व्हॅनचा मार्ग (रूट मॅप) तयार करावा. तालुका आणि ग्रामस्तरावर समन्वय समित्या नेमाव्यात. या विकसित भारत संकल्प यात्रेचा शुभारंभ स्थानिक लोकप्रतिनिधींच्या हस्ते करावा. या यात्रेत लोकसहभाग वाढवावा आणि त्यांना योजनांची माहिती आणि लाभ मिळवून द्यावा, आदी सूचना त्यांनी संबंधितांना दिल्या. 0000000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी