प्रधानमंत्री कुसुम योजनेंतर्गत शेतकऱ्यांनी अर्जातील त्रुटी पूर्ण करण्याचे आवाहन

Ø महाऊर्जाच्या कुसुम पोर्टलवर 13 हजार 500 अर्ज प्राप्त ; Ø 1 हजार 849 लाभार्थी शेतकऱ्यांनी सौर पंप योजनेचा लाभ : महाकृषी ऊर्जा अभियानाच्या प्रधानमंत्री कुसुम या योजनेंतर्गत महाऊर्जाच्या कुसुम पोर्टलवर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे एकूण 13 हजार 500 अर्ज प्राप्त झाले आहे. या अंतर्गत पडताळणी करण्याकरिता प्राप्त अर्जापैकी 1 हजार 973 अर्जामध्ये त्रुटी आढळून आल्या आहेत. अर्जदार शेतकऱ्यांना अर्जातील त्रुटी पूर्ण करण्याचे आवाहन महाऊर्जातर्फे करण्यात आले आहे. आतापर्यंत 1 हजार 849 लाभार्थी शेतकऱ्यांनी सौरकृषी पंप योजनेचा लाभ घेतलेला आहे. तसेच एकूण 13 हजार 500 लाभार्थी शेतकऱ्यांपैकी 1 हजार 973 लाभार्थी शेतकऱ्यांच्या अर्जामध्ये कागदपत्रांची त्रुटी आढळलेली असल्यामुळे त्यांचे अर्ज प्रलंबित त्रुटीयुक्त यादीमध्ये आहेत. या सर्व लाभार्थ्यांना कुसुम पोर्टलवरुन त्यांच्या भ्रमणध्वनीवर एसएमएस पाठविण्यात येतात. तसेच महाऊर्जाच्या जिल्हा कार्यालयाकडून सर्व लाभार्थ्यांना कागदपत्रांची त्रुटी पूर्ण करण्याकरिता भ्रमणध्वनीव्दारे कळविण्यात आलेले आहे, तरी सुध्दा अद्यापपर्यंत लाभार्थ्यांकडून त्रुटींची पुर्तता करण्यात आलेली नाही. या अनुषंगाने सर्व त्रुटीयुक्त अर्ज असलेल्या लाभार्थी शेतकऱ्यांनी ज्या वेबसाइटवरुन या योजनेसाठी अर्ज केलेला आहे, त्याच वेबसाइटच्या माध्यमातून त्रुटी पूर्तता करण्यात यावी. महाऊर्जाच्या जिल्हा कार्यालय येथे कार्यालयीन 07232-241150 क्रमांकावर संपर्क करुन आपल्या अर्जामध्ये असलेल्या कागदपत्रांच्या त्रुटींबाबत विचारणा करावी व प्राप्त मार्गदर्शनानुसार त्रुटींची पूर्तता करुन घ्यावी, असे आवाहन महाऊर्जातर्फे करण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी