Posts

Showing posts from December, 2022
Image
आश्रम शाळेतील प्रत्येक विद्यार्थी उच्च शिक्षित व्हावा - जिल्हाधिकारी अमोल येडगे उच्च शिक्षण आणि करियर यावर आदिवासी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन* यवतमाळ,दि १४, जिमाका :- उच्च शिक्षणात आदिवासी विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात गळती असून केंद्रीय विद्यापीठे आणि देशातील टॉप विद्यापीठांमध्ये आदिवासींच्या जागा रिक्त राहतात. आश्रम शाळेतून बाहेर पडणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याने उच्च शिक्षण घेतले पाहिजे. यासाठी एकलव्य सोबतचा हा उपक्रम खूप महत्वाचा आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, जिल्हा प्रशासन आणि एकलव्य संस्था यवतमाळ यांच्या सहकार्याने जिल्ह्यातील शासकीय आणि अनुदानित अशा एकूण २६ आश्रम शाळांमध्ये ११ वी आणि १२ वी च्या विद्यार्थ्यांसोबत उच्च शिक्षण आणि करियर मार्गदर्शन कार्यशाळेचे उद्घाटन चिचघाट उच्च माध्यमिक आश्रम शाळेत जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी श्री येडगे बोलत होते. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पांढरकवडाच्या प्रकल्प अधिकारी याशनी नागराजन, प्रशांत चव्हाण उपस्थित होते. आ
ज्वारी, मका, बाजरी खरेदी ऑनलाईन नोंदणीकरिता १५ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ* यवतमाळ, दि. १२ डिसेंबर (जिमाका):- आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत राज्य शासनामार्फत ज्वारी,मका व बाजरी खरेदीसाठी शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी करण्याकरिता महाराष्ट्र स्टेट को. ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन लिमिटेडमार्फत ५ खरेदी केंद्र उघडण्यात आलेले आहे. महागांव तालूक्यात तालुका खरेदी विक्री समिती, महागांव, पांढरकवडा तालुक्यात तालुका खरेदी विक्री समिती, पांढरकवडा, झरी तालुक्यात बळीराजा फळे फुले भाजीपाला कृषी उत्पादन पणन व प्रक्रिया सहकारी संस्था पाटण, पुसद तालुक्यात किसान मार्केट यार्ड शेलु (बु), पुसद, आर्णी तालुक्यात शेतकरी कृषी खाजगी बाजार दत्तरामपुर, आर्णी यांचा समावेश आहे. या हंगामापासुन ज्या शेतकऱ्यांचा ७/१२ आहे त्याच शेतकऱ्यांचा प्रत्यक्ष लाईव्ह फोटो अपलोड करणे आवश्यक आहे. त्याशिवाय नोंदणी पुर्ण होणार नाही. त्यामुळे शेतमालाची विक्री करावयाची आहे त्याच शेतकऱ्याने लाईव्ह फोटो अपलोड करण्यासाठी स्वत: खरेदी केंद्रावर उपस्थित राहणे आवश्यक आहे. तशा सूचना ७ डिसेंबर २०२२ रोजी शासनाकडून प्राप्त झालेल्या आहे. खरेदीची अ
सुशिक्षित बेरोजगारांनी रोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा यवतमाळ,दि.१२ डिसेंबर(जिमाका):- जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्यामार्फत ऑनलाईनरोजगार मेळाव्याचे आयोजन १४ डिसेंबर, 2022 पर्यंत करण्यात आलेले आहे. सदर मेळाव्याकरिता जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांना rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने विविध पदासाठी शैक्षणिक पात्रतेनुसार पसंतीक्रम देत सहभागी व्हावे, असे आवाहन सहाय्यक आयुक्त विद्या शितोडे यांनी केले आहे. स्थानिक पातळीवर तसेच इतर ठिकाणी औद्योगिक संस्थांकडुन मनुष्यबळाची मागणी नोंदविण्यात आलेली आहे. मागणीला अनुसरून जिल्ह्यातील तसेच इतर ठिकाणाच्या कंपनीशी संपर्क साधून मुथूट फायनान्स यवतमाळ,नव किसान बायोप्लँटेक लि. नागपूर व परम स्किल ट्रेनिंग प्रा. लि. औरंगाबाद, अभिनव ईन्स्टिटयुट ऑफ टेक्नॉलॉजी ॲण्ड मॅनेजमेंट ठाणे, अपोले होम हेल्थ केयर लि. मुंबई या कंपनी मार्फत एकूण 645 रिक्त पदाकरिता ऑनलाइन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. सदर मेळाव्यामध्ये किमान 12 वी.परीक्षा उत्तीर्ण, अभियांत्रिकी पदविका, अभियांत

जिल्ह्यात महाराष्ट्रातील पहिला दिव्यांग सहाय्य डिजिटल कक्ष सुरु -पालकमंत्री संजय राठोड दिव्यांग उन्नती पोर्टलचा शुभारंभ विविध मार्गदर्शन पुस्तिका व घडिपत्रिकेचे प्रकाशन दिव्यांगांना जि.प. ५ टक्के सेस निधीतुन विविध वस्तुंचे वितरण 'स्वच्छ जल से सुरक्षा' अभियानाचा आणि अमृत आवास अभियानांतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळेचा शुभारंभ

यवतमाळ,दि 3 डिसेंबर, जिमाका:- राज्य शासनाने दिव्यांगांसाठी स्वतंत्र मंत्रालयाची आजच मुहूर्तमेढ रोवली आहे. भविष्यकाळात दिव्यांगांसाठी वेगवेगळ्या योजनांची निर्मिती करून त्या माध्यमातून दिव्यांगांना सामान्यांच्या बरोबरीने आणण्याचा प्रयत्न राज्य शासनाचा राहणार आहे. दिव्यांगाच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध असून जिल्ह्यातही त्याची पूर्णपणे अंमलबजावणी होणार आहे. त्याचा प्रारंभ आज जिल्ह्यात महाराष्ट्रातील पहिल्या दिव्यांग सहाय्य डिजिटल कक्षाचे उद्घाटन करून झाला, असे प्रतिपादन अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी केले. जागतिक दिव्यांग दिनानिमित्त महाराष्ट्रातिल पहिल्या डिजिटल दिव्यांग सहाय्य कक्षाचे लोकार्पण तसेच दिव्यांग उन्नती पोर्टलचे उद्घाटन, विविध विभागांच्या योजनांचे लाभ वाटप आज जिल्हा परिषद सभागृह येथे करण्यात आले. यावेळी पालकमंत्री संजय राठोड बोलत होते. या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, पोलिस अधिक्षक पवनकुमार बनसोड, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विनय ठमके, चितंगराव कदम तसेच सर्व विभागप्

५५१ रुग्णांवर मोतिबिंदूची यशस्वी शस्त्रक्रिया पालकमंत्री संजय राठोड पूर्णपणे अंध झालेल्या ६२ रुग्णांना मिळाली नवी दृष्टी

यवतमाळ, दि:१ डिसेंबर, पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाने आनंदवन येथे शस्त्रक्रिया करण्यासाठी येत असल्याचे माहीत होताच त्यांना विनंती करून यवतमाळ जिल्ह्यातील रुग्णांची शस्त्रक्रिया करण्याची विनंती केली. समाजाच्या तळागाळातील अगदी गरिब व्यक्तीची त्यांनी अशा शिबिरातुन शस्त्रक्रिया केली आहे. आपल्या जिल्ह्यातील ५५१ लोकांचे शस्त्रक्रिया त्यांनी पूर्ण केल्या. या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणुन कायम त्यांच्या ऋणात राहील, असे प्रतिपादन पालकमंत्री संजय राठोड यांनी केले. स्व. वसंतराव नाईक वैद्यकिय महविद्यालयात मोतिबिंदु शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराच्या समारोपप्रसंगी झालेल्या रुणांशी संवाद साधतांना ते बोलत होते. यावेळी पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने, डॉ रागिणी पारेख, जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, डॉ. सुरेंद्र भुयार व त्यांची चमू तसेच अधिष्ठाता मिलिंद फुल पाटिल उपस्थित होते. पुढे बोलताना श्री राठोड म्हणाले, नेत्र शस्त्रक्रियेचा हा पहिला टप्पा आज संपन्न झाला आहे. जिल्ह्यातील एकूण ३००० रुग्णांच्या शस्त्रक्रिया करणार आहे. डॉक्टर ल

निवृत्त माजी सैनिकांनी सामाजिक बदल घडविण्यासाठी काम करावे पालकमंत्री संजय राठोड सैनिकांच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध बी एस एफ चा ५७ वा स्थापना दिवस संपन्न

यवतमाळ ,दि १ सैन्यातून निवृत्त झालेले जवान निवृत्तीनंतर शांत बसू शकत नाही त्यांना सतत कार्यरत असण्याची सवय असते त्यामुळे निवृत्त सैनिकांनी सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात योगदान द्यावे समाजाच्या हितासाठी पुढे येऊन काम करावे असे आवाहन अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी केले. सीमा सुरक्षा दलाचा ५७ वा वर्धापनाचा कार्यक्रम ईश्वर नगर येथे सीमा सुरक्षा दल निवृत्त अधिकारी वेलफेअर असोसिएशनतर्फे आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून पालकमंत्री बोलत होते. बीएसएफच्या ध्वजाचे ध्वजारोहण तसेच फलकाचे अनावरण यावेळी करण्यात आले. या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ, पोलीस अधीक्षक पवन कुमार बनसोड, नगरसेवक प्राध्यापक प्रवीण प्रजापती, शिक्षणाधिकारी श्री सूर्यवंशी उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना पालकमंत्री म्हणाले, बी एस एफ हे भारताचे एक प्रमुख निमलष्करी दल आहे. जगातील सर्वात मोठे सीमा सुरक्षा दल म्हणुन या दलाची ओळख आहे. बी एस एफ च्या १९२ बटालियन सुमारे साडेसहा हजार लांबीच्या आंतरराष्ट्रीय सीमेचे रक्ष