Posts

Showing posts from March, 2020

नागरिक मदत कक्षाच्या माध्यमातून प्रशासनाच्या विविध उपाययोजना

Image
             v बाहेरून आलेल्यांना स्वत:हून माहिती देण्याचा मॅसेज v अडकलेल्यांसाठी भोजन व राहण्याची व्यवस्था यवतमाळ, दि. 30 : संपूर्ण राज्यात तसेच जिल्ह्यात संचारबंदी लागू असल्यामुळे अनेक जण अडकून पडले आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील नागरिक इतर ठिकाणी तर इतर ठिकाणचे नागरिक यवतमाळ जिल्ह्यात आहेत. त्यामुळे त्यांच्या राहण्या व खाण्यासंदर्भात जिल्हा प्रशासनाच्या पुढाकाराने सामाजिक संघटनांच्या माध्यमातून अशा लोकांसाठी उपाययोजना करण्यात येत आहे. तसेच बाहेर देशातून किंवा इतर राज्यातून किंवा दुस-या जिल्ह्यातून यवतमाळ जिल्ह्यात आलेल्या नागरिकांना येथील यंत्रणेस स्वत:हून माहिती देण्याचा मॅसेज राष्ट्रीय सुचना व माहिती केंद्राच्या माध्यमातून पाठविण्यात येत आहे. जेणेकरून अशा लोकांमुळे इतरांना संसर्ग होणार नाही व प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून त्यांच्यावर निगराणी ठेवता येईल. जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांच्या सुचनेवरून जिल्हास्तरावर व तालुकास्तरावर नागरिक मदत कक्ष तयार करण्यात आला आहे. 50 लोकांची चमू यासाठी कार्यरत असून सरासरी दिवसाला 300 कॉल या माध्यमातून प्रशासकीय यंत्रणेला येतात. त्यातूनच सर्

पालकमंत्र्यांनी केली शिवभोजन थाळी केंद्राची पाहणी

Image
                v शहरातील व रुग्णालयातील गरजू लोकांनी लाभ घेण्याचे आवाहन यवतमाळ, दि. 30 : संचारबंदीच्या काळात शहरातील नागरिकांची तसेच रुग्णालयातील रुग्णांच्या नातेवाईकांची गैरसोय होऊ नये म्हणून राज्य शासनाने पाच रुपयात शिवभोजन थाळी उपलब्ध करून दिली आहे. या अनुषंगाने राज्याचे वने, भुकंप पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी स्व. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील शिवभोजन थाळी केंद्राची पाहणी केली. यावेळी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. आर.एन.सिंग, डॉ. मिलिंद कांबळे, केंद्राचे संचालक विकास क्षीरसागर आदी उपस्थित होते. कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभुमीवर संपूर्ण लॉकडाऊन करण्यात आले आहे. शिवाय संचारबंदीसुध्दा लागू करण्यात आली आहे. याचा फटका रुग्णालयातील रुग्णांच्या नातेवाईकांसह शहरातील इतर गरजू नागरिकांना बसत आहे. त्यामुळे शासनाने पाच रुपयात शिवभोजन थाळी उपलब्ध करून दिली आहे. शासनाकडून रोज 200 थाळी देण्यात येते. मात्र तरीसुध्दा ज्यांची काहीच सोय होत नसेल त्या सर्वांचा जेवणाचा खर्च पालकमंत्र्यांच्या मार्गदर्शनात असलेल्या माँ आरोग्य सेवा

एप्रिलफूलच्या निमित्ताने कोरोनासंदर्भात अफवा पसरवू नका

Image
               v गंभीर कारवाई करण्याचे जिल्हाधिका-यांचे आदेश v विलगीकरण कक्षात तीन तर गृह विलगीकरण असणा-यांची संख्या 93 यवतमाळ, दि. 30 : कोरोना विषाणू संसर्गाच्या निमित्ताने जिल्ह्यात आरोग्यविषयक आपात्कालीन परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच साथरोग नियंत्रण कायदा 1897, आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 आणि संचारबंदी लागू असून कलम 144 ची अंमलबजावणी करण्यात येत आहे. उद्यापासून सुरू होणा-या एप्रिल महिन्याच्या अनुषंगाने एकमेकांना एप्रिल फूल बनविण्याची व अफवा पसरविणा-यांची नागरिकांमध्ये चढाओढ दिसून येते. मात्र सद्यस्थितीत कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभुमीवर सोशल मिडीयातून किंवा इतरही माध्यमातून अफवा पसरविणा-यांवर गंभीर कारवाई करण्यात येईल, असे आदेश जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी दिले आहे. कोरोनासंदर्भात सोशल मिडीयातून अफवा पसरविणा-यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. यात कोणाचीही हयगय सहन केली जाणार नाही. नागरिकांनी याबाबत जबाबदारीने वागावे. अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल, असेही जिल्हाधिका-यांनी सांगितले आहे. बाहेर राज्यातून आलेल्या व्यक्तिंनी स्वत:हून यंत्रणेला

कोरोना : वैद्यकीय महाविद्यालयात 500 खाटांच्या सुसज्ज रुग्णालयाचे नियोजन - पालकमंत्री संजय राठोड

Image
            v नागरिकांनी शासनाच्या आदेशाचे तंतोतंत पालन करण्याचे आवाहन यवतमाळ, दि. 29 : जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्ग असलेल्या तीन पॉझेटिव्ह नागरिकांचे नमुने निगेटिव्ह आले. जिल्ह्यासाठी दिलासा देणारी ही बाब असून जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभाग अभिनंदनास पात्र आहे. मात्र असे असले तरी कोरोनाचा धोका पूर्णपणे टळला नाही. त्यामुळे या आव्हानाचा सामना करण्यासाठी वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अतिरिक्त 500 खाटांचे सुसज्ज रुग्णालय उभारण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे वने, भुकंप पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी केले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रुग्णालयाच्या पुर्वतयारीनिमित्त आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी एम.डी. सिंह, डॉ. मिलिंद कांबळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, डॉ. बाबा येलके, सा.बा. विभागाचे अधिक्षक अभियंता धनंजय चामलवार, कार्यकारी अभियंता चंद्रकांत मरपल्लीकर आदी उपस्थित होते. सध्या येथील वैद्यकीय महाविद्यालयात 765 नियमित खाटा आहेत, असे सांगून श्री. राठोड म्हणाले, कोरोनाच्या पार्श्वभुमीवर येथील जुन

पॉझेटिव्ह असलेल्या 'त्या' नागरिकांचे उर्वरीत नमुने निगेटिव्ह

Image
v तिघांनाही विलगीकरण कक्षातून मिळाली सुट्टी v जिल्हाधिका-यांनी केले डॉक्टरांचे कौतुक v कलम 144 चे उल्लंघन होऊ न देण्याचे आवाहन यवतमाळ, दि. 28 : येथील स्व.वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या विलगीकरण कक्षात दाखल असलेल्या तीन नागरिकांचे नमुने पॉझेटिव्ह आले होते. मात्र 14 दिवसानंतर पुन्हा त्यांचे दोन नमुने प्रयोगशाळेत पाठविले असता तीनही पॉझेटिव्ह असलेल्या नागरिकांचे नमुने निगेटिव्ह आले आहे. या तिघांनाही आता विलगीकरण कक्षातून आाज (दि.28) सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यात आता कोरोना विषाणू संसर्ग पॉझेटिव्ह असल्याची संख्या शुन्यावर आली आहे, असे जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी सांगितले. सुट्टी देण्यात आलेल्या तिघांनाही पुढील 14 दिवस आरोग्य विभागाच्या निगराणीखाली गृह विलगीकरणात ठेवण्यात येणार असल्याची माहिती वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने दिली.   दुबईवरून जिल्ह्यात आलेल्या नऊ जणांना लक्षणे असल्यामुळे 12 मार्च रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले होते. या सर्वांचे थ्रोट स्वॅबचे नमुने तपासणीकरीता नागपूर येथील इंदिरा

पॉझेटिव्ह असलेल्या 'त्या' नागरिकांचे उर्वरीत नमुने निगेटिव्ह

Image
v तिघांनाही विलगीकरण कक्षातून मिळाली सुट्टी यवतमाळ, दि. 28 : येथील स्व.वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या विलगीकरण कक्षात दाखल असलेल्या तीन नागरिकांचे नमुने पॉझेटिव्ह आले होते. मात्र 14 दिवसानंतर पुन्हा त्यांचे दोन नमुने प्रयोगशाळेत पाठविले असता तीनही पॉझेटिव्ह असलेल्या नागरिकांचे नमुने निगेटिव्ह आले आहे. या तिघांनाही आता विलगीकरण कक्षातून आाज (दि.28) सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यात आता कोरोना विषाणू संसर्ग पॉझेटिव्ह असल्याची संख्या शुन्यावर आली आहे, असे जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी सांगितले. सुट्टी देण्यात आलेल्या तिघांनाही पुढील 14 दिवस आरोग्य विभागाच्या निगराणीखाली गृह विलगीकरणात ठेवण्यात येणार असल्याची माहिती वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने दिली.   दुबईवरून जिल्ह्यात आलेल्या नऊ जणांना लक्षणे असल्यामुळे 12 मार्च रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले होते. या सर्वांचे थ्रोट स्वॅबचे नमुने तपासणीकरीता नागपूर येथील इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठविण्यात आले. यापैकी तीन जणांचे नमुने पॉझेटिव्ह तर

जिल्हयात कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी नोडल अधिकारी नियुक्त

Image
यवतमाळ दि. 27 : जिल्हयात कोरोना (कोव्हिड – १९) च्या संदर्भात प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याकरीता जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांनी नोडल अधिकारी नियुक्त केले आहे. यात पोलिस विभागाशी संबंधित जबाबदारी, आरोग्य विभाग, उप-प्रादेशिक विभाग तसेच महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, कृषी, उद्योग, सहकार विभाग, पुरवठा विभाग, गॅस एजंन्सी, भाजीपाला, किराणा दुकान, पेट्रोल एजंसी, हॉटेल्स व रेस्टॉरंट आदी विभागाशी संबंधित जबाबदा-यांचा समावेश आहे. तसेच तक्रारी व निवेदने स्वीकारण्याकरीतासुध्दा नोडल अधिका-याची नियुक्ती करण्यात आली आहे. नोडल अधिका-यांनी  त्यांना वाटप केलेल्या संबंधित विभागाशी समन्वय साधने व आवश्यक माहिती प्राप्त करून घेणे, नागरिकांकड़न आवश्यक गरजांच्या पुर्तीकरीता आलेल्या तक्रारींचे निरसण करणे, जिल्हयात 24 तास अखंडीत सेवा पुरविल्या जातात याची खात्री करणे, जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या निर्देशाचे पालन करणे, आवश्यक मनुष्यबळ व सेवा यांचे योग्य व्यवस्थापन होते आहे  की नाही, याची खात्री करणे, शासन स्तरावरून व जिल्हा प्रशासनाद्वारे प्राप्त आदेशाचे पालन संबंधित विभागाकडून करून घेणे, जिल्हयात कायदा

संचारबंदीत अडकलेल्यांकरीता जिल्हा प्रशासनाच्यावतीने उपाययोजना

Image
v मोबाईल क्रमांकावर साधता येईल संपर्क यवतमाळ, दि.27 :  कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव रोकण्याच्या दृष्टीने जिल्ह्यात फौजदारी प्रक्रिया संहितेचे कलम 144 अंतर्गत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. ही उपाययोजना करीत असताना अनेकांना याची झळ पोहचत आहे. मात्र नागरिकांच्या आरोग्याकरीता ही झळ सर्वांना काही काळ सोसावी लागणार आहे. त्यामुळे संचारबंदीच्या काळातील अडचणीतून नागरिकांना दिलासा देण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने उपाययोजना करण्यात येत आहे. यात बाहेरगावी अडकलेल्या नागरिकांना परत येण्यासाठी तसेच मूळ गावी परत जाणा-या नागरिकांना संपर्क साधण्यासाठी जिल्हा प्रशासनाने संपर्क क्रमांक उपलब्ध करून दिला आहे. संचारबंदीमुळे यवतमाळ शहरात अडकलेल्या विद्यार्थी, नागरिकांना यवतमाळ जिल्ह्यातील त्यांच्या मूळ गावी परत जायचे असेल त्यांनी मोबाईल क्रमांक 9422166532, 9552010660, 9922875461, 9421773332 आणि 9175113713 या क्रमांकावर संपर्क साधून आपले नाव, सध्या राहत असलेला पत्ता व कोणत्या गावाला परत जायचे आहे, याबाबत तात्काळ माहिती द्यावी. ज्यांना यवतमाळ जिल्ह्यातील इतर तालुक्यातून यवतमाळला यायचे आहे किंवा य

जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवा 24 तास सुरू राहणार

Image
v किराणा दुकान, मेडीकल स्टोअर्सचा समावेश यवतमाळ, दि. 27 : राज्यात कोरोना विषाणू (कोव्हीड - 19) संसर्गामुळे आरोग्य विषयक आपात्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यामुळे त्यावर उपाययोजना करण्याच्या संदर्भात साथरोग अधिनियम 1897 मधील खंड 2,3 व 4 ची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. तसेच जिल्ह्यात संचारबंदी लागू असल्यामुळे नागरिकांसाठी अत्यावश्यक असलेल्या सेवा 24 तास सुरू ठेवण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहे. नागरिकांना अत्यावश्यक सेवा देणारे किराणा दुकान, सुपर मार्केट, डीमार्ट, मेडीकल स्टोअर्स येथे एकाच वेळेच नागरिकांची गर्दी होऊ नये म्हणून ही सर्व दुकाने 24 तास आणि सात दिवस पूर्ण वेळ सुरू ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी दुकानांमध्ये एकाच वेळी गर्दी करू नये. तसेच आवश्यकता असल्यास केवळ एकाच व्यक्तिने या दुकानांमध्ये जाऊन खरेदी करावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. ००००००० वृत्त क्र. 240 ‘त्या’ चवथ्या नागरिकाचे वास्तव्य मुंबईतच यवतमाळ, दि. 27 : जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्ग झालेले व वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या विलगीकरण कक्षात उपचार घेत असलेल्या

आणखी एकाला विलगीकरण कक्षातून सुट्टी

Image
v पॉझेटिव्ह असलेले तीन नागरिकच रुग्णालयात भरती यवतमाळ, दि.27 :  कोरोना विषाणू (कोव्हिड - 19) संसर्गासंदर्भात गुरवारी दोन जणांचे नमुने निगेटिव्ह आले होते. यापैकी एकाला सुट्टी देण्यात आली होती तर एकाला लक्षणे असल्यामुळे विलगीकरण कक्षातच ठेवण्यात आले होते. मात्र या नागरिकालाही आता सुट्टी देण्यात आली असून सद्यस्थितीत पॉझेटिव्ह नमुने असलेले तीन नागरिक विलगीकरण कक्षात दाखल आहे. त्यांची प्रकृती स्थिर असून सुधारणा होत आहे. तर सुट्टी देण्यात आलेल्या नागरिकांना उपाययोजना म्हणून गृह विलगीकरणात ठेवण्यात येणार आहे, असे आवाहन जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी केले आहे. तर गृह विलगीकरणात असलेल्या नागरिकांची संख्या 88 आहे. या नागरिकांची आरोग्य विभागाच्यावतीने नियमित तपासणी सुरू असून त्यांनीसुध्दा इतरांच्या संपर्कात येऊ नये असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. ००००००

जिल्ह्यातील ‘होम क्वारेंटाईन’ ची संख्या 88 वर

Image
v विलगीकरण कक्षात निरीक्षणाखाली असलेल्या एकाचे नमुने निगेटिव्ह यवतमाळ, दि. 26 : जिल्ह्यात विदेशातून आलेले तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांना कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभुमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून ‘होम क्वारेंटाईन’ ठेवण्यात आले होते. 22 मार्च रोजी जिल्ह्यात दीडशेपार गेलेला हा आकडा आज (दि.26) 88 पर्यंत खाली आला आहे. होम क्वारेंटाइनच्या परिघाबाहेर आलेल्या नागरिकांना घरातच राहून काळजी घेण्याच्या सुचना प्रशासनाने दिल्या आहेत. विलगीकरण कक्षात निगराणीखाली (प्रिझमटिव्ह केसेस) असलेल्या एकाचे नमुने निगेटिव्ह आले आहेत. मात्र त्यांना लक्षणे असल्यामुळे सुट्टी देण्यात आली नाही. विलगीकरण कक्षात एकूण चार जण असून यापैकी तीन जण पॉझेटिव्ह आहेत. त्यांचे नमुने आज पुन्हा नागपूर येथील इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात चाचणीसाठी पाठविण्यात आल्याचे जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी सांगितले. ०००००००

विलगीकरण कक्षातील दोघांना सुट्टी......व्हीसीद्वारे जिल्हाधिका-यांनी घेतला तालुक्याचा आढावा

Image
v चार जण विलगीकरण कक्षात तर 101 जण होम कॉरेंटाईन यवतमाळ, दि. 25 : येथील स्व. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या विलगीकरण कक्षात निगराणीखाली (प्रिझमटिव्ह केसेस) असलेल्या दोघांना सुट्टी देण्यात आली आहे. मात्र त्यांना होम कॉरेंटाईन राहण्याच्या सुचना करण्यात आल्या आहेत. विलगीकरण कक्षात आता चार जण असून यापैकी तीन जण पॉझेटिव्ह आहेत. त्यांची प्रकृती स्थीर आहे. तसेच विलगीकरण कक्षात दाखल इतर एका जणाचे नमुने नागपूर येथील इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात चाचणीकरीता पाठविण्यात आल्याचे जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी सांगितले. जिल्ह्यात विविध ठिकाणी 101 जण होम कॉरेंटाईन मध्ये ठेवण्यात आले आहे. त्यांच्यावर आरोग्य पथकाच्या माध्यमातून तसेच पोलिस पथकाच्या माध्यमातून निगराणी ठेवली जात आहे. होम कॉरेंटाईन असलेल्या नागरिकांनी इतरांच्या संपर्कात येऊ नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.  ०००००० वृत्त क्र. 235 व्हीसीद्वारे जिल्हाधिका-यांनी घेतला तालुक्याचा आढावा v एसडीओ, टीएचओ, तहसीलदार, ठाणेदारांना सुचना यवतमाळ, दि. 25 : कोरोना विषाणू संसर्गाच्या अनुषंगाने जिल्हाधिकार

विलगीकरण कक्षातील तिघांचे रिपोर्ट निगेटीव्ह

Image
v पॉझेटिव्ह रिपोर्ट असणा-यांची प्रकृती स्थीर यवतमाळ, दि. 24 : येथील स्व. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या विलगीकरण कक्षात निगराणीखाली (प्रिझमटिव्ह केसेस) असलेल्या तीन जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. यात वैद्यकीय महाविद्यालयाच्या नर्सचा समावेश आहे. निगेटिव्ह रिपोर्ट आलेल्यापैकी दोघांना सुट्टी देण्यात आली असून त्यांना 14 दिवस होम कॉरेंटाईन ठेवण्यात येणार आहे. तर एका व्यक्तिला लक्षणे असल्यामुळे त्यांना अद्याप सुट्टी देण्यात आली नाही. पॉझेटिव्ह रिपोर्ट असलेल्या तीन जणांची प्रकृती स्थीर असून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी सांगितले. आज (दि. 24) आणखी दोन व्यक्ती विलगीकरण कक्षात दाखल झाल्यामुळे विलगीकरण कक्षातील एकूण संख्या सहा आहे. तर जिल्ह्यात होम कॉरेंटाईनची संख्या 105 आहे. कोरोनाबाबत मोफत समुपदेशनकरीता जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाने ८६०५४६८५७८ आणि ९४२३६२१९७६ हा मोबाईल क्रमांक उपलब्ध करून दिला आहे. कोरोनाबाबत काही शंका – कुशंका असल्यास नागरिकांनी या क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहनही आरोग्य विभागाने केले आहे. ०००००००

वृत्तपत्रांसदर्भात सोशल मिडीयावर फिरणारा मॅसेज खोटा - जिल्हाधिकारी एम.डी सिंह

Image
v जिल्हा माहिती अधिका-यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल यवतमाळ, दि. 23 : प्रसारमाध्यमातून (प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक) कोरोना संदर्भातील खरी माहिती लोकांपर्यत पोहचिण्यास मोठी मदत होते. कोरोना व्हायरस संबधीत वृत्तपत्राबाबत खोटा मॅसेज पसरविणा-याविरुध्द जिल्हा माहिती अधिकारी यांच्या तक्रारीवरून पोलिस स्टेशनमध्ये भारतीय दंड संहिता 1860 च्या कलम 188 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी दिली. कार्यालयीन कामकाज करीत असतांना जिल्हा माहिती अधिकारी राजेश येसनकर यांना व्हॉट्सॲप ग्रुपवर ‘जिल्हाधिकारी यांच्या सुचना’ या अंतर्गत खोटा मॅसेज निदर्शनास आला. शिवाय या मॅसेजच्या खाली जिल्हा माहिती कार्यालय असे लिहिलेले आढळले. ही बाब जिल्हा माहिती अधिका-यांनी जिल्हाधिकारी यांच्या निदर्शनास आणून यात वृत्तपत्रासंदर्भात खोटी माहिती असल्याचे प्रशासनाला सांगितले. यावर तात्काळ कार्यवाही करून पोलिस स्टेशमध्ये तक्रार नोंदवा, असे आदेश जिल्हाधिका-यांनी दिले. त्यानुसार या संदर्भात शहर पोलिस स्टेशमध्ये अज्ञात व्यक्तिविरुध तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला.   वृत्त

कोरोना : जिल्ह्यातील 49 जण होम कॉरेंटाईनच्या परिघाबाहेर

Image
v विलगीकरण कक्षात तीन पॉझेटिव्ह रुग्णांसह एकूण सहा जण यवतमाळ दि.23 : जिल्ह्यात विविध ठिकाणी होम कॉरेंटाईन करण्यात आलेल्या नागरिकांची संख्या आज (दि.23) रोजी 154 वर पोहचली. मात्र 14 दिवसांपासून होम कॉरेंटाईन असलेल्या 49 नागरिकांमध्ये कोणतेही लक्षणे नसल्यामुळे ते नागरिक आता होम कॉरेंटाईनच्या परिघाबाहेर आले आहेत. मात्र पुढील दहा दिवस ते आरोग्य विभागाच्या देखरेखीखाली राहणार असून त्यांनी स्वत:च काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी एम.डी.सिंह तसेच आरोग्य विभागाने केले आहे. दि. 22 मार्च रोजी जिल्ह्यातील होम कॉरेंटाईन असलेल्यांची संख्या 150 होती. त्यात आज (दि. 23) रोजी चार जणांची भर पडली. त्यामुळे एकूण संख्या 154 वर पोहचली. मात्र गत 14 दिवस होम कॉरेंटाईन असलेल्या 49 नागरिकांना नियमित आरोग्य तपासीणअंती कोणतेही लक्षणे निदर्शनास आली नाहीत. हे सर्व 49 नागरिक आता या परिघाबाहेर आले आहेत. कोरोनाबाबत मोफत समुपदेशनकरीता जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाने ८६०५४६८५७८ आणि ९४२३६२१९७६ हा मोबाईल क्रमांक उपलब्ध करून दिला आहे. स्व. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या विलगीकरण कक्षात एकूण सह

अत्यावश्यक सेवा राहणार सुरू - जिल्हाधिकारी सिंह

Image
v कलम 144 अंतर्गत दिले आदेश यवतमाळ, दि. 23 : राज्यात कोरोना विषाणूमुळे (कोव्हीड - 19) उद्भवणा-या संसर्गजन्य आजारामुळे आरोग्य विषयक आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (1) व (3) अन्वये जिल्हाधिकारी यांना प्राप्त असलेल्या अधिकाराचा वापर करून जिल्हादंडाधिकारी एम.डी.सिंह यांनी जिल्ह्यातील नगरपालिका, नगरपंचाययती क्षेत्रात  23 मार्च 2020 च्या सकाळी 5 वाजतापासून दि. 31 मार्चच्या मध्यरात्रीपर्यंत आदेश पारीत केले आहे. या अंतर्गत अत्यावश्यक सेवा सुरू राहणार असल्याचे आदेशात म्हटले आहे. या आदेशानुसार जिल्ह्यातील नगरपालिका व नगरपंचायतीच्या क्षेत्रात खाजगी व सार्वजनिक ठिकाणी पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्ती एकत्र जमू नये. कोरोना विषाणुच्या अनुषंगाने कोणत्याही नागरिकाने समाजामध्ये अफवा, अपप्रचार व भीती निर्माण होईल, अशा प्रतिक्रिया व्हॉट्सॲप, फेसबुक, ट्विटर, वृत्तपत्र, सोशल मिडीया व होर्डीग्ज आदीवर प्रसारीत करू नये. तसेच अधिकृत माध्यमाद्वारे माहिती न घेता दिशाभुल करणारी माहिती प्रसारमाध्यमावर प्रसारीत करू नये. कोरोना विषाणुचा अपप्रचार हो

विलगीकरण कक्षातील नागरिकांच्या प्रकृतीत सुधारणा

v तीन पॉझेटिव्ह रुग्णांसह एकूण पाच नागरिक दाखल v खाजगी आस्थापना 31 मार्चपर्यंत बंद यवतमाळ दि.21 : स्व. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या विलगीकरण कक्षात असलेल्या नागरिकांच्या प्रकृतीत सुधारणा असल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे यांनी सांगितले. सद्यस्थितीत विलगीकरण कक्षात एकूण पाच जण दाखल असून यातील तीन जणांचे नमुने पॉझेटिव्ह आहेत. तर इतर दोघांचे नमुने आज (दि. 21) नागपूर येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे. हे दोन्ही नागरिक दि. 20 रोजी विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले होते. प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यात होम कॉरेंटाईन करण्यात आलेल्या नागरिकांची संख्या 137 झाली आहे. जिल्ह्यातील सर्व खाजगी आस्थापना 31 मार्चपर्यंत बंद : जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रात कोरोना   (कोव्हिड - 19) वर नियंत्रण आणण्यासाठी व त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हृयातील सर्व खाजगी आस्थापना 31 मार्चपर्यंत पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. खाजगी आस्थापना दि. 21 ते 31 मार्चपर्यंत या कालावधीत बंद राहतील. केवळ अत्यावश्यक सेवा पुरविणा-या आस्थापना जसे पाणी पु

केश कर्तनालय, गेमपार्लर, मनोरंजन केंद्रे 31 मार्चपर्यंत बंद

Image
v प्रार्थनास्थळे, हॉटेल, बँक व प्रवासी वाहतुकीवर निर्बंध यवतमाळ दि.20 : राज्यात कोरोना विषाणुमुळे (कोविड-19) उद्भवणाऱ्या संसर्गजन्य आजारामुळे आरोग्य विषयक आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली आहे. या विषाणुमुळे उद्भवलेल्या संसर्ग रोगाच्या नियंत्रणास्तव आपत्कालीन उपाययोजना करण्यात आल्या असून साथरोग अधिनियम - 1897 मधील खंड 2, 3 व 4 ची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. साथरोग प्रतिबंधात्मक कायद्यामधील तरतुदीनुसार प्राप्त अधिकारान्वये जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी नागरिकांची एका ठिकाणी गर्दी होऊ नये यासाठी खालील आदेश पारीत केले आहेत. त्यानुसार यवतमाळ जिल्ह्यातील सर्व व्हीडीओ गेम पार्लर, पुल गेम, कार्ड क्लब, व्हीडीओ सिनेमा व सर्व सार्वजनिक मनोरंजन केंद्रे, जिल्ह्यातील नागरी व ग्रामीण भागातील सर्व केश कर्तनालय, हेअर सलुन व ब्युटी पार्लर दिनांक 31 मार्च 2020 पर्यंत पुर्णत: बंद ठेवण्याचे आदेश निर्गमित करण्यात आले आहे. तसेच सर्व मंदिर, मस्जीद, गुरूद्वारा, गिरीजाघर, बौद्ध विहार व इतर धार्मिक व प्रार्थना स्थळाच्या ठिकाणी एका वेळी पाचपेक्षा अधिक भाविक एकत्र जमण्यास 31

विलगीकरण कक्षातून आणखी दोघांना सुट्टी

v जिल्ह्यातील विविध ठिकाणी 130 जण होम कॉरेंटाईन यवतमाळ दि.20 : येथील स्व. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आलेल्या दोण जणांना सुट्टी देण्यात आली आहे. त्यांना पुढील 14 दिवस होम कॉरेंटाईन ठेवण्यात येणार आहे. सध्या विलगीकरण कक्षातील तीन जणांचे नमुने पॉझेटिव्ह असून नव्याने एक जण दाखल करण्यात आला आहे. दाखल झालेल्या नागरिकांचे नमुने प्रयोगशाळेत उद्या (दि.21) रोजी पाठविण्यात येणार असल्याचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे यांनी सांगितले. विदेशातून आलेल्या व्यक्तिंच्या संपर्कात आलेल्या नागरिकांना प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून होम कॉरेंटाईन ठेवण्यात आले आहे. हा आकडा जिल्ह्यात 130 वर पोहचला आहे. होम कॉरेंटाईन असलेल्या नागरिकांनी घरातच राहावे. इतरत्र किंवा घराच्या बाहेर पडू नये. या विषाणूचा प्रादुर्भाव इतरांना न होण्यासाठी सर्वांची काळजी घेणे आवश्यक आहे. तसेच विदेशातून आलेल्या व्यक्तिंनी स्वत:हून समोर येऊन यंत्रणेशी संपर्क करावा. त्यासाठी टोल फ्री क्रमांक 104, दूरध्वनी क्रमांक 07232 – 245705, आरोग्य विभागाचा नियंत्रण कक्

कोरोना : सुचनांचे उल्लंघन होत असल्यास कडक धोरण अवलंबवा

Image
              v पालकमंत्र्यांचे यंत्रणेला निर्देश यवतमाळ दि.20 : कोरोना विषाणूचे संकट संपूर्ण जगावर आले आहे. यात आपला देश, राज्य, जिल्हा आदी ढवळून निघाला आहे. या विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी शासन आणि प्रशासनामार्फत गांभिर्याने उपाययोजना करण्यात येत आहे. सर्व काही नागरिकांच्या आरोग्यासाठी सुरू आहे. अशावेळी शासन आणि प्रशासनाकडून दिलेल्या सुचनांचे उल्लंघन होत असेल तर यंत्रणेने कडक धोरण अवलंबवावे, असे स्पष्ट निर्देश राज्याचे वने, भुकंप पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी दिले. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर नियोजन सभागृहात विविध विभागांचा आढावा घेतांना ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी एम.डी.सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा, जिल्हा पोलिस अधिक्षक एम. राजकुमार, अतिरिक्त जिल्हाधिकारी सुनील महेंद्रीकर, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार व-हाडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बाळासाहेब चव्हाण आदी उपस्थित होते. विदेशातून तसेच रोजगारासाठी मुंबई, पुणे आदी ठिकाणी गेलेले ना