विदेशातून आलेल्या व्यक्तिंनी यंत्रणेला माहिती देणे बंधनकारक......


                     
                   
यवतमाळ, दि. 15 : कोरोना (कोव्हीड - 19) संसर्गाच्या पार्श्वभुमीवर विदेशातून जिल्ह्यात आलेल्या व्यक्तिंनी आवश्यक उपचारात्मक व प्रतिबंधात्मक उपाययोजनेकरीता संबंधित यंत्रणेला तसेच जिल्हा प्रशासनाला स्वत:हून माहिती देणे बंधनकारक आहे, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी एम.डी. सिंह यांनी आदेशित आहे.
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या 13 मार्च 2020 रोजीच्या अधिसुचनेनुसार 'साथरोग अधिनियम 1897' ची अंमलबजावणी सुरू झाली आहे. त्यानुसार शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने 'महाराष्ट्र कोव्हीड     - 19 उपाययोजना नियम 2020' हे 14 मार्च 2020 च्या अधिसुचनेनुसार प्रसिध्द केले आहे. सदर नियमावलीतील नियम 8 नुसार मागील 14 दिवसांत ज्या व्यक्ती कोरोना बाधित देशातून प्रवास करून आलेल्या असतील त्यांनी स्वत:हून यंत्रणेस माहिती देणे बंधनकारक आहे.
संबंधितांनी याबाबतची माहिती कोरोना नियंत्रणासाठीचा राज्य नियंत्रण कक्ष (020-26127394), एकात्मिक रोग सर्वेक्षण प्रकल्प कक्ष (020-27290066), किंवा टोल फ्री क्रमांक 104 किंवा यवतमाळ जिल्ह्याकरीता दिलेला दूरध्वनी क्रमांक (07232-245705) वर कळविणे आवश्यक राहील. जेणेकरून त्या अनुषंगाने आवश्यक उपचारात्मक व प्रतिबंधात्मक उपाययोजना करता येतील, असे प्रशासनाने कळविले आहे.
000000000
वृत्त क्र. 198
अनधिकृत माहिती, अफवा पसरविण्यास प्रतिबंध
v अन्यथा कायदेशीर व दंडनीय कारवाई
यवतमाळ, दि. 15 : सार्वजनिक आरोग्य विभागाच्या 13 मार्च 2020 रोजीच्या अधिसुचनेनुसार 'साथरोग अधिनियम 1897' ची अंमलबजावणी सुरू झाली आहे. त्यानुसार शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने 'महाराष्ट्र कोव्हीड     - 19 उपाययोजना नियम 2020' हे 14 मार्च 2020 च्या अधिसुचनेनुसार प्रसिध्द केले आहे. सदर नियमावलीतील नियम 6 नुसार कोरोना संसर्गाच्या पार्श्वभुमीवर समाजामध्ये अनधिकृत माहिती, अफवा पसरविण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. या नियमाचे उल्लंघन करणा-यांविरुध्द कायदेशीर व दंडनीय कारवाई करण्यात येईल, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.
कोणत्याही व्यक्तिस / संस्था / संघटनांना  कोरोना विषाणू (कोव्हीड - 19) च्या पार्श्वभुमीवर कोणत्याही प्रकारच्या अफवा, अनधिकृत माहिती इलेक्ट्रॉनिक किंवा सोशल मिडीयाच्या माध्यमातून पसरविण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे. याबाबत आरोग्य सेवा व संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियानचे आयुक्त, आरोग्य सेवा मुंबईचे संचालक, आरोग्य सेवा पुणेचे संचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन मुंबईचे संचालक, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्यामार्फत अधिकृत माहितीचे प्रसारण करण्यात येईल. याबाबतची कोणतीही अनधिकृत माहिती अथवा अफवा पसरविणा-या व्यक्ती / संस्था / संघटना या कायद्यान्वये कायदेशीर व दंडनीय कारवाईस पात्र राहतील, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी यांनी आदेशित केले आहे.
0000000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी