कोरोना : जिल्ह्यातील 49 जण होम कॉरेंटाईनच्या परिघाबाहेर


v विलगीकरण कक्षात तीन पॉझेटिव्ह रुग्णांसह एकूण सहा जण
यवतमाळ दि.23 : जिल्ह्यात विविध ठिकाणी होम कॉरेंटाईन करण्यात आलेल्या नागरिकांची संख्या आज (दि.23) रोजी 154 वर पोहचली. मात्र 14 दिवसांपासून होम कॉरेंटाईन असलेल्या 49 नागरिकांमध्ये कोणतेही लक्षणे नसल्यामुळे ते नागरिक आता होम कॉरेंटाईनच्या परिघाबाहेर आले आहेत. मात्र पुढील दहा दिवस ते आरोग्य विभागाच्या देखरेखीखाली राहणार असून त्यांनी स्वत:च काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी एम.डी.सिंह तसेच आरोग्य विभागाने केले आहे.
दि. 22 मार्च रोजी जिल्ह्यातील होम कॉरेंटाईन असलेल्यांची संख्या 150 होती. त्यात आज (दि. 23) रोजी चार जणांची भर पडली. त्यामुळे एकूण संख्या 154 वर पोहचली. मात्र गत 14 दिवस होम कॉरेंटाईन असलेल्या 49 नागरिकांना नियमित आरोग्य तपासीणअंती कोणतेही लक्षणे निदर्शनास आली नाहीत. हे सर्व 49 नागरिक आता या परिघाबाहेर आले आहेत. कोरोनाबाबत मोफत समुपदेशनकरीता जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाने ८६०५४६८५७८ आणि ९४२३६२१९७६ हा मोबाईल क्रमांक उपलब्ध करून दिला आहे.
स्व. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या विलगीकरण कक्षात एकूण सहा जण दाखल असून यातील तीन जणांचे नमुने पॉझेटिव्ह आहेत. तर इतर तीन जण देखरेखीखाली आहेत. त्यांची प्रक्रृती स्थीर असल्याचे वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे यांनी सांगितले.
०००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी