विलगीकरण कक्षातून आणखी दोघांना सुट्टी

v जिल्ह्यातील विविध ठिकाणी 130 जण होम कॉरेंटाईन
यवतमाळ दि.20 : येथील स्व. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आलेल्या दोण जणांना सुट्टी देण्यात आली आहे. त्यांना पुढील 14 दिवस होम कॉरेंटाईन ठेवण्यात येणार आहे. सध्या विलगीकरण कक्षातील तीन जणांचे नमुने पॉझेटिव्ह असून नव्याने एक जण दाखल करण्यात आला आहे. दाखल झालेल्या नागरिकांचे नमुने प्रयोगशाळेत उद्या (दि.21) रोजी पाठविण्यात येणार असल्याचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे यांनी सांगितले.
विदेशातून आलेल्या व्यक्तिंच्या संपर्कात आलेल्या नागरिकांना प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून होम कॉरेंटाईन ठेवण्यात आले आहे. हा आकडा जिल्ह्यात 130 वर पोहचला आहे. होम कॉरेंटाईन असलेल्या नागरिकांनी घरातच राहावे. इतरत्र किंवा घराच्या बाहेर पडू नये. या विषाणूचा प्रादुर्भाव इतरांना न होण्यासाठी सर्वांची काळजी घेणे आवश्यक आहे.
तसेच विदेशातून आलेल्या व्यक्तिंनी स्वत:हून समोर येऊन यंत्रणेशी संपर्क करावा. त्यासाठी टोल फ्री क्रमांक 104, दूरध्वनी क्रमांक 07232 – 245705, आरोग्य विभागाचा नियंत्रण कक्ष क्रमांक 07232 – 239515 आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाचा क्रमांक 07232-240720 उपलब्ध करून देण्यात आला आहे.
                                                                          ००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी