जिल्ह्यात 20 नागरिक होम कॉरेंटाईन


v विदेशातून आलेल्या चार नागरिकांचा समावेश
v नागरिकांनी काळजी घेण्याचे जिल्हाधिका-यांचे आवाहन
यवतमाळ दि.15 : येथील स्व. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आलेल्या ‘त्या’नऊ नागरिकांपैकी दोन नागरिकांचे नमुने पॉझेटिव्ह आले होते. त्यामुळे गत 14 दिवसांत त्यांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांची शोधमोहीम प्रशासनाच्यावतीने सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार आतापर्यंत जिल्ह्यात 20 नागरिकांना होम कॉरेंटाईन करण्यात आले असून यात विदेशातून आलेल्या चार नागरिकांचा समावेश असल्याची माहिती जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी दिली.
या 20 लोकांमध्ये आतापर्यंत कोणतेही लक्षण आढळून आले नाही. प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून त्यांना कॉरेंटाईन करण्यात आले आहे. आरोग्य पथकाडून त्यांची नियमितपणे विचारपूस करण्यात येत आहे. याशिवाय दुबईवरून आलेल्या ‘त्या’ नऊ नागरिकांपैकी दोघांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. त्यांचे नमुने नागपूरला पाठविण्यात आले असून त्यांचा रिर्पार्ट अद्याप प्राप्त व्हायचा आहे.
जिल्हाचा संपर्क क्रमांक व टोल फ्री क्रमांकावर विदेशातून आलेल्या चार नागरिकांनी स्वत:हून संपर्क साधला. यातील तीन नागरिक थायलंड मधून तर एक अजर बैजान (युरोप खंडातील देश) येथून जिल्ह्यात दाखल झाला होता. तालुकास्तरीय आरोग्य पथकाकडून त्यांनासुध्दा होम कॉरेंटाईन करण्यात आले आहे. अद्याप या नागरिकांमध्ये कोणतेही लक्षणे नसल्याचे जिल्हाधिका-यांनी सांगितले.
कोरोना विषाणू संसर्गाच्या  पार्श्वभुमीवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता तसेच जिल्हा शल्य चिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या तातडीच्या मागणीवरून अद्ययावत साधनसामुग्री, औषधोपचार, मास्क आदी बाबींसाठी जिल्हा नियोजन समितीमधून पालकमंत्र्यांच्या सुचनेवरून तातडीने 50 लक्ष रुपयांचा निधी वितरीत करण्यात आला आहे. तसेच जे विदेशातून आलेले नागरिक आहेत, त्यांनी स्वत: समोर येऊन टोल क्री क्रमांक 104 तसेच 07232-245705, 239515 या क्रमांकावर त्वरीत संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी केले आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी कोणतीही भीती मनात न बाळगता काळजी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
००००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी