विलगीकरण कक्षात सहा तर 88 होम कॉरेंटाईन





v विदेशातून आलेल्या नागरिकांनी यंत्रणेशी संपर्क साधण्याचे आवाहन
यवतमाळ दि.16 : जिल्ह्यात कोरोना (कोव्हिड - 19) विषाणू संसर्गाच्या संदर्भात शासकीय वैद्यकीय महाविद्यायातील विलगीकरण कक्षात आतापर्यंत सहा जणांना दाखल करण्यात आले आहे. यापैकी तीन जणांचे नमुने पॉझेटिव्ह असून उर्वरीत तीन जणांचे रिपोर्ट अप्राप्त आहे. आतापर्यंत जिल्ह्यात एकूण 88 जणांना होम कॉरेंटाईन करण्यात आले आहे. यात विदेशातून जिल्ह्यात आलेले 67 जण तर त्यांच्या थेट संपर्कात आलेले 21 जणांचा समावेश आहे.
सद्यस्थितीत यवतमाळ स्टेज – 2 मध्ये असून पॉझेटिव्ह नमुने आलेले नागरिक ज्यांच्या संपर्कात आले, त्या लोकांची माहिती गोळा करून त्यांना आवश्यकतेनुसार होम कॉरेंटाईन करण्यात येत आहे. जेणेकरून या विषाणूचा आणखी प्रादुर्भाव वाढणार नाही. विदेशातून आलेल्या लोकांनी इतर नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ नये किंवा त्यांना संसर्ग होऊ नये म्हणून स्वत: समोर येऊन यंत्रणेशी संपर्क करावा. यासाठी टोल फ्री क्रमांक 104 किंवा दूरध्वनी क्रमांक 07232-239515 वर उपलब्ध करून देण्यात आला आहे.
नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. तसेच प्रशासनाकडून देण्यात आलेल्या सुचनांने तंतोतंत पालन करावे. प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून वारंवार हात स्वच्छ धुणे, घर व परिसरात स्वच्छता ठेवणे आदी उपाययोजना करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
०००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी