जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवा 24 तास सुरू राहणार


v किराणा दुकान, मेडीकल स्टोअर्सचा समावेश
यवतमाळ, दि. 27 : राज्यात कोरोना विषाणू (कोव्हीड - 19) संसर्गामुळे आरोग्य विषयक आपात्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यामुळे त्यावर उपाययोजना करण्याच्या संदर्भात साथरोग अधिनियम 1897 मधील खंड 2,3 व 4 ची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. तसेच जिल्ह्यात संचारबंदी लागू असल्यामुळे नागरिकांसाठी अत्यावश्यक असलेल्या सेवा 24 तास सुरू ठेवण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहे.
नागरिकांना अत्यावश्यक सेवा देणारे किराणा दुकान, सुपर मार्केट, डीमार्ट, मेडीकल स्टोअर्स येथे एकाच वेळेच नागरिकांची गर्दी होऊ नये म्हणून ही सर्व दुकाने 24 तास आणि सात दिवस पूर्ण वेळ सुरू ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी दुकानांमध्ये एकाच वेळी गर्दी करू नये. तसेच आवश्यकता असल्यास केवळ एकाच व्यक्तिने या दुकानांमध्ये जाऊन खरेदी करावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
०००००००
वृत्त क्र. 240

‘त्या’ चवथ्या नागरिकाचे वास्तव्य मुंबईतच
यवतमाळ, दि. 27 : जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्ग झालेले व वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या विलगीकरण कक्षात उपचार घेत असलेल्या तीनच नागरिकांचे नमुने पॉझेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यातील पॉझेटिव्ह असलेल्या नागरिकांची संख्या तीनच असून त्यांची प्रकृती स्थीर असल्याचा अहवाल वेळोवेळी संचालनालयास व शासनास सादर करण्यात येतो. मात्र काही प्रिंट मिडीयातील वृत्तांमध्ये आणि इलेक्ट्रॉनिक चॅनल्समध्ये यवतमाळातील पॉझेटिव्ह रुग्णसंख्या चार दाखविण्यात येत आहे. चवथा रुग्ण हा मुंबईत राहणारा असून त्याचे मूळ गाव यवतमाळ जिल्ह्यातील आहे. परंतु यवतमाळ जिल्ह्यात तो गत पाच वर्षात कधीही आलेला नाही, असा खुलासा वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांनी केला आहे.
०००००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी