विलगीकरण कक्षातील दोन जणांना ‘डिस्चार्ज’



v इतरांच्या  प्रकृती  सुधारणा
यवतमाळ दि.19 : येथील स्व. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विलगीकरण कक्षात दाखल असलेल्या दोन जणांना आज (दि.19) डिस्चार्ज देण्यात आला. यात एक दुबईवरून तर दुसरा व्यक्ती मक्का (सौदी अरेबिया) वरून जिल्ह्यात  दाखल झाला होता. प्रतिबंधात्मक उपायोजनेंतर्गत दोघांनाही येथील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते.
सद्यस्थितीत विलगीकरण कक्षात पाच जण असून यात तीन जण पॉझेटिव्ह (दोन महिला व एक पुरुष) तर इतर दोन जण निगराणीत ठेवण्यात आले आहे. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी सांगितले. विदेशातून आलेल्या लोकांच्या संपर्कात आल्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यातील 128 लोकांना होम कॉरेंटाईन मध्ये ठेवण्यात आल आहे. आरोग्य विभागाला जिल्हा प्रशासनाने तातडीने 1 कोटी 30 लक्ष रुपये उपलब्ध करून दिले आहे. यापैकी 1 कोटी पर्यंतची अत्यावश्यक साधनसामुग्री घेण्याचे अधिकारी शासकीय वैद्यकीय महाविद्यलयाचे अधिष्ठाता यांना देण्यात आले आहेत. यात आवश्यक व्हेंटीलेटर, औषधी, मास्क आदींचा समावेश आहे.

बाहेरून आलेल्या नागरिकांची तपासणी करण्याकरीता विशेष पथकाची स्थापना :
इतर राज्यातून आलेल्यांची तपासणी करण्याकरीता विशेष पथकाची स्थापना करण्यात आली आहे. तेलंगाणा व इतर राज्यातून महाराष्ट्रात प्रवेश करणा-या प्रवाशांची तपासणी करण्याकरीता केळापूर तालुक्यातील पिंपळखुटी चेकपोस्टवर पथक गठीत करण्यात आले आहे. एका पथकात चार लोकांचा समावेश असून यात आरोग्य अधिकारी, मंडळ अधिकारी, तलाठी आणि पोलिस कर्मचारी यांचा समावेश आहे. अशी एकूण चार पथकाची स्थापना करण्यात आली आहे.
तेलंगणा व इतर राज्यातून महाराष्ट्रात प्रवेश करणा-या प्रवाशांची सखोल चौकशी करणे, प्रवाशांची नोंदवही ठेवणे, विदेशातील प्रवासी असल्याचे निदर्शनास आल्यास प्रशासनाला कळविणे. प्रशासनातील अधिकारी यांनी अहवाल मागितल्यास सादर करणे, रोजचा अहवाल तहसील समितीला सादर करणे, प्रवाश्यांमध्ये कोरोना सदृश्य आजाराची लक्षणे आढळून आल्यास त्यांची आरोग्य तपासणी करून घेण्याबाबत आरोग्य यंत्रणेला कळविणे आदी कामे या पथकांकडून करण्यात येणार आहे. 19 मार्च ते 31 मार्चपर्यंत 24 तास हे पथक चक्राकार पध्दतीने कार्यरत राहणार आहेत.यात हयगय केल्यास आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अंतर्गत कठोर कार्यवाही करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.


००००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी