विलगीकरण कक्षातील तिघांचे रिपोर्ट निगेटीव्ह


v पॉझेटिव्ह रिपोर्ट असणा-यांची प्रकृती स्थीर
यवतमाळ, दि. 24 : येथील स्व. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या विलगीकरण कक्षात निगराणीखाली (प्रिझमटिव्ह केसेस) असलेल्या तीन जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. यात वैद्यकीय महाविद्यालयाच्या नर्सचा समावेश आहे. निगेटिव्ह रिपोर्ट आलेल्यापैकी दोघांना सुट्टी देण्यात आली असून त्यांना 14 दिवस होम कॉरेंटाईन ठेवण्यात येणार आहे. तर एका व्यक्तिला लक्षणे असल्यामुळे त्यांना अद्याप सुट्टी देण्यात आली नाही. पॉझेटिव्ह रिपोर्ट असलेल्या तीन जणांची प्रकृती स्थीर असून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी सांगितले.
आज (दि. 24) आणखी दोन व्यक्ती विलगीकरण कक्षात दाखल झाल्यामुळे विलगीकरण कक्षातील एकूण संख्या सहा आहे. तर जिल्ह्यात होम कॉरेंटाईनची संख्या 105 आहे.
कोरोनाबाबत मोफत समुपदेशनकरीता जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाने ८६०५४६८५७८ आणि ९४२३६२१९७६ हा मोबाईल क्रमांक उपलब्ध करून दिला आहे. कोरोनाबाबत काही शंका – कुशंका असल्यास नागरिकांनी या क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहनही आरोग्य विभागाने केले आहे.
०००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी