मौजे लोनाडच्या संरक्षक भिंतीसाठी वृक्षतोड नाही - वनमंत्री संजय राठोड



यवतमाळ, दि. 13 : भिवंडी येथील मौजे लोनाड येथील परिसरात गल्फ ऑइल कॉर्पोरेशन यांनी वृक्षांची कत्तल न करता संरक्षण भिंत बांधली असल्याचे चौकशीअंती निदर्शनास आले असल्याची माहिती वन मंत्री संजय राठोड यांनी विधानसभेत दिली.
सदस्य महेश चौगुले यांनी ठाणे जिल्ह्यातील लोनाड येथे वृक्षतोड करून अनधिकृत बांधकाम करण्यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री राठोड बोलत होते.
श्री.राठोड म्हणाले, भिवंडी येथील श्रमजीवी संघटना यांनी लोनाड या ठिकाणी गल्फ ऑईल कॉर्पोरेशन ही कंपनी रस्त्याचे खोदकाम करते, अशी तक्रार केली होती. मात्र, याची शहानिशा केली असता, अद्याप कोणतेही अनधिकृत खोदकाम करण्यात आले नसल्याचे आढळून आल्याची माहिती श्री.राठोड यांनी यावेळी दिली. वनांमध्ये लागणारा वणवा विझविण्यासाठी वन विभागाकडे यंत्रणा आणि उपाय असल्याची माहिती त्यांनी उपप्रश्नाला उत्तर देताना दिली.
यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री नितेश राणे, संजय केळकर यांनी सहभाग घेतला.
०००००००००




भूकंपग्रस्त गावांतील रहिवाशांना

घरे देण्याबाबत शासन सकारात्मक
                                                                                    - भूकंप पुनर्वसन मंत्री संजय राठोड

यवतमाळ, दि. 13 : मौजे कारला व कुमठा गावातील एकूण 1848 पैकी 1166 घरांचे वर्गीकरण करण्यात आले. क वर्गातील बाधीत घरे एकूण 749 एवढी होती. नुकसान झालेल्या निकषानुसार काहींना 34 हजार तर काहींना 17 हजार एवढे अनुदान देण्यात आले आहे. नुकसानग्रस्त गावकऱ्यांना घरे उपलब्ध करून देण्यासंदर्भात शासन सकारात्मक असल्याची माहिती वने व भुकंप पुनर्वसन मंत्री संजय राठोड यांनी विधानसभेत दिली.
सदस्य अभिमन्यु पवार यांनी मौजे कारला व कुमठा या भूकंपग्रस्त गावांचे पुनर्वसन करण्यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना ते बोलत होते. श्री.राठोड म्हणाले, या दोन्ही गावात 1848 गावे होती. भूकंपामुळे बाधित असलेल्या घरांना अनुदान देण्यात आले आहे. मात्र, त्यांना घरे देण्यासंदर्भातील जिल्हाधिकारी यांच्याकडून अहवाल मागविण्यात आला आहे. या घरांसाठी दीड लाखांपेक्षा जास्त अनुदान देण्यात येईल का याबाबत प्रस्तावाअंती शासन सकारात्मक विचार करेल अशी माहिती मंत्री श्री.राठोड यांनी दिली. यावेळी झालेल्या चर्चेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, सदस्य सुधीर मुनगंटीवार यांनी सहभाग घेतला.
००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी