जिल्ह्यातील अंगणवाड्या 31 मार्चपर्यंत तर पानपट्टी दुकाणे पुढील आदेशापर्यंत बंद



यवतमाळ दि.17 : महाराष्ट्र शासनाच्या दिनाक 13 मार्च, 2020 च्या अधिसुचनान्वये राज्यात कोरोना विषाणुमुळे (कोविड-19) उद्भवणाऱ्या संसर्गजन्य आजारामुळे आरोग्य विषयक आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली आहे. या विषाणुमुळे उद्भवलेल्या संसर्ग रोगाच्या नियंत्रणास्तव आपत्कालीन उपाययोजना करण्याची आवश्यकता निर्माण झाल्यामुळे राज्यात साथरोग अधिनियम, 1897 मधील खंड 2, 3 व 4 ची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. साथरोग प्रतिबंधात्मक कायदा मधील तरतुदीनुसार जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी जिल्ह्यातील सर्व नगरपालीका व नगरपंचायत क्षेत्रातील तसेच ग्रामीण क्षेत्रातील सर्व शासकीय व खाजगी अंगणवाड्या 31 मार्च पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश निर्गमित केले आहे.
तसेच दुसऱ्या एका आदेशान्वये जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी जिल्ह्यातील नागरी व ग्रामीण भागातील सर्व जर्दा, पानटपरी/पानठेला/पानपट्टी दुकाने आजपासून पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याचे आदेशीत केले आहे.
या आदेशाचे उल्लघन झाल्याचे निदर्शनास आल्यास भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 अन्वये शिक्षापात्र असलेला अपराध केला आहे असे मानण्यात येईल व संबंधीतांवर सदर कलमानुसार कारवाई करण्यात येईल असेही आदेशात नमुद करण्यात आले आहे.
००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी