Posts

Showing posts from March, 2023

खेळाडू विद्यार्थ्यांना क्रीडा सवलतीचे वाढीव गुण घेण्याचे आवाहन

यवतमाळ,दि.३१मार्च (जिमाका):- माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत प्रविष्ट होणाऱ्या जिल्हा, विभाग,राज्यस्तरीय क्रीडा स्तरावरील क्रीडा स्पर्धेत प्राविण्य संपादन केलेल्या तसेच राष्ट्रीय अथवा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत प्राविण्य संपादन केलेल्या व सहभागी झालेल्या खेळाडू विद्यार्थ्यांना क्रीडा सवलतीचे वाढीव गुण देण्याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यात आला आहे. सदर क्रीडा गुण सवलत मिळवण्यासाठी खेळाडू हा इयत्ता १० वी व १२ वी शालांत परीक्षेला सर्व विषय घेऊन प्रविष्ट होणारा असावा. जिल्हा विभाग, राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील मान्यता प्राप्त क्रीडा स्पर्धेत प्राविण्य असावे. तसेच शालेय व संघटनेच्या क्रीडा स्पर्धा कालावधी हा १जून ते २८ फेब्रुवारीचा असावा. प्रति विद्यार्थी रुपये २५ तपासणी शुल्क म्हणून घेण्याबाबत आदेश निर्गमित करण्यात आलेले आहे. सदरचे तपासणी शुल्क आपण या कार्यालयातून आपले ग्रेस गुण प्रस्ताव शिफारस करतेवेळी अमरावती विभागीय मंडळ यांचे नावे रक्कम भरणा केलेल्या बँक चलनाची प्रत जोडणे आवश्यक आहे. या अटीवर प्रस्ताव स्वीकारण्यात येईल.

मिशन थायरॉईड अभियान सुरु

यवतमाळ, दि. ३१ मार्च (जिमाका):- वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागांतर्गत रुग्णसेवेसाठी व विविध रोगांच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी विविध अभियाने सुरु केली असून जिल्ह्यात ‘मिशन थायरॉईड अभियान’ राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमाअंतर्गत थायरॉईडच्या आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांसाठी श्री वसंतराव नाईक शासकिय महाविद्यालयात अधिष्ठाता, डॉ गिरिश जलकर व अधीक्षक डॉ सुरेद्र भुयार यांचे मार्गदर्शनाखाली आठवडयातील दर गुरवारी बाहयरुग्ण विभागात सकाळी १२ ते २ या दरम्यान रुग्ण तपासणी व उपचार केले जातील. हा कार्यक्रम संपुर्ण महाराष्ट्रामध्ये शासकिय वैद्यकिय महाविद्यालयामध्ये राबविण्यात येणार आहे. सदर कार्यक्रम औषधवैद्यकशास्त्र विभाग, शल्यचिकित्सा विभाग, कान नाक घसा विभाग, जन औषधवैद्यकशास्त्र विभाग यांचे संयुक्त विद्यमानाने राबविण्यात येत आहे. यवतमाळ जिल्हयातील सर्व नागरिकांना विषेश करून गरोदर महिला व लहान बालके तसेच ज्यांना थायरॉईडचा आजार आहे अशा नागरिकांनी सदर अभियाना अंतर्गत लाभ घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

'शासकिय योजनांची जत्रा' चित्ररथाचे पालकमंत्र्यांचे हस्ते उद्घाटन जिल्हा माहिती कार्यालयाचा उपक्रम

यवतमाळ, दि ३१ मार्च :- सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांची प्रचार व प्रसिद्धी करण्यासाठी जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या 'शासकिय योजनांची जत्रा' चित्ररथाला अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड व जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी उद्द्घाटन केले तसेच हिरवा झेंडा दाखवून मार्गस्थ केले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार व-हाडे, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त भाऊराव चव्हाण, जिल्हा माहिती अधिकारी मनीषा सावळे उपस्थित होत्या. अनुसुचीत जातीच्या नागरिकांना समाज कल्याण विभागाच्या विविध योजनांची माहिती मिळावी म्हणुन जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येतात. यात कलापथक, चित्ररथ, रेडिओ जिंगल्स, फ्लेक्स, घडिपत्रिका इत्यादी माध्यमांचा वापर करण्यात येतो. सामाजिक न्याय विभागाच्या योजनांची माहिती लोकांना व्हावी यासाठी तयार करण्यात आलेला चित्ररथ ३५० गावांमध्ये ४४ दिवस फिरणार आहे. त्यामुळे नागरिकांनी चित्ररथाच्या माध्यमातुन योजनांची माहिती करुन घ्यावी असे आवाहन पालकमंत्री संजय राठोड यांनी केले आहे.

वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा जिल्हा दौरा

यवतमाळ, दि. ३१ मार्च (जिमाका) :-राज्याचे वने, सांस्कृतीक कार्य व मत्सव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार हे शनिवार दिनांक १ एप्रिल रोजी यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून ते उमरखेड मधील विविध विकास कामांचे भूमीपुजन करतील. श्री मुनगंटीवार यांचा दौरा कार्यक्रम असा आहे. शनिवार दिनांक १ एप्रिल २०२३ रोजी सकाळी १० वाजता नांदेड येथून मोटारीने उमरखेडकडे प्रयाण. उमरखेड येथील गो.सो.सारडा,राजस्थानी भवन येथे १२ वाजता आयोजित उमरखेड शहरातील विविध विकास कामांच्या लोकार्पण कार्यक्रमास उपस्थित राहतील. दुपारी १ वाजून १५ मिनीटांनी उमरखेडहून मोटारीने नांदेडकडे प्रस्थान करतील.

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना प्रोत्साहनपर योजनेमध्ये ४४०७ लाभार्थ्यांची यादी प्रसिध्द

यवतमाळ, दि. २९ मार्च (जिमाका):- महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ अंतर्गत प्रोत्साहनपर योजनेचे पोर्टलवर दिनांक २८ मार्च रोजी ४४०७ लाभार्थ्यांची विशिष्ट क्रमांकाची यादी आधार प्रमाणिकरणासाठी प्रसिध्द करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने या यादीत नावे असलेल्या लाभार्थ्यांनी त्यांचे बँक बचत खात्याचे पासबुक व आधार कार्डसह जवळचे सेतु सुविधा केंद्रावर जाऊन त्वरीत आधार प्रमाणिकरण करुन घ्यावे, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण यांनी केले आहे.

३ एप्रिलला लोकशाही दिनाचे आयोजन

यवतमाळ, दि.२९ (जिमाका):- जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन सोमवारी ३ एप्रिलला बळीराजा चेतना भवत,(बचत भवन) जिल्हाधिकारी कार्यालय येथे सकाळी १० वाजता करण्यात येत आहे. प्रत्यक्ष लोकशाही दिनात उपस्थित राहणे शक्य होत नसलेल्या नागरिकांना त्यांनी लोकशाही दिनाच्या म्हणजेच दिनांक ३ एप्रिल सकाळी १० वाजेपर्यंत तक्रार अर्ज rdc yavatmal@rdeiffmail.com या ई-मेल वर सादर करावा. सदर मेलवर पाठविलेली तक्रार लोकशाही दिनात समाविष्ट करून घेण्यात येणार आहे.परंतु दिनांक ३ एप्रिलला सकाळी १० वाजता नंतर मेलवर प्राप्त होणाऱ्या तक्रार अर्जाचा लोकशाही दिनात विचार केला जाणार नाही. संबंधीत तक्रारदारांनी यांची नोंद घ्यावी. जनतेच्या तक्रारी किंवा अभिकथने/गाऱ्हांनी हे शासन निर्णयानुसारच स्विकारून त्या अर्जवार कार्यवाही करण्यात येईल,असे निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे यांनी कळविले आहे.

विद्यार्थ्यांनी शिष्यवृतीचे अर्ज महाविद्यालयास सादर करावे

यवतमाळ,दि.२९ मार्च.(जिमाका):-समाज कल्याण विभागामार्फत अनुसूचित जाती,इतर मागास वर्ग,विजाभज व विशेष मागास प्रवर्गाच्या विद्यार्थांना महाविद्यालया मार्फत मँट्रीकोत्तर शिष्यवृती,फ्रिशिप, विद्यावेतन व छत्रपती राजश्री शाहु महाराज गुणवत्ता शिष्यवृतीचा लाभ देण्यात येतो. सदर सर्व योजनांचे काम स्टेट डिबीटी च्या http://mahadbt.gov.in या संकेतस्थळावर लाभार्थांचे आधार क्रमांक बँक खात्याशी संलग्न करून सन २०२२-२३ चे अर्ज दिनांक २१ सप्टेंबर २०२२ पासून भरणे सुरू झाले आहे. भारत सरकार शिष्यवृती व शिक्षण शुल्क परिक्षा शुल्क,विद्यावेतन,राजश्री शाहु महाराज गुणवत्ता शिष्यवृती या योजनांचे अर्ज विद्यार्थांनी ऑनलाईन पद्धतीने भरून विहीत कालावधीच्या आत परिपुर्ण भरलेला अर्ज सर्व कागदपत्रासह महाविद्यालयास सादर करावा. महाविद्यालयांनी नियमानुसार पात्र व परिपुर्ण असलेले अर्ज सहाय्यक आयुक्त समाजकल्याण कार्यालयास मंजुरीसाठी सादर करावे, असे समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त भाऊराव चव्हाण यांनी कळविले आहे.

कौशल्य विकास विभागातर्फे ऑनलाईन रोजगार मेळावा

यवतमाळ दि. २९ मार्च,(जिमाका):-जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांचे वतीने ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सदर मेळावा ३१मार्च पर्यंत राहणार असल्याची माहिती सहाय्यक आयुक्त विद्या शितोळे यांनी दिली आहे. जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांना rojgar.mahaswayam.gov.in या वेब पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने विविध पदासाठी शैक्षणिक पात्रतेनुसार पसंतीक्रम देत सहभागी होता येणार आहे.सदर मेळाव्यामध्ये किमान १२ वी. उत्तीर्ण झालेले इंजिनियरींग पदवी, पदविका, नर्सिंग पदवी, पदविका धारण केलेले रोजगार इच्छुक उमेदवारांना त्यांच्याकडील सेवा योजना कार्डचा (एम्प्लॉयमेंट कार्ड) युजरनेम व पासवर्ड लॉगिन करून सदर मेळाव्यामध्ये सहभागी होता येईल. सदर ऑनलाईन मेळाव्याकरिता उमेदवारांकडे सेवायोजन कार्ड (एम्प्लॉयमेंट कार्ड)चा युझरनेम व पासवर्ड असणे आवश्यक आहे. नसल्यास rojgar.mahaswayam.gov.in य वेबपोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने कार्ड ची नोंदणी करता येईल. तसेच जॉब सिकर या टॅबमध्ये लॉगिन करून डाव्या बाजूला पं.दिनदयाल उपाध्याय जॉब फेयर या वर क्लिक करून यवतमाळ जिल्हा निवडून द

नदी- नाल्यांची साफसफाई २० मे पर्यंत पूर्ण करावी मान्सून पूर्व आढावा बैठकीत जिल्हाधिकारी यांच्या सूचना

यवतमाळ, दि २९ मार्च :- मुख्य नदयांच्या प्रवाहामधील अडथळे काढुन, पूर प्रवण भागातील नद्यांची व नाल्यांची साफसफाई करण्यात यावी. त्याचबरोबर जिल्हयातील अतिसंवेदनशिल व संवेदनशिल गावांची यादी तयार करुन नदीकाठावरील बंधाऱ्यांची, साठवण तलावाचे बळकटीकरण, डागडूजीची सर्व कामे २० मे पूर्वी करण्यात यावी अशा सुचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिल्यात. मान्सूनपूर्व आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवन येथे आयोजित करण्यात आली होती, यावेळी जिल्हाधिकारी यांनी सदर सूचना केल्यात. या बैठकिला मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ निवासी उपजिल्हाधिकारी ललित कुमार व-हाडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आर डी राठोड,जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता, जिल्हा पुरवठा अधिकारी सुधाकर पवार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, आदी अधिकारी उपस्थित होते. नाला सरळीकरण, नाला खोलिकरण, रिचार्ज शाफ्टची प्रस्तावित कामे व सुरू असलेली सर्व कामे २० मे पर्यत पूर्ण करावी.शोध व बचाव साहीत्य सुस्थितीत असल्याची खात्री करण्यात यावी. पूरपरिस्थितीत नागरिकांना सुरक्षीत स्थळी स्तलांतरित करण्याकरिता सुरक्षित ठि

कार्यात्मक नळ जोडणीची कामे येत्या १० दिवसात पूर्ण करा* जिल्हाधिकारी यांचे जल जीवन मिशन बैठकित आदेश*

यवतमाळ, दि २८ जिमाका:- पाण्यासाठी स्त्रोत उपलब्ध आहे मात्र पाईपलाईन किंवा नळ जोडणी झालेली नाही अशा गावात कार्यात्मक घरगुती नळ जोडणी करून देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्यात. येत्या दहा दिवसात अशा गावांमध्ये नळ जोडणीचे काम प्राधान्याने पूर्ण करण्याचे आदेश अमोल येडगे यांनी दिलेत. जलजीवन मिशनचा जिल्हाधिकारी यांनी आज आढावा घेतला, यावेळी ते बोलत होते या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे कार्यकारी अभियंता श्री कोल्हे, जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता तसेच इतर क्षेत्रीय अधिकारी उपस्थित होते. जागेच्या कारणामुळे पाणीपुरवठा योजनांची कामे सुरू झाली नाहीत, अशा गावांची विभाग निहाय यादी तयार करून सादर करण्यात यावी. सार्वजनिक बांधकाम, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, रेल्वे इत्यादी विभागांना जागेच्या संदर्भात पाठपुरावा करावा. तसेच खाजगी जागांचे दानपत्र घेण्यासाठी सुद्धा पाठपुरावा करावा. पाणी पुरवठा योजनांची कामे सुरू करण्यासाठी विनाकारण अडथळे आणणाऱ्या लोकांची आधी समजुत घालावी. तहसीलदार, गटविकास अधिकारी, जिल्हाधिकारी यांच्याकडे त्य

वनविभागाने सामुहिक वनहक्क मिळालेल्या ७६७ गावांचे वनक्षेत्र निश्चित करून द्यावे -जिल्हाधिकारी अमोल येडगे

-जिल्हास्तरीय अभिसरण समितीचा घेतला आढावा यवतमाळ ,दि २८ जिमाका:- सामूहिक वन हक्क मिळालेल्या ७६७ गावांना व्यवस्थापन आराखडे तयार करण्यासाठी गावांच्या वनहक्काचे क्षेत्र निश्चित करून देणे आवश्यक आहे. यासाठी पंचायत समिती, महसूल विभाग, पुसद व पांढरकवडा प्रकल्प अधिकारी यांनी वन विभागाशी समन्वय साधुन गावांचे वन क्षेत्र निश्चित करून त्याप्रमाणे वनविभागाकडून नकाशे उपलब्ध करून घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आज दिल्यात. जिल्हास्तरीय अभिसरण समितीची आढावा बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवन येथे पार पडली. यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते. या बैठकिला सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी, पांढरकवडा याशिनी नागराजन,उपवनसंरक्षक पांढरकवडा किरण जगताप, उपवनसंरक्षक यवतमाळ धनंजय वायभासे, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार व-हाडे, उपजिल्हाधिकारी रोहियो संगीता राठोड, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर तसेच पुसद प्रकल्प अधिकारी आत्माराम धाबे,उपमुख्य कार्यकारी अधिकारी, पंचायत, तहसीलदार महसूल, भाग्यश्री देशमुख ,सहायक प्रकल्प अधिकारी, पांढरकवडा श्री. सोनार, तहसीलदार गटविकास अधिकारी

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पामुळे वाढतेय सिंचन सुविधा

७३६५ शेतक-यांना स्प्रिंकलर व ठिंबकचा लाभ प्रकल्पात ३०२ गावे, ४५९३८ शेतक-यांची नोंदणी १२८३० शेतक-यांना विविध योजनेचा लाभ ३८ कोटी ५२ लाख २९ हजार खर्च यवतमाळ, दि २६ मार्च :- वातावरणीय बदलाला तोंड देण्यासाठी आणि शेतक-यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी सुरु करण्यात आलेला नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प जिल्ह्यातील ३०२ गावांमधील शेतक-यांसाठी अत्यंत फायदेशिर ठरत आहे . या प्रकल्पातून जिल्ह्यातील ७३६५ शेत्क-यांना स्प्रिंकलर व ठिंबक संचाचा लाभ मिळाल्यामुळे या शेतक-यांनी पारंपारीक पिकासोबत नगदी पिकांचीही लागवड केली आहे. मार्च २०१८ मध्ये पोकरा प्रकल्प राज्यातील खारपान पट्टा, आत्म्हत्याग्रस्त आणि अवर्षणग्रस्त अशा १४ जिल्ह्यात सुरु झाला. या प्रकल्पातून शेतक-यांना वैयक्तिक लाभासोबत, शेतकरी उत्पादक कंपन्या, शेतकरी बचत गटांसाठी सामुहिक लाभाच्या योजनांचा लाभ देण्यात येत आहे. यवतमाळ जिल्ह्यात हा प्रकल्प १६ तालुक्यातील ३०२ गावांमध्ये राबविला जात आहे. यात ५ हेक्टरपर्यंच्या शेतक-यांना नोंदणी करता येते. जिल्ह्यातील १२ हजार ८३० शेतक-यांना या योज

कृषि महोत्सवात जिल्हास्तरीय खरेदीदार विक्रेता संमेलन

यवतमाळ दि. १७ मार्च(जिमाका) :- जिल्हा कृषी महोत्सवामध्ये प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेंतर्गत खरेदीदार विक्रेता संमेलनाचे आयोजन २१ मार्च रोजी सकाळी ११ वाजता समता मैदान ( पोस्टल ग्राउंड) येथे करण्यात आले आहे. या संमेलनामध्ये यवतमाळ जिल्हातील तसेच अमरावती, अकोला, वाशीम, नागपूर, वर्धा व इतर जिल्ह्यातील खरेदीदार, विक्रेते (PMFME)पीएमएफएमई योजनेचे लाभार्थी, शेतकरी उत्पादक कंपनी/ गट/ संस्था, स्वयं सहायता गटमहिला बचत गट, सहकारी संस्था, व्यापारी व विक्रेता संघ, निर्यातदार यांना एका व्यासपीठावर आणण्यात येत आहे. यामाध्यामातुन त्यांना एकमेकाशी जोडून ओळख निर्माण करणे, कृषि प्रक्रिया उत्पादने व कच्च्या मालाच्या विक्रीसाठी परस्पर व्यवसाय व व्यापाराच्या संधी उपलब्ध होऊन त्या भविष्यात वृधिंगत व्हाव्यात या उद्देशाने हे संमेलन राबविण्यात येत आहे. या संमेलनाचा लाभ जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधव व़ महिला भगिनींनी घ्यावा असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर यांनी केले आहे.

जिल्हा खनिज प्रतिष्ठान निधीतील कामे वेळेत पूर्ण करण्याच्या जिल्हाधिकारी यांच्या सुचना जिल्हा खनिज प्रतिष्ठान निधीतील कामाचा घेतला आढावा

यवतमाळ, दि १७ मार्च :- यवतमाळ जिल्हा खनिज प्रतिष्ठान निधी अंतर्गत मंजूर प्रलंबित कामे संबंधित विभागांनी वेळेच्या आत पूर्ण करावीत अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिल्यात. काही विभागांनी पाच वर्षापासून कामे पूर्ण न केल्याबद्दल जिल्हाधिकारी यांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत अशा विभागांना यापुढे खनिज विकास निधीतून निधी दिला जाणार नाही असा इशारा दिला. यवतमाळ जिल्हा खनिज प्रतिष्ठान निधी अंतर्गत मंजूर कामाच्या प्रगतीचा आढावा जिल्हाधिकारी यांनी महसूल भावन येथे घेतला यावेळी ते बोलत होते. या बैठकीला जिल्हा खनिकर्म अधिकारी डॉ. शिरीष नाईक जिल्हा नियोजन अधिकारी मुरलीनाथ वाडेकर तसेच संबंधित विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते. जिल्ह्यात खाणीमुळे प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष बाधित झालेले १४० गावांची यादी जिल्हा प्रशासनाने तयार करण्यात केली आहे. यामध्ये आरोग्य विभाग, ग्रामीण पाणीपुरवठा शिक्षण, क्रीडा विभाग, जिल्हा परिषद बांधकाम व सार्वजनीक बांधकाम विभाग, पर्यावरण, वनविभाग, कौशल्य विकास इत्यादी विभागांनी या भागातील गावांचा उच्च प्राथम्य व अन्य प्राथम्य याआधारे विकास करण्यासाठी कामांचे प्

महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना प्रोत्साहनपर योजनेतील ३६१३ लाभार्थ्यांची यादी प्रसिध्द

यवतमाळ दि. १६ मार्च (जिमाका) :- महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ अंतर्गत प्रोत्साहनपर योजनेचे पोर्टलवर ३ हजार ६१३ लाभार्थ्यांची विशिष्ट क्रमांकाची यादी आधार प्रमाणिकरणासाठी प्रसिध्द करण्यात आली आहे. त्याअनुषंगाने या यादीत नावे असलेल्या लाभार्थ्यांनी त्यांचे बँक बचत खात्याचे पासबुक व आधार कार्डसह जवळचे सेतू सुविधा केंद्रावर जाऊन त्वरित आधार प्रमाणिकरण करुन घ्यावे. असे आवाहन जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण यांनी केले आहे.

बारावी विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांनी जात प्रमाणपत्र पडताळणीचे प्रस्ताव सादर करावे

यवतमाळ,दि.१६ मार्च (जिमाका):-सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षात १२ वी विज्ञान अभ्यासक्रमात प्रवेशित विद्यार्थ्यांनी जात प्रमाणपत्र पडताळणीचे प्रस्ताव ३१ मार्च २०२३ पर्यंत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती,यवतमाळ या कार्यालयात सादर करावे. प्रस्ताव सादर करतांना (सीइटी,एनइइटी,जेईई) इ.च्या समाईक पुर्व परीक्षेचे आवेदन पत्र जोडून प्रस्ताव सादर करावा, असे आवाहन संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या श्रीमती.मंगला मुन यांनी केले आहे. 0000

आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्षानिमित्य रांगोळी व पाककला स्पर्धेचे आयोजन १७ मार्चपर्यंत नावे नोंदवावी

यवतमाळ दि. १६ मार्च(जिमाका) :- कृषी विभाग व महिला आर्थीक विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने यवतमाळ येथे १८ मार्च ते २२ मार्चपर्यंत जिल्हा कृषि महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या कृषि महोत्सवा दरम्यान फक्त महिलांसाठी रांगोळी व पाककला खुली स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. यासाठी १७ मार्चपर्यंत सहभागी महिलांची नोंदणी स्वीकारण्यात येईल. स्पर्धेचे स्थळ समता मैदान (पोस्टल ग्राऊंड)यवतमाळ आहे. रांगोळी स्पर्धेचा विषय पौष्टीक तृणधान्य असुन रांगोळीसाठी ज्वारी, बाजरी, नाचणी, भगर, राळा,कोदा, कुटकी, सावा व राजगिरा इत्यादी तृणधान्य, फुले इतर आवश्यक साहित्याचा वापर करायचा आहे. रांगोळी काढण्यासाठी आवश्यक लाकडी बोर्ड किंवा हार्ड बोर्ड सर्व साहीत्य १ बाय १ मीटर चा वापर करणे बंधनकारक आहे. ही स्पर्धा दिनांक १९ मार्च रोजी दुपारी २ ते ३ वाजता आयोजीत केली असुन स्पर्धकास १ तासाचा वेळ देण्यात येईल. पाककला स्पर्धेचा विषय पौष्टीक तृणधान्य पासुन तयार करण्यात आलेले पदार्थ असुन ज्वारी, बाजरी,नाचणी,भगर राळा कोदा, कुटकी, सावा व राजगिरा या तृणधान्य साहित्यापासुनच बनविण्यात आलेला पदार्थ हा घरुन तयार करुन आणाव

उदयोन्मुख उद्योजकांना बॅंकांनी कर्ज उपलब्ध करुन द्यावे -जिल्हाधिकारी अमोल येडगे

यवतमाळ, दि १६ मार्च:- जिल्ह्यात रोजगाराच्या संधी निर्माण होण्यासाठी नवीन उद्योजक तयार होणे आवश्यक आहे. त्यासाठी शासनाच्या विविध योजनेतून उद्योग स्थापित करू इच्छिणाऱ्या उदयोन्मुख उद्योजकांना बँकांनी सकारात्मक दृष्टिकोनातुन कर्ज उपलब्ध करून देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी काल जिल्हास्तरीय बँकिंग समितीच्या बैठकित दिल्यात. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या आढावा बैठकीला रिझर्व बँक ऑफ इंडियाचे उपमहाप्रबंधक शशांक हरदेनिया, नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक दीपक पेंदाम, युनियन बँकेचे उपमहाप्रबंधक प्रदीप ठाकूर, बँक ऑफ बडोदाचे मुख्य प्रबंधक आर.एम सोमकुवर, आरसेटीचे विजयकुमार भगत, बँक ऑफ इंडियाचे श्री पाटील, जिल्हा बँक व्यवस्थापक अमर गजभिये, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक वैशाली रसाळ, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी क्रांती काटोले, जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक श्री निकम, तसेच मावीम, उमेद,आणि विविध महामंडळाचे अधिकारी बॅंकांचे अधिकारी उपस्थित होते. नवीन उद्योजकांनी उद्योग सुरू करण्

मिनी ट्रक्टर योजनेसाठी बचतगटांनी २० मार्चपर्यत अर्ज करावे

यवतमाळ दि. १३ मार्च (जिमाका) :- अनुसूचित जाती / नवबौध्द घटकांतील बचत गटाकरीता ९० टक्के अनुदानावर मिनी टॅक्टर योजना राबविण्यात येत आहे. यवतमाळ जिल्ह्यातील अनुसूचित जातीच्या ब़चतगटांनी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय यवतमाळ येथे २० मार्च २०२३ पर्यत अर्ज सर्व कागदपत्रासह सादर करण्यात यावे, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यवतमाळ यांनी केले आहे.

जिल्ह्यातील तरूण-तरूणींनी प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा

यवतमाळ,दि.१४ मार्च (जिमाका):-प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेंतर्गत अल्पमुदतीचे व्यवसाय प्रशिक्षण देण्यात येणार आहे. १८ ते ४५ वर्ष वयोगटातील जिल्ह्यातील युवा तरूण-तरूणी यांना रोजगार मिळणे करिता व कौशल्य प्रशिक्षण औद्योगिक प्रशिक्षण संस्था धामणगाव रोड,यवतमाळ येथे देण्यात येणार आहे. यासाठी निशुल्क प्रवेश देणे सुरू असुन नोंदणी प्रक्रिया २५ मार्च २०२३ पर्यंत सुरू आहे. ईच्छुक उमेदवारांनी मूळ प्रमाणपत्राच्या छायांकित प्रतिसह अर्ज सादर करावा. सदर प्रशिक्षणाचा एकूण कालावधी हा ४५० तासाचा असणार आहे. या योजनेंतर्गत आठ प्रकारचे नि:शुल्क प्रशिक्षण देण्यात येणार आहे. टू व्हीलर सर्विस टेक्निशियन, चार चाकी सर्विस टेक्निशियन, सी.एन.सी. ऑपरेटर टर्निंग, सी.एन.सी. ऑपरेटर, व्हर्टिकल मशीनिंग सेंटर, असिस्टंट सेंटरिंग कारपेंटर, इलेक्ट्रिशन डोमेस्टिक सोल्युशन, डोमेस्टिक डाटा एन्ट्री ऑपरेटर तसेच ब्युटी थेरपिस्ट (फक्त मुलींकरिता) असून सदर प्रशिक्षणासाठी निशुल्क प्रवेश देणे सुरू आहे. नोंदणी प्रक्रिया २५ मार्च २०२३ पर्यंत सुरू असून ईच्छुक उमेदवारांनी मूळ प्रमाणपत्राच्या कॉपीसह संस्थेचे समन्वयक श्री.चव्ह

बेवारस वाहनांचा जाहीर लिलाव

यवतमाळ,दि.१४ मार्च (जिमाका):-यवतमाळ जिल्हा ग्रामीण पोलीस स्टेशन येथील बेवारस असेलली दुचाकी,तीन चाकी वाहनांचा लिलाव १६ मार्च २०२३ रोजी केला जाणर आहे. सदर वाहने बोलीनुसार हर्रास केली जाणर असून इच्छुक बोलीदार व्यक्तीस अनामत रक्कम रू १० हजार रोख स्वरूपात भारावयची आहे.तरी सदर वाहने घेऊ इच्छित असणाऱ्यांनी सदर बोली,हर्रासीसाठी पोलीस स्टेशन ग्रामीण,यवतमाळ येथे संपर्क साधावा.असे आवाहन पोलीस निरीक्षक, प्रकाश तुनकलवार यांनी केले आहे.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामार्फत कर्ज योजनेसाठी लाभार्थी निवड लॉटरी पद्धतिने

यवतमाळ,दि.१४ मार्च (जिमाका):- साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामार्फत प्रकल्प मर्यादा एक लाख रुपये थेट कर्ज योजनेंतर्गंत कर्ज मिळविण्याकरिता प्रस्ताव सादर केलेल्या सर्व पात्र लाभार्थ्यांची निवड चिठ्ठीद्वारे (लॉटरी पध्दतीने) होणार आहे. २१ मार्च २०२३ रोजी सकाळी ११ वाजता बचत भवन जिल्हाधिकारी कार्यालय,येथे निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे यांच्या अध्यक्षतेखाली कर्ज प्रकरण बैठकित सदर निवड करण्यात येणार आहे. मांतग,मांग,मांग-गारोडी,मादगी व मादिगा समाजातील कर्ज प्रकरण दाखल केलेल्या लाभार्थ्यांनी २१ मार्च २०२३ रोजी सकाळी ११ वाजता बचत भवन जिल्हाधिकारी कार्यालय,यवतमाळ येथे उपस्थित राहवे.तसेच महामंडळाच्या कार्यालयात स्वत: संपर्क साधून कर्ज प्रकरण यादीमध्ये समाविष्ट असल्याची खात्री करून घ्यावी. तसेच काही तक्रार असल्यास महामंडळाच्या जिल्हा कार्यालय यवतमाळ येथे संपर्क साधावा असे जिल्हा व्यवस्थापक साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ (मर्या),यांनी कळविले आहे.

स्मार्ट प्रकल्पांतर्गत उपप्रकल्पासाठी २१ मार्चपर्यंत अर्ज आमंत्रित

यवतमाळ,दि.१४ मार्च (जिमाका):- हिंदु ह्रुदयसम्राट बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पांतर्गत यवतमाळ जिल्ह्यातील समुदाय आधारित संस्थांकडून (FPO/FPC) मुल्यसाखळी विकासाचे उपप्रकल्प राबविण्यासाठी २१ मार्चपर्यंत अर्ज मागविण्यात येत आहे. सदर अर्ज हे शेतमाल मुल्यसाखळी विकासाच्या उपप्रकल्पासाठी आहेत.मुल्यसाखळी विकासाचे उत्पादक भागीदारी उपप्रकल्प आणि बाजार संपर्क वाढ उप प्रकल्पा साठी सदर अर्ज मागविण्यात येत असून.अर्ज सादर करण्यासाठी पात्र समुदाय आधारित संस्थांमध्ये शेतकरी उत्पादक कंपनी आणि त्यांचे फेडरेशन्स यांचा समावेश अवश्यक आहे. प्राप्त होणाऱ्या अर्जापैकी पात्र स्पर्धात्मक व उत्कृष्ट अर्जांना प्रकल्पाच्या ६० टक्के अनुदान उपलब्ध होणार आहे. अर्ज सादर करण्यासाठी पात्रतेचे निकष,अर्जाचा नमुना इत्यादी माहिती www.smart-mh.org या संकेतस्थळावर उपलब्ध असून इच्छुकांनी अर्जाचा नमुना संकेतस्थळावरून डाऊनलोड करावा. किंवा जिल्हा अंमलबजावणी कक्ष (स्मार्ट) तथा प्रकल्प संचालक (आत्मा) कार्यालय,यवतमाळ येथून घ्यावा. परिपूर्ण माहिती भरून आवश्यक कागदपत्रे सोबत ज

सर्वत्र महिलाराज यावे -जिल्हाधिकारी अमोल येडगे माविमतर्फे जागतिक महिला दिनाचे आयोजन

यवतमाळ दिनांक 8 मार्च जिमाका:- सामाजिक सुधारणा असोत की उद्योग क्षेत्रातील भरारी, महिलांची कर्तबगारी आज सर्वच क्षेत्रात पाहायला मिळत आहेत. शासन प्रशासन या ठिकाणी महिला चांगलं काम करीत आहेत. त्यामुळे ३६५ दिवस घरीदारी समाजात सर्वत्र महिलाराज यावे,असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले. जागतिक महिला दिन निमित्ताने बचत भवन येथे माविम आणि जिल्हा प्रशसनाच्या वतीने महिला दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी बोलत होते. व्यासपीठावर निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार व-हाडे, उपजिल्हाधिकारी सविता चौधर, उपजिल्हाधिकारी (रोहयो) संगीता राठोड, खनिकर्म अधिकारी शिरिष नाईक, जिल्हा बॅंक व्यवस्थापक अमर गजभिये, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी क्रांती काटोले,मानव विकासचे जिल्हा नियोजन अधिकारी, जिल्हा माहिती अधिकारी मनीषा सावळे, कौशल्य विकास व उद्योजकता विभागाच्या सहाय्यक आयुक्त विद्या शितोळे, माविमचे जिल्हा समन्वयक रंजन वानखेडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर आदी मान्यवर उपस्थित होते. महिलांना उपजवीकेचे साधन उपलब्ध करून देणे हा मुख्यता माविमचा उद्

धुलीवंदन ‍निमित्त मद्यविक्री अनुज्ञप्त्या बंद*

यवतमाळ, दि ३ मार्च (जिमाका) :- यवतमाळ जिल्ह्यात ७ मार्च रोजी धुलीवंदन सण साजरा होणार आहे. सदर दिवशी कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहावी यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यातील सर्व किरकोळ व घाउक मद्य विक्रीच्या अनुज्ञप्त्या मद्य विक्रीकरिता बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिले आहे. बंदच्या कालावधीत अनुज्ञप्ती मद्य विक्रीसाठी उघडी ठेवू नये, तसे आढळूनआल्यास संबंधीत अनुज्ञप्ती व अनुज्ञप्तीधारका विरुध्द कठोर कार्यवाही करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी यांच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

सामाजिक समता शिवा पुरस्कारासाठी १७ मार्च पर्यंत अर्ज आमंत्रित*

यवतमाळ, दि २ मार्च (जिमाका):- वीरशैव लिंगायत समाजाकरिता सामाजिक शैक्षणिक, सांस्कृतिक,समाज संघटनात्म़क, आध्यात्मिक प्रबोधन व आर्थिकदृष्टया कल्याणासाठी झटणारे नामवंत समाजसेवक, कलावंत, समाज संघटनात्मक कार्यकर्ते, आध्यात्मीक प्रबोधनकार व साहित्यिक यांना सामाजिक समता शिवा पुरस्कार देण्यात येतो. यासाठी १७ मार्च पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहे. व्यक्तिगत कार्यासाठी १ व सामाजिक संस्थेमधुन १ असा हा पुरस्कार देण्यात येतो. कमीत कमी १० वर्षे वैयक्तीक किंवा संघटनात्मक अभिजात कार्य करणाऱ्या व्यक्ती या पुरस्कारास पात्र असतील. यासाठी वयोमर्यादा पुरुष वय ५० वर्षे अथवा त्यापेक्षा जास्त, महिला ४० वर्षे अथवा त्यापेक्षा जास्त असावे. सामाजिक संस्थासाठी पात्रता – संस्था पब्लिक चॅरीटेबल ट्रस्ट व सोसायटीज रजिस्ट्रेशन ॲक्ट १९६० खाली नोंदणीकृत असावी.स्वयंसेवी संस्थेचे समाजकल्याण क्षेत्रातील सेवा व कार्य १० वर्षाहून अधिक असावे. स्वयंसेवी संस्था राजकारणापासून अलिप्त असावी. सदर पुरस्कारासाठी अर्जाचा नमुना सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यवतमाळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन पोलिस दक्षता भवन येथे विन

जिल्हास्तरीय “शेजार युवा संसद” कार्यक्रम जाजू महाविद्यालय येथे संपन्न* * काळानुसार युवकांनी नवे तंत्रज्ञान आत्मसात करावे* *- ललितकुमार व-हाडे*

यवतमाळ,दि.३ मार्च.(जिमाका):-काळात सतत बदल होत आहे. काळानुसार युवकांनी नवे तंत्रज्ञान व नव्या गोष्टी आत्मसात करणे आवश्यक आहे. सध्या देशात आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष साजरे केले जात असतांना युवाकांनी तृणधान्य काय आहे व याचा रोजच्या आहारात उपयोग व आरोग्यास किती फायद्याचे आहे याबाबत माहिती घ्यावी. तसेच आपल्या देशात जी-२० परिषद होत असतांना युवकांनी या परिषद बाबात जाणून घेतले पाहिजे,असे निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे यांनी कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रंसगी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना सांगितले. संयुक्त राष्ट्रसंघाने सन २०२३ हे वर्ष “आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून घोषित केले आहे. त्याअनुषंगाने जी-२० परिषद व तृणधान्य या विषयावर नेहरू युवा केंद्र,युवा कार्यक्रम व क्रिडा मंत्रालय,भारत सरकार यांच्या संयुक्त माध्यमातून जिल्हास्तरीय “शेजार युवा संसद” कार्यक्रमाचे आयोजन जाजू महाविद्यालय येथे करण्यात आले होते. सदर कार्यक्रमास जाजू एज्युकेशन संस्थेचे प्रकाश जाजू, सचिव आशिष जाजू, कोषाध्यक्षा शिल्पा जाजू, अमोलकचंद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.राममनोहर मिश्रा