जिल्ह्यातील तरूण-तरूणींनी प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा

यवतमाळ,दि.१४ मार्च (जिमाका):-प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेंतर्गत अल्पमुदतीचे व्यवसाय प्रशिक्षण देण्यात येणार आहे. १८ ते ४५ वर्ष वयोगटातील जिल्ह्यातील युवा तरूण-तरूणी यांना रोजगार मिळणे करिता व कौशल्य प्रशिक्षण औद्योगिक प्रशिक्षण संस्था धामणगाव रोड,यवतमाळ येथे देण्यात येणार आहे. यासाठी निशुल्क प्रवेश देणे सुरू असुन नोंदणी प्रक्रिया २५ मार्च २०२३ पर्यंत सुरू आहे. ईच्छुक उमेदवारांनी मूळ प्रमाणपत्राच्या छायांकित प्रतिसह अर्ज सादर करावा. सदर प्रशिक्षणाचा एकूण कालावधी हा ४५० तासाचा असणार आहे. या योजनेंतर्गत आठ प्रकारचे नि:शुल्क प्रशिक्षण देण्यात येणार आहे. टू व्हीलर सर्विस टेक्निशियन, चार चाकी सर्विस टेक्निशियन, सी.एन.सी. ऑपरेटर टर्निंग, सी.एन.सी. ऑपरेटर, व्हर्टिकल मशीनिंग सेंटर, असिस्टंट सेंटरिंग कारपेंटर, इलेक्ट्रिशन डोमेस्टिक सोल्युशन, डोमेस्टिक डाटा एन्ट्री ऑपरेटर तसेच ब्युटी थेरपिस्ट (फक्त मुलींकरिता) असून सदर प्रशिक्षणासाठी निशुल्क प्रवेश देणे सुरू आहे. नोंदणी प्रक्रिया २५ मार्च २०२३ पर्यंत सुरू असून ईच्छुक उमेदवारांनी मूळ प्रमाणपत्राच्या कॉपीसह संस्थेचे समन्वयक श्री.चव्हाण यांच्याशी कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा असे आवाहन औद्योगिक प्रशिक्षण संस्थचे प्राचार्य व्ही. जे.नागोरे यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी