जिल्हा खनिज प्रतिष्ठान निधीतील कामे वेळेत पूर्ण करण्याच्या जिल्हाधिकारी यांच्या सुचना जिल्हा खनिज प्रतिष्ठान निधीतील कामाचा घेतला आढावा

यवतमाळ, दि १७ मार्च :- यवतमाळ जिल्हा खनिज प्रतिष्ठान निधी अंतर्गत मंजूर प्रलंबित कामे संबंधित विभागांनी वेळेच्या आत पूर्ण करावीत अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिल्यात. काही विभागांनी पाच वर्षापासून कामे पूर्ण न केल्याबद्दल जिल्हाधिकारी यांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत अशा विभागांना यापुढे खनिज विकास निधीतून निधी दिला जाणार नाही असा इशारा दिला. यवतमाळ जिल्हा खनिज प्रतिष्ठान निधी अंतर्गत मंजूर कामाच्या प्रगतीचा आढावा जिल्हाधिकारी यांनी महसूल भावन येथे घेतला यावेळी ते बोलत होते. या बैठकीला जिल्हा खनिकर्म अधिकारी डॉ. शिरीष नाईक जिल्हा नियोजन अधिकारी मुरलीनाथ वाडेकर तसेच संबंधित विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते. जिल्ह्यात खाणीमुळे प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष बाधित झालेले १४० गावांची यादी जिल्हा प्रशासनाने तयार करण्यात केली आहे. यामध्ये आरोग्य विभाग, ग्रामीण पाणीपुरवठा शिक्षण, क्रीडा विभाग, जिल्हा परिषद बांधकाम व सार्वजनीक बांधकाम विभाग, पर्यावरण, वनविभाग, कौशल्य विकास इत्यादी विभागांनी या भागातील गावांचा उच्च प्राथम्य व अन्य प्राथम्य याआधारे विकास करण्यासाठी कामांचे प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना त्यांनी दिल्यात. १५ एप्रील च्या आत सदर विभागांनी प्रस्ताव सादर करण्यास त्यांनी सांगितले. खनिज प्रतिष्ठान निधीतुन प्राथमिक आरोग्य केंद्रातील स्वच्छतागृह तसेच दुर्धर आजारासाठी मदत करण्याचे नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्यात. शिक्षण विभागाला शाळा दुरुस्ती, वर्ग खोल्यांची दुरुस्ती, स्वच्छतागृह आणि स्वच्छ पिण्याचे पाणी यासाठी त्याचबरोबर ज्या शाळांची पटसंख्या चांगली आहे त्या शाळा डिजिटल व आदर्श शाळा करण्यासाठी प्रास्ताव सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्यात. ई-शिक्षण, वाचनालय, क्रीडा संवर्धन यासाठी सुद्धा त्यांनी प्रस्ताव मागवला. त्याचबरोबर शासकिय कार्यालयात रेन वॉटर हार्वेस्टिंग, सौर वीज निर्मीती,भौतिक पायाभुत सुविधामध्ये जिल्हा परिषद अंतर्गत येणारे ग्रामिण रस्ते, ग्रामपंचायत इमारत व इतर शासकीय कार्यालये इत्यादी कामासाठी प्रस्ताव तयार करण्याच्या सुचना श्री येडगे यांनी दिल्यात. विभागांकडे निधी पडुन राहु नये यासाठी मासिक प्रगती अहवाल सादर करण्यात यावा. तसेच सर्व विभागांनी एक वर्षाच्या आत कामे पूर्ण करावित. वर्षभरात काम पूर्ण न करणा-या विभागांचा निधी परत घ्यावा आणि काम पूर्ण झाल्यावरच निधी देण्याच्या सुचना जिल्हाधिकारी यांनी आज दिल्यात. बैठकिला जिल्हा परिषद लेखाधिकारी ज्योती भोंडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री मुकडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रल्हाद चव्हाण जिल्हा चिकित्सक डॉ. आर.डी राठोड, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी क्रांती काटोले, कौशल्य विकास व उद्योजकता सहाय्यक आयुक्त विद्या शितोळे, जिल्हा क्रिडा अधिकारी नंदा खुरपुडे, जलसंधारण अधिकारी तसेच इतर विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी