सामाजिक समता शिवा पुरस्कारासाठी १७ मार्च पर्यंत अर्ज आमंत्रित*

यवतमाळ, दि २ मार्च (जिमाका):- वीरशैव लिंगायत समाजाकरिता सामाजिक शैक्षणिक, सांस्कृतिक,समाज संघटनात्म़क, आध्यात्मिक प्रबोधन व आर्थिकदृष्टया कल्याणासाठी झटणारे नामवंत समाजसेवक, कलावंत, समाज संघटनात्मक कार्यकर्ते, आध्यात्मीक प्रबोधनकार व साहित्यिक यांना सामाजिक समता शिवा पुरस्कार देण्यात येतो. यासाठी १७ मार्च पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहे. व्यक्तिगत कार्यासाठी १ व सामाजिक संस्थेमधुन १ असा हा पुरस्कार देण्यात येतो. कमीत कमी १० वर्षे वैयक्तीक किंवा संघटनात्मक अभिजात कार्य करणाऱ्या व्यक्ती या पुरस्कारास पात्र असतील. यासाठी वयोमर्यादा पुरुष वय ५० वर्षे अथवा त्यापेक्षा जास्त, महिला ४० वर्षे अथवा त्यापेक्षा जास्त असावे. सामाजिक संस्थासाठी पात्रता – संस्था पब्लिक चॅरीटेबल ट्रस्ट व सोसायटीज रजिस्ट्रेशन ॲक्ट १९६० खाली नोंदणीकृत असावी.स्वयंसेवी संस्थेचे समाजकल्याण क्षेत्रातील सेवा व कार्य १० वर्षाहून अधिक असावे. स्वयंसेवी संस्था राजकारणापासून अलिप्त असावी. सदर पुरस्कारासाठी अर्जाचा नमुना सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यवतमाळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन पोलिस दक्षता भवन येथे विनामुल्य उपलब्ध आहे. अर्जासोबत नुकतेच काढलेले पासपोर्ट साईज फोटो ३ प्रतीत, वयाचा दाखला, शैक्षणिक पुरावा, सामाजिक कार्याची व त्या संबंधीत पुरावे, पोलिस विभागाचा चारीत्र्य पडताळणी दाखला सर्व तीन प्रतीत जोडणे आवश्यक आहे.अधिक माहिती करीता अर्जदारांनी १७ मार्च २०२३ पर्यंत या कार्यालयात अर्ज सादर करुन कार्यालयीन वेळेत संपर्क करावा असे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण भाऊराव चव्हाण यांनी कळविले आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी