स्मार्ट प्रकल्पांतर्गत उपप्रकल्पासाठी २१ मार्चपर्यंत अर्ज आमंत्रित

यवतमाळ,दि.१४ मार्च (जिमाका):- हिंदु ह्रुदयसम्राट बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पांतर्गत यवतमाळ जिल्ह्यातील समुदाय आधारित संस्थांकडून (FPO/FPC) मुल्यसाखळी विकासाचे उपप्रकल्प राबविण्यासाठी २१ मार्चपर्यंत अर्ज मागविण्यात येत आहे. सदर अर्ज हे शेतमाल मुल्यसाखळी विकासाच्या उपप्रकल्पासाठी आहेत.मुल्यसाखळी विकासाचे उत्पादक भागीदारी उपप्रकल्प आणि बाजार संपर्क वाढ उप प्रकल्पा साठी सदर अर्ज मागविण्यात येत असून.अर्ज सादर करण्यासाठी पात्र समुदाय आधारित संस्थांमध्ये शेतकरी उत्पादक कंपनी आणि त्यांचे फेडरेशन्स यांचा समावेश अवश्यक आहे. प्राप्त होणाऱ्या अर्जापैकी पात्र स्पर्धात्मक व उत्कृष्ट अर्जांना प्रकल्पाच्या ६० टक्के अनुदान उपलब्ध होणार आहे. अर्ज सादर करण्यासाठी पात्रतेचे निकष,अर्जाचा नमुना इत्यादी माहिती www.smart-mh.org या संकेतस्थळावर उपलब्ध असून इच्छुकांनी अर्जाचा नमुना संकेतस्थळावरून डाऊनलोड करावा. किंवा जिल्हा अंमलबजावणी कक्ष (स्मार्ट) तथा प्रकल्प संचालक (आत्मा) कार्यालय,यवतमाळ येथून घ्यावा. परिपूर्ण माहिती भरून आवश्यक कागदपत्रे सोबत जोडून शेतकरी उत्पादक कंपन्यांनी जिल्ह्याच्या प्रकल्प संचालक (आत्मा) कार्यालयत दिनांक २१ मार्च २०२३पर्यंत कार्यालयीन वेळेत अर्ज सादर करावे, असे आवाहन प्रकल्प संचालक आत्मा यांच्याकडून करण्यात आले आहे. ०००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी