सर्वत्र महिलाराज यावे -जिल्हाधिकारी अमोल येडगे माविमतर्फे जागतिक महिला दिनाचे आयोजन

यवतमाळ दिनांक 8 मार्च जिमाका:- सामाजिक सुधारणा असोत की उद्योग क्षेत्रातील भरारी, महिलांची कर्तबगारी आज सर्वच क्षेत्रात पाहायला मिळत आहेत. शासन प्रशासन या ठिकाणी महिला चांगलं काम करीत आहेत. त्यामुळे ३६५ दिवस घरीदारी समाजात सर्वत्र महिलाराज यावे,असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले. जागतिक महिला दिन निमित्ताने बचत भवन येथे माविम आणि जिल्हा प्रशसनाच्या वतीने महिला दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी बोलत होते. व्यासपीठावर निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार व-हाडे, उपजिल्हाधिकारी सविता चौधर, उपजिल्हाधिकारी (रोहयो) संगीता राठोड, खनिकर्म अधिकारी शिरिष नाईक, जिल्हा बॅंक व्यवस्थापक अमर गजभिये, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी क्रांती काटोले,मानव विकासचे जिल्हा नियोजन अधिकारी, जिल्हा माहिती अधिकारी मनीषा सावळे, कौशल्य विकास व उद्योजकता विभागाच्या सहाय्यक आयुक्त विद्या शितोळे, माविमचे जिल्हा समन्वयक रंजन वानखेडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर आदी मान्यवर उपस्थित होते. महिलांना उपजवीकेचे साधन उपलब्ध करून देणे हा मुख्यता माविमचा उद्देश आहे. जिल्ह्यात ८० हजार महिलांचे बचत गट मावींकडे नोंदवलेले आहेत. बचत गटाच्या माध्यमातुन अगदी व्यावसाईक पद्धतीने महिलांनी उद्योग सुरु केले आहेत. यामुळे ग्रामिण भागातील महिलांच्या हाती पैसा आला आहे. यासोबतच त्यांना समाजात त्यांचे विचार, मत मांडण्याची संधीही मिळत आहे. सामाजिक सुधारणा आणि महिलांच्या सक्षमीकरणासाठी महिलांनीच पुढे यावे. समाजकारण असो की राजकारण की उद्योग क्षेत्र महिलांनी सर्वत्र त्यांच्या कामाचा ठसा उमटवलेला आहे. शांताबाईंना ऐकुन जिल्हाधिका-यांना आजीची आठवण माविमच्या सी एम आर सी अध्यक्ष असलेल्या शांताबाई ईंगळे यांनी अतिशय सुंदर पद्धतीने महिलांना मार्गदर्शन केले. त्यांची भाषणशैली पाहुन जिल्हाधिकारी यांना त्यांच्या आजीची आठवण झाल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या अध्यक्ष संगिता राठोड यांनी महिलांनी रोजगार हमी योजनेच्या माध्यमातुन योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. महिला दिन हा केवळ एक दिवस साजरा न करता 365 दिवस आनंदाने साजरा करून तुम्ही तुमच्या कुटुंबाला, गावाला आनंदी आणि सुखी करू शकता असेही त्या म्हणाल्या. आपण स्वतः एक महिला असताना आपल्या मुलगा आणि मुलीला समान वागणूक द्यावी. तसेच घरात येणाऱ्या सुनेला मुलीप्रमाणे स्वीकारण्याचे धैर्य महिलांनी दाखवावे. कस्तुरीचा आपण स्वतः शोध घेऊन इतरांच्या जीवनातही कस्तुरीचा सुगंध दरवळू असे प्रतिपादन सुनिता चौधर यांनी केले. यावेळी क्रांती काटोले, विद्या शितोळे, मनिषा सावळे, मानव विकास जिल्हा नियोजन अधिकारी, शांताबाई ईंगळे यांनीही महिलांना मार्गदर्शन केले. यावेळी महिलांना उद्योग उभारण्यासाठी आय सी आय सी आय बॅंकेमार्फत मंजुर कर्जाचे वितरण करण्यात आले.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी