वनविभागाने सामुहिक वनहक्क मिळालेल्या ७६७ गावांचे वनक्षेत्र निश्चित करून द्यावे -जिल्हाधिकारी अमोल येडगे

-जिल्हास्तरीय अभिसरण समितीचा घेतला आढावा यवतमाळ ,दि २८ जिमाका:- सामूहिक वन हक्क मिळालेल्या ७६७ गावांना व्यवस्थापन आराखडे तयार करण्यासाठी गावांच्या वनहक्काचे क्षेत्र निश्चित करून देणे आवश्यक आहे. यासाठी पंचायत समिती, महसूल विभाग, पुसद व पांढरकवडा प्रकल्प अधिकारी यांनी वन विभागाशी समन्वय साधुन गावांचे वन क्षेत्र निश्चित करून त्याप्रमाणे वनविभागाकडून नकाशे उपलब्ध करून घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आज दिल्यात. जिल्हास्तरीय अभिसरण समितीची आढावा बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवन येथे पार पडली. यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते. या बैठकिला सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी, पांढरकवडा याशिनी नागराजन,उपवनसंरक्षक पांढरकवडा किरण जगताप, उपवनसंरक्षक यवतमाळ धनंजय वायभासे, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार व-हाडे, उपजिल्हाधिकारी रोहियो संगीता राठोड, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर तसेच पुसद प्रकल्प अधिकारी आत्माराम धाबे,उपमुख्य कार्यकारी अधिकारी, पंचायत, तहसीलदार महसूल, भाग्यश्री देशमुख ,सहायक प्रकल्प अधिकारी, पांढरकवडा श्री. सोनार, तहसीलदार गटविकास अधिकारी उपस्थित होते. जिल्हास्तरीय अभिसरण समिती प्रमाणेच तालुकास्तरावर सुद्धा तालुकास्तरीय अभिसरण समिती गठीत करावी. तसेच या समित्यांचे बँकेमध्ये खाते उघडावे. त्याचबरोबर तालुकास्तरीय समितीने प्रत्येक महिन्याला समितीची बैठक घेऊन आराखडे तयार करण्याबाबत पाठपुरावा करावा अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्यात. सामूहिक वनहक्क व्यवस्थापन समितीचे व्यवस्थापन आराखडे तयार करण्यासाठी समित्यांचे प्रशिक्षण घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्यात. या समित्यांचे तालुका निहाय प्रशिक्षण घेताना क्लस्टरनिहाय प्रशिक्षण घ्यावे जेणेकरून समित्यांना सूक्ष्म प्रशिक्षण देता येईल तसेच त्यांच्या अडचणी सोडवता येतील. प्रशिक्षण झाल्यानंतर सुद्धा व्यवस्थापन आराखडे पूर्ण करण्यासाठी गावांना जिल्हास्तरीय समिती सपोर्ट आणि मार्गदर्शन करेल. पुढील चार महिन्यात प्रशिक्षण आणि व्यवस्थापन आराखडे पूर्ण करण्याच्या सुचना जिल्हाधिकारी यांनी दिल्यात. वैयक्तिक वनहक्क प्राप्त झालेल्या ८७३ व्तक्तींना कृषी विभागाच्या जास्तीत जास्त योजनांचा लाभ मिळवून द्यावा. तसेच सर्व विभागांनी वन हक्क प्राप्त झालेल्या लाभार्थ्यांना त्यांच्या योजनांचा लाभ मिळवून देऊन त्यांची आर्थिक उन्नती होईल याकडे लक्ष द्यावे. सामूहिक वनहक्क प्राप्त झालेल्या गावांमध्ये रोहयोमधुन २१ प्रकारची कामे घेता येतात. यामध्ये वनविभागाची कामे मोठ्या प्रमाणात आहेत. वनविभागाने पुढाकार घेऊन ही कामे त्या त्या गावांमध्ये सुरू करावीत अशा सूचनाही जिल्हाधिकारी यांनी दिल्यात.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी