आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्षानिमित्य रांगोळी व पाककला स्पर्धेचे आयोजन १७ मार्चपर्यंत नावे नोंदवावी

यवतमाळ दि. १६ मार्च(जिमाका) :- कृषी विभाग व महिला आर्थीक विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने यवतमाळ येथे १८ मार्च ते २२ मार्चपर्यंत जिल्हा कृषि महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या कृषि महोत्सवा दरम्यान फक्त महिलांसाठी रांगोळी व पाककला खुली स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. यासाठी १७ मार्चपर्यंत सहभागी महिलांची नोंदणी स्वीकारण्यात येईल. स्पर्धेचे स्थळ समता मैदान (पोस्टल ग्राऊंड)यवतमाळ आहे. रांगोळी स्पर्धेचा विषय पौष्टीक तृणधान्य असुन रांगोळीसाठी ज्वारी, बाजरी, नाचणी, भगर, राळा,कोदा, कुटकी, सावा व राजगिरा इत्यादी तृणधान्य, फुले इतर आवश्यक साहित्याचा वापर करायचा आहे. रांगोळी काढण्यासाठी आवश्यक लाकडी बोर्ड किंवा हार्ड बोर्ड सर्व साहीत्य १ बाय १ मीटर चा वापर करणे बंधनकारक आहे. ही स्पर्धा दिनांक १९ मार्च रोजी दुपारी २ ते ३ वाजता आयोजीत केली असुन स्पर्धकास १ तासाचा वेळ देण्यात येईल. पाककला स्पर्धेचा विषय पौष्टीक तृणधान्य पासुन तयार करण्यात आलेले पदार्थ असुन ज्वारी, बाजरी,नाचणी,भगर राळा कोदा, कुटकी, सावा व राजगिरा या तृणधान्य साहित्यापासुनच बनविण्यात आलेला पदार्थ हा घरुन तयार करुन आणावयाचा आहे व तो स्वत: तयार केल्याबाबत व्हिडीयो क्लिप सोबत आणावी. त्याकरीता लागणारे सर्व साहित्य आपण स्वत: आणावे. ही स्पर्धा २० मार्च रोजी दुपारी ४ वाजता आयोजीत केली असुन स्पर्धेदरम्यान पदार्थाचे सजावटीकरीता ३० मिनीटाचा वेळ देण्यात येईल. दोन्ही स्पर्धेसाठी आयोजन समिती साहित्य पुरवठा करणार नाही, याची स्पर्धकाने नोंद घ्यावी. सर्व स्पर्धकांना वेळेचे बंधन तसेच आयोजन समितीचे सर्व नियम पाळणे बंधनकारक राहील. यासाठी १७ मार्च पर्यंत सहभागी महिलांची नोंदणी स्वीकारण्यात येईल. रांगोळी स्पर्धेच्या नोंदणीकरीता जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालय अधिक्षक अनिता तागडे, ८२७५४१७९१६ व मिनाक्षी शेंडे, ९२८४२७१३४५, ७३७८८३५२४४ यांचेशी तर पाककला स्पर्धेच्या नोंदणीकरीता प्रांजली कोरेवार कृषि अधिकारी ९६०४२८०८१७ व मिनाक्षी शेंडे ९२८४२७१३४५, ७३७८८३५२४४ यांचेशी व्हॉटसॅप नंबरवर संपर्क करुन संपुर्ण नाव, पत्ता व दूरध्वनी क्रमांक नोंदवुन मेसेज करुन प्रवेश निश्चित करावा. विजेत्यास (प्रथम पाच) आकर्षक बक्षिस व प्रशस्तिपत्रक देण्यात येईल. स्पर्धेतील विजेता निवडीचा अंतिम निर्णय हा परीक्षकाचा राहील याची नोंद घ्यावी, असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नवनाथ कोळपकर यांनी कळविले आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी