नदी- नाल्यांची साफसफाई २० मे पर्यंत पूर्ण करावी मान्सून पूर्व आढावा बैठकीत जिल्हाधिकारी यांच्या सूचना

यवतमाळ, दि २९ मार्च :- मुख्य नदयांच्या प्रवाहामधील अडथळे काढुन, पूर प्रवण भागातील नद्यांची व नाल्यांची साफसफाई करण्यात यावी. त्याचबरोबर जिल्हयातील अतिसंवेदनशिल व संवेदनशिल गावांची यादी तयार करुन नदीकाठावरील बंधाऱ्यांची, साठवण तलावाचे बळकटीकरण, डागडूजीची सर्व कामे २० मे पूर्वी करण्यात यावी अशा सुचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिल्यात. मान्सूनपूर्व आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवन येथे आयोजित करण्यात आली होती, यावेळी जिल्हाधिकारी यांनी सदर सूचना केल्यात. या बैठकिला मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ निवासी उपजिल्हाधिकारी ललित कुमार व-हाडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आर डी राठोड,जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता, जिल्हा पुरवठा अधिकारी सुधाकर पवार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, आदी अधिकारी उपस्थित होते. नाला सरळीकरण, नाला खोलिकरण, रिचार्ज शाफ्टची प्रस्तावित कामे व सुरू असलेली सर्व कामे २० मे पर्यत पूर्ण करावी.शोध व बचाव साहीत्य सुस्थितीत असल्याची खात्री करण्यात यावी. पूरपरिस्थितीत नागरिकांना सुरक्षीत स्थळी स्तलांतरित करण्याकरिता सुरक्षित ठिकाणे निश्चित करून त्यांचा तालुका मानक कार्य प्रणालीत समावेश करावा. त्याचबरोबर धोकादायक इमारतीची पाहणी करून नगरपरिषदांनी संबधितांना इमारत रिकामे करण्याबाबत नोटिस द्यावी अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्यात. मंडळ स्तरावर बसविण्यात आलेले रेनगेज सुस्थितीत आहे का? याची खातरजामा मंडळस्तरावरील अधिकारी यांनी करावी. कृषी विभागाने शेतक-यांना अति पावसामुळे होणारे शेत पिकाचे नुकसान टाळण्यासाठी बी बी एफ पध्‍दतीचा उपयोग करण्यासंदर्भात जागृती करावी आणि लक्षांक निश्चित करून पेरणीपूर्व नियोजन करावे. एखाद्या गावात पूर परिस्थिती उद्भवल्यास नागरिकांच्या सुटकेसाठी रस्ता मार्ग निश्चित करणे, सुयोग्य परिवहन साधनांची व्यवस्था, सुरक्षित ठिकाणी पोहोचण्याचे मार्ग, राहण्याची योग्य व्यवस्था, शुध्द पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, वैद्यकीय व्यवस्था, परिवहन व्यवस्था, खाद्यपदार्थ व औषधांचा पुरेसा साठा ठेवणे इत्यादी तयारी करण्याच्या सुचना जिल्हाधिकारी यांनी दिल्यात. शिवाय मान्‍सुन काळात साथीचे आजार पसरू नये याकरीता लसिकरण मे अखेरीस पूर्ण करण्‍यात यावे. पूर परिस्थितीत व पूर परिस्थिती ओसरल्यानंतर लागणारे औषधीद्गव्यांचे पूर्व नियोजन करावे. प्राथमिक आरोग्य केंद्गासाठी लागणार्‍या ओषधांचा साठा सुनिश्चित करुन जिल्हयातील वैद्यकीय अधिकारी व निमवैद्यकीय अधिकारी यांची माहिती अद्ययावत करावी. जिल्हयात स्वच्छता व आरोग्यदायी परिसर टिकवून ठेवण्यासाठी तसेच साथीचा आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी सर्व उपाययोजनाचा आराखडा तयार करण्यात यावा. नियंत्रण कक्षाचे कामकाज 24 तास चालू ठेवावे. नियंत्रण कक्षातील संगणक, प्रिंटर, झेरॉक्स मशिन, फॅक्स व इतर उपकरणे सुस्थितीत असण्याची खात्री करणे. तालुका स्तरावरील नागरी सुरक्षा दल, गृह रक्षक दल, अशासकीय संस्था इ. यांचे समवेत समन्वयन बैठकीचे व प्रशिक्षणाचे आयोजन करणे, पूरप्रवण गावांचे संबंधित सरपंच, तलाठी, ग्रामसेवक व इतर शासकीय कर्मचारी यांच्या समवेत तहसीलदार यांनी बैठक आयोजित करणे. अतिवृष्टी, पुरामुळे संपर्क तुटणा-या गावातील तलाठी, ग्रामसेवक, सरपंच, पोलिस पाटिल, कृषी सेवक, यांचे संपर्क जिल्‍हा नियंत्रण कक्षात उपलब्‍ध करुन देण्‍यात यावे तसेच तालुका नियंत्रण कक्षात व गावातील दर्शनी भागात प्रसिध्‍द करण्‍यात यावे. अल-निनो चा प्रभाव:- यावर्षीच्‍या मान्‍सून वर अल-निनो चा प्रभाव असल्‍याचा अंदाज हवामान वेधशाळेने वर्तविला आहे याकरीता जिल्‍हयात चारा टंचाई निर्माण होवू नये याकरीता जास्‍तीत जास्‍त चराई क्षेत्र तयार करणेबाबतचे नियोजन करण्‍यात यावे. तसेच धरणातून पाणी सोडतांना नियोजनबध्‍द पध्‍दतीने शेतीकरीता व पिणेकरीता पाणी सोडण्‍यात यावे अशा सुचना जिल्हाधिकारी यांनी दिल्यात.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी