विद्यार्थ्यांनी शिष्यवृतीचे अर्ज महाविद्यालयास सादर करावे
यवतमाळ,दि.२९ मार्च.(जिमाका):-समाज कल्याण विभागामार्फत अनुसूचित जाती,इतर मागास वर्ग,विजाभज व विशेष मागास प्रवर्गाच्या विद्यार्थांना महाविद्यालया मार्फत मँट्रीकोत्तर शिष्यवृती,फ्रिशिप, विद्यावेतन व छत्रपती राजश्री शाहु महाराज गुणवत्ता शिष्यवृतीचा लाभ देण्यात येतो.
सदर सर्व योजनांचे काम स्टेट डिबीटी च्या http://mahadbt.gov.in या संकेतस्थळावर लाभार्थांचे आधार क्रमांक बँक खात्याशी संलग्न करून सन २०२२-२३ चे अर्ज दिनांक २१ सप्टेंबर २०२२ पासून भरणे सुरू झाले आहे.
भारत सरकार शिष्यवृती व शिक्षण शुल्क परिक्षा शुल्क,विद्यावेतन,राजश्री शाहु महाराज गुणवत्ता शिष्यवृती या योजनांचे अर्ज विद्यार्थांनी ऑनलाईन पद्धतीने भरून विहीत कालावधीच्या आत परिपुर्ण भरलेला अर्ज सर्व कागदपत्रासह महाविद्यालयास सादर करावा. महाविद्यालयांनी नियमानुसार पात्र व परिपुर्ण असलेले अर्ज सहाय्यक आयुक्त समाजकल्याण कार्यालयास मंजुरीसाठी सादर करावे, असे समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त भाऊराव चव्हाण यांनी कळविले आहे.
Comments
Post a Comment