कार्यात्मक नळ जोडणीची कामे येत्या १० दिवसात पूर्ण करा* जिल्हाधिकारी यांचे जल जीवन मिशन बैठकित आदेश*

यवतमाळ, दि २८ जिमाका:- पाण्यासाठी स्त्रोत उपलब्ध आहे मात्र पाईपलाईन किंवा नळ जोडणी झालेली नाही अशा गावात कार्यात्मक घरगुती नळ जोडणी करून देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्यात. येत्या दहा दिवसात अशा गावांमध्ये नळ जोडणीचे काम प्राधान्याने पूर्ण करण्याचे आदेश अमोल येडगे यांनी दिलेत. जलजीवन मिशनचा जिल्हाधिकारी यांनी आज आढावा घेतला, यावेळी ते बोलत होते या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे कार्यकारी अभियंता श्री कोल्हे, जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता तसेच इतर क्षेत्रीय अधिकारी उपस्थित होते. जागेच्या कारणामुळे पाणीपुरवठा योजनांची कामे सुरू झाली नाहीत, अशा गावांची विभाग निहाय यादी तयार करून सादर करण्यात यावी. सार्वजनिक बांधकाम, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, रेल्वे इत्यादी विभागांना जागेच्या संदर्भात पाठपुरावा करावा. तसेच खाजगी जागांचे दानपत्र घेण्यासाठी सुद्धा पाठपुरावा करावा. पाणी पुरवठा योजनांची कामे सुरू करण्यासाठी विनाकारण अडथळे आणणाऱ्या लोकांची आधी समजुत घालावी. तहसीलदार, गटविकास अधिकारी, जिल्हाधिकारी यांच्याकडे त्यासंदर्भात बैठक घ्यावी. समजावून सांगितल्यानंतरही जर गावातील व्यक्ती ऐकत नसतील तर असे अडथळे आणणा-या व्यक्ती विरोधात गुन्हे दाखल करण्याच्या सुचना जिल्हाधिकारी यांनी दिल्यात. मागील वर्षी पाणीटंचाई उद्भवलेल्या गावांमध्ये पाणी उपलब्धतेसाठी घेतलेली स्त्रोतांची कामे प्राधान्याने पूर्ण करावीत. जेणेकरून टंचाई निर्माण झाल्यास नव्याने उपलब्ध स्त्रोतांमधील पाणी गावाक-यांना वापरता येईल. त्याचबरोबर ५०६ स्रोतांची कामे मे अखेर पर्यंत सुरू करावीत. शाळा,अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्र या ठिकाणी २४ तास पाणी उपलब्ध करून देण्यासाठी नियोजन करून त्याप्रमाणे व्यवस्था करावी अशा सूचनाही जिल्हाधिकारी यांनी आज दिल्यात.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी