Posts

Showing posts from February, 2023

गर्जा महाराष्ट्र माझा' राज्यगीताचा शिवजयंतीपासून अंगिकार* *यापुढे सर्व सार्वजनिक कार्यक्रमात राष्ट्रगीतासोबतच राज्यगीतही गायले जाणार*

यवतमाळ, दि १६ फेब्रु जिमाका :- राज्य शासनाने कवीवर्य राजा बढे लिखित व शाहीर साबळे यांनी गायलेल्या गीतावर यथोचित संस्करण करुन दोन चरणांसह "जय जय महाराष्ट्र माझा,गर्जा महाराष्ट्र माझा" हे गीत राज्यगीत म्हणुन स्वीकृत केले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून सदर गीत १९ फेब्रुवारी २०२३ पासून महाराष्ट्राचे राज्यगीत म्हणून अंगिकारण्यात येत आहे. या गीताचा कालावधी सुमारे १.४१ मिनीटे आहे. दोन चरणासह रज्यगीत आहे. "भिती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा सह्याद्रीचा सिंह गर्जता शिव शंभू राजा दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा" || १॥ "काळया छातीवरी कोरली, अभिमानाची लेणी पोलादी मनगटे खेळती, खेळ जीवघेणी दारिद्र्याच्या उन्हात शिजला निढळाच्या घामाने भिजला देश गौरवासाठी झिजला दिल्लीचेही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा" || २॥ राज्यगीत गायन, वादन यासंदर्भातील औचित्याचे पालन क

जिल्हा महिला लोकशाही दिन २० फेब्रुवारीला*

यवतमाळ, दि.१७ फेब्रुवारी (जिमाका):- जिल्हा महिला लोकशाही दिन दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजीत केला जातो. या महिन्यातील महिला लोकशाही दिन २० फेब्रुवारीला जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली बचत भवन, जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ येथे आयोजित करण्यात आला आहे. जिल्ह्यातील महिलांनी महिला लोकशाही दिनी आपल्या तक्रारी मांडाव्यात. महिलांनी त्यांच्या तक्रारी प्रथम तालुकास्तरावर तहसीलदार यांचेकडे मांडाव्यात. सदर तक्रारीवर संबंधीत विभागाकडून विहित कालावधीत निरसन न झाल्यास सदर तक्रार जिल्हा महिला लोकशाही दिनात तालुकास्तरीय लोकशाही दिनात केलेले अर्ज व टोकन क्रमांकासह दाखल करावी. लोकशाही दिनात न्यायप्रविष्ट प्रकरणे, विहित नमुन्यात नसलेला व आवश्यक कागदपत्रे न जोडलेला अर्ज तसेच सेवाविषय, आस्थापना विषयक, वैयक्तिक स्वरूपाचे निवेदन व तक्रारी स्विकारल्या जाणार नाही, असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी ज्योती कडू यांनी कळविले आहे.

छत्रपती शिवाजी महराज जयंतीदिनी वैद्यकीय महाविद्यालयात रक्तदान अभियान *रक्तदानाबाबत नागरिकांमध्ये करणार जनजागृती*

यवतमाळ, दि १७ फेब्रु जिमाका:- आजच्या तंत्रज्ञानानाने सज्ज असणा-या युगातही रक्त हे मानवी शरीर सोडून प्रयोगशाळेत तयार होत नाही. रुग्णसेवेमध्ये औषधोपचारा सोबत रुग्णांना रक्तपुरवठ्याची गरज भागवण्यासाठी रक्तदान हा एकमेव पर्याय आहे. म्हणुनच वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभाग मुंबई मार्फत शिवजयंतीचे औचित्य साधून सबंध महाराष्ट्रातील वैद्यकीय महाविद्यालयाव्दारे रक्तदानाबाबत जनजागृती करणे तसेच शक्य तेवढे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्याचा संकल्प केला आहे. यवतमाळ येथिल शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या वतीने रविवारी १९ फेब्रुवारीला शिवजयंतीदिनी चार ठिकाणी रक्तदान शिबिर व जन जागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. रुग्णालयामध्ये मोठया प्रकारच्या शस्त्रक्रिया, गर्भवती माता, सिकलसेल, थॅलेसिमीया यासाठी रक्ताची मोठ्य प्रमाणातआवश्यकता भासते. त्यामुळे सर्व शासकीय रुग्णालयामध्ये रक्ताची उपलब्धता होण्यासाठी रक्तदान अभियान राबविण्यात येत आहे. श्री.वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथील रक्तपेढीमध्ये तसेच शिवतीर्थ यवतमाळ गार्डन रोड, बोरी अरब, रुंझा असे एकूण चार ठिकाणी रक्तदान शिबीराचे आयोजन केलेले

५० व्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन *मानवी जीवनातील समस्यांवर उपाय काढू शकतो तो वैज्ञानिक! - जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे प्रतिपादन

Image
यवतमाळ, दि १६ फेब्रु, जिमाका:- विज्ञान संकुचित किंवा मर्यादित नाही. केवळ जीवशास्त्र, रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्रातील प्रयोग म्हणजे विज्ञान नव्हे; तर वेगवेगळे रिसोर्सेस वापरून कमी खर्चात चांगले पर्याय उपलब्ध करून देणे आणि मानवी जीवन सुसह्य करणे हे विज्ञानाचे काम आहे. मानवाची बरीचशी कामे विज्ञान करू लागला आहे. आगामी काळात विविध ग्रहांवरही मानवी वस्ती दिसू शकेल. मानवी जीवनातील विविध समस्यांवर उपाय काढू शकतो, तोच खरा वैज्ञानिक होय, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले. विशुद्ध विद्यालय द्वारा संचालित विवेकानंद व राणी लक्ष्मीबाई विद्यालयाच्या प्रांगणात जिल्हा परिषद शिक्षण विभाग आणि विशुद्ध संस्था द्वारा आयोजित ५० व्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. विनायक दाते यांच्या अध्यक्षतेत आज झालेल्या या सोहळ्याच्या मंचावर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, माध्यमिक शिक्षणाधिकारी जयश्री राऊत, जिल्हा माहिती अधिकारी मनीषा सावळे, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. प्रशांत गावंडे, जिल्हा क्रीडा अधिकारी खुरपुडे,

अवैध गर्भपाताची माहिती देणाऱ्या आशा व अंगणवाडी सेविकांना जिल्हा प्रशासनाकडून एक लाख रुपयाचे बक्षीस* *जिल्हाधिकारी यांची माहिती* *आरोग्य विभागाच्या विविध योजनांचा घेतला आढावा*

Image
यवतमाळ, दि १४ फेब्रु जिमाका:- जिल्ह्यात लिंग गुणोत्तर प्रमाण ९८० असले तरी पुसद व घाटंजी या तालुक्यात हे प्रमाण ८७८ एवढे कमी आहे. ही बाब चिंताजनक असुन जिल्ह्यात अवैध गर्भपाताबाबत माहिती देणा-या आशा व अंगणवाडी सेविकांना शासनाच्या एक लक्ष रुपयांसोबतच जिल्हा प्रशासनाकडुनही १ लक्ष रुपये बक्षिस देण्यात येईल, असे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आज सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी यांनी आरोग्य विभागाच्या विविध योजना व कार्यक्रमाचा आढावा घेतला. यावेळी ते बोलत होते. या बैठकिला जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.आर डी राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रल्हाद चव्हाण, निवासी वैद्यकीय अधिकारी रमा बाजोरिया शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे वैद्यकिय अधिक्षक डॉ. सुरेंद्र भुयार, शिक्षणाधिकारी प्राथमिक प्रमोद सुर्यवंशी उपस्थित होते. गर्भपात केंद्रामध्ये अवैधरित्या गर्भपात केला जात आहे किंवा अपात्र व्यक्ती गर्भपात करीत असेल तर त्याबाबतची माहिती देणाऱ्यास शासनाकडून एक लक्ष रुपयाचे बक्षीस दिले जाते. यामध्ये जिल्हाधिकारी यांनी भर घालत अवैध गर्भपाताची माहिती देणाऱ्या आशा व अंगणवाडी सेविकांना जिल्हा

नंगारा वास्तु संग्रहालय परिसरात संत सेवालाल महाराजांचा अश्वारूढ पुतळा व धवल सेवाध्वजाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण*

वाशिम, दि १२(जिमाका) देशातील कोट्यवधी बंजारा बांधवांचे प्रमुख तिर्थक्षेत्र असलेल्या श्री क्षेत्र पोहरादेवी येथील नगारा वास्तु संग्रहालयामध्ये संत सेवालाल महाराज यांचा २१ फुट उंच पंचधातुच्या अश्वारूढ पुतळयाचे अनावरण आणि १३५ फुट उंच धवल रंगाच्या सेवाध्वजाची स्थापना रिमोट कंट्रोलद्वारे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हस्ते करण्यात आली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड, ग्रामविकास मंत्री गिरिश महाजन, बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे, खासदार भावना गवळी, आमदार राजेंद्र पाटणी, आमदार ॲड निलय नाईक, विभागीय आयुक्त डॉ.दिलीप पांढरपट्टे, बंजारा समाजाचे धर्मगुरु महंत बाबुसिंग महाराज, महंत कबीरदास महाराज, महंत शेखर महाराज आदी मान्यवर उपस्थित होते. 'ब' दर्जा प्राप्त या तिर्थक्षेत्राचा विकास करण्यासाठी शासनाने ५९३ कोटी रुपयांच्या विकास आराखड्यास मान्यता दिली आहे. याच विकास आराखड्यातील विकास कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण करण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आज पोहरादेवी दौ-यावर होते. यावेळी त्यांनी बंजारा समाजा

राष्ट्रीय लोक अदालतीचे ११ फेब्रुवारीला आयोजन*

यवतमाळ, दि. ९ फेब्रुवारी (जिमाका):- जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा वकील संघ यांचे संयुक्त विद्यमाने जिल्हा न्यायालय, यवतमाळ येथे ११ फेब्रुवारीला सकाळी साडेदहा वाजता तसेच यवतमाळ जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालये येथे राष्ट्रीय लोकअदालतचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये न्यायालयात प्रलंबित असलेले तडजोडीस पात्र दिवाणी व फौजदारी प्रकरणे, मोटार अपघात नुकसान भरपाई प्रकरणे,भुअर्जन मामल्याची प्रकरणे, महसुली प्रकरणे, वैवाहिक संबंधातील वाद प्रकरणे, बॅका व अन्य वित्तीय संस्थांचे नुकसान व वसुली प्रकरणे व तडजोडीस पात्र असणारी सर्व प्रलंबित व दाखलपुर्व प्रकरणे आपसी तडजोडीने निकाली निघणार आहे. सदर लोकअदालतीमध्ये वाद मिटविण्याकरिता न्यायाधीश, तज्ञ वकील व सामाजीक कार्यकर्ते यांचे मंडळ पक्षकार मदत करेल. तसेच लोकअदालतीमध्ये प्रकरण ठेवण्यासाठी कोणत्याही प्रकारची फी भरावी लागणार नाही. सर्व पक्षकारांनी राष्ट्रीय लोकअदालतमध्ये यवतमाळ जिल्ह्यातील इतर तालुका न्यायालयांत संपर्क साधुन आपली जास्तीत जास्त प्रकरणे आपसी तडजोडीने मिटवावीत, असे आवाहन एस. व्ही. हांडे, प्रमुख जिल्हा व सत्र

जिल्हा बाल संरक्षण कक्षाने रोखला बालविवाह* *जिल्हा बाल संरक्षण कक्षाने केली वेळीच कारवाई*

यवतमाळ,दि ९ फेब्रुवारी(जिमाका) :- उमरखेड तालुक्यातील सोयीट या गावी अल्पवयीन मुलीचा होत असलेला बालविवाह जिल्हा बाल संरक्षण कक्षाने वेळीच कारवाई केल्यामुळे रोखण्यात यश मिळाले. सोयीट गावात बालविवाह होत असल्याबाबत गोपनीय माहिती जिल्हा बाल संरक्षण कक्षास प्राप्त झाली होती. त्यानुसार जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे माहिती विश्लेषक सुनिल बोक्से यांनी तातडीने सोयीट(म)पो.धानोरा,बिटरगाव यागावी भेट दिली. जिल्हा बाल संरक्षणकक्षा द्वारे बिटरगाव पोलीस स्टेशन उमरखेड जिल्हा यवतमाळ व चाईल्ड लाईन १०९८ यवतमाळ यांना नियोजित बालविवाह बाबत माहिती देण्यात आली. अल्पवयीन बालिकेच्या कुटुंबास प्रत्यक्ष भेट देऊन बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ व बालविवाह झाल्यास बाल विवाहप्रतिबंधक अधिनियम २००६ अंतर्गत शिक्षेस पात्र होऊ शकते याची माहिती देण्यात आली. बालिकेच्या मामाकडून बालिकेचा विवाह १८ वर्ष पूर्ण झाल्यानंतर करणात यावा असा जवाब लिहून घेण्यात आला. त्याप्रमाणे सूचना पत्र आणि बिटरगाव पोलीस स्टेशन उमरखेड यांच्याद्वारे १४९ ची नोटीस सुद्धा देण्यात आली आहे. सदर बालविवाह थांबविण्यास बिटरगाव पोलीस स्टेशन उमरखेडचे

आधुनिक शेतीमध्ये यांत्रिकीकरण काळाची गरज - जिल्हाधिकारी अमोल येडगे*

यवतमाळ, दि ९ : कृषी विज्ञान केंद्राअंतर्गत उपलब्ध असलेले आधुनिक यांत्रिकी करणाचा वापर शेतक-यांनी शेतीमध्ये करावा. तसेच विद्यापीठाच्या शिफारशीत तंत्रज्ञानाची माहिती शेतकरी शात्रज्ञ मंचद्वारे जिल्ह्यातील शेतकऱ्यापर्यंत पोहचविण्याचे काम करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले. शेतकरी शात्रज्ञ मंच' सुरु करण्यात आला असुन याची दुसरी सभा ८ फेब्रुवारीला जगदीशभाऊ चव्हाण, गाझीपुर, दारव्हा यांच्या प्रक्षेत्रावर घेण्यात आली. 'शेतकरी शात्रज्ञ मंच' च्यामाध्यमातून आधुनिक शेतीमध्ये यांत्रिकीकरणाचा प्रचार आणि प्रसार करण्यात येणार आहे. यावेळी जिल्हाधिकारी, अमोल येडगे यांनी मार्गदर्शन केले. जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर, वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा केंद्र प्रमुख, कृषी विज्ञान केंद्र, डॉ. सुरेश नेमाडे, जिल्हा रेशीम अधिकारी विलास शिंदे, महाबीजचे जिल्हा व्यवस्थापक अशोकराव ठाकरे, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक अमर गजभिये, दारव्हा तालुका कृषी अधिकारी एम. जे. थोरात, शेतकरी शास्त्रज्ञ मंचचे अध्यक्ष अशोकराव वानखडे, सुकळी, उपाध्यक्ष जगदीशभाऊ चव्हाण, गाझीपुर, शेतकरी मनीष जाध

बेवारस वाहनाबाबत मालकी हक्क सादर करण्याचे आवाहन

यवतमाळ, दि ७ फेब्रु,जिमाका:- यवतमाळ ग्रामीण पोलीस स्टेशन येथील बेवारस वाहनाबाबत कोणाचा मालकी हक्क असल्यास त्यांनी मालमत्तांची खात्री करण्यासाठी पोलीस निरीक्षक,यवतमाळ ग्रामिण पोलीस स्टेशन यांचेशी संपर्क साधावा. त्यांची मालमत्ता ओळखुन त्याबाबत मालकी हक्क सिध्द करावा. १५ दिवसाच्या आत मुदतीपर्यंत जप्त बेवारस मालाबाबत कोणीही मालकी हक्क सिध्द न केल्यास त्याबाबतची मालकी राज्य शासनाच्या स्वाधीन राहील व त्या मालाची लिलावाने विक्री करण्यात येईल. मुदतीनंतर प्राप्त होणारे पुरावे विचारात घेतले जाणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी. सदर वाहने यवतमाळ ग्रामीण पोलीस स्टेशन येथे पाहणीसाठी उपलब्ध आहे, असे उप विभागीय दंडाधिकारी अनिरुद्ध बक्षी यांनी कळविले आहे.

नागरिकांच्या तक्रारीवर समाधानकारक उत्तर नसल्यास सबंधित अधिका-यावर कारवाई- जिल्हाधिकारी

यवतमाळ दि 7 फेब्रु, जिमाका :- लोकशाही दिन, मुख्यमंत्री सचिवालय, किंवा मुख्यमंत्री लोकशाही दिनात प्राप्त तक्रारीवर अनुपालन सादर करताना ते गुणवत्तापूर्ण व समाधानकारक आहेत याची कार्यालय प्रमुखांनी खात्री करावी. अनुपालन समाधानकारक आहे किंवा नाही हे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत तपासले जाईल. उत्तर योग्य नसल्यास त्याची नोंद संबंधित विभाग प्रमुखाच्या गोपनिय अहवालात घेतली जाईल, असा इशारा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिला. जिल्हा लोकशाही दिन आणि मुख्यमंत्री लोकशाही दिनात प्राप्त तक्रारीवर त्यांनी विभाग प्रमुखांचे ऑनलाईन बैठकी घेतली. यावेळी ते बोलत होते. लोकशाही दिनात आलेल्या तक्रारीवर सात दिवसात कारवाई होणे अपेक्षित आहे. तसेच अर्जदाराला वेळेत कळवण्याची जबाबदारी संबंधित विभाग प्रमुखांची आहे. त्याचबरोबर जिल्हास्तरीय व सर्व क्षेत्रीय कार्यालयांनी अभ्यागताना भेटण्याची वेळ ठरवून त्याची माहीती कार्यालयातील दर्शनी भागात लावावी. तसेच कार्यालयात अभ्यागत रजिस्टर ठेवावे. लोकांच्या का

राळेगाव येथे १० फेब्रुवारीला रोजगार मेळावा

यवतमाळ, दि ७ फेब्रुवारी (जिमाका) :- जिल्हाकौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, यवतमाळ अंतर्गत मॉडेल करीयर सेंटर व शासकिय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, राळेगाव यांचे संयुक्त विद्यमाने १० फेब्रुवारी २०२३ रोजी शासकिय औद्योगिक प्रशिक्षणसंस्था, राळेगाव येथे सकाळी १० वाजता रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. सदर रोजगार मेळाव्याकरीता एकूण १८१५ रिक्तपदे अधिसुचित करण्यात आली आहे. सदरची रिक्तपदे ही एल आय सी ऑफ इंडिया, हिंगणघाट, धुत ट्रान्समिशन, औरंगाबाद, परम स्किल ट्रेनिंग इंडिया प्रा.लि. औरंगाबाद/पुणे, जय ॲग्रो इंडस्ट्रिज प्रा.लि.यवतमाळ, नवकिसान बायोप्लँटेक लि. नागपूर, स्वतंत्र मायक्रो फायनांन्स प्रा.लि. राळेगाव, तिरुमला इंडस्ट्रिएल ॲण्ड अलाईड सर्व्हिसेस ग्रुप ऑफ कंपनी, पुणे, मुथुत मायक्रो फायनांन्स प्रा.लि.यवतमाळ, ब्रेनसिटर प्रा.लि.पूणे, एस बी.आय लाईफ इन्सुरन्स,यवतमाळ,मेगाफिड बायोटेक, नागपूर, इंदुजा महिला मिल्क प्रॉडयुस कंपनी, यवतमाळ येथील आहेत. सदर मेळाव्यामध्ये इयत्ता १० वी, १२ वी, आय.टि.आय. पदविकाधारक, पदवीधर तसेच इतर व्यावसायिक अभ्यासक्रम पुर्ण केलेले ईच्छुक उम