आधुनिक शेतीमध्ये यांत्रिकीकरण काळाची गरज - जिल्हाधिकारी अमोल येडगे*

यवतमाळ, दि ९ : कृषी विज्ञान केंद्राअंतर्गत उपलब्ध असलेले आधुनिक यांत्रिकी करणाचा वापर शेतक-यांनी शेतीमध्ये करावा. तसेच विद्यापीठाच्या शिफारशीत तंत्रज्ञानाची माहिती शेतकरी शात्रज्ञ मंचद्वारे जिल्ह्यातील शेतकऱ्यापर्यंत पोहचविण्याचे काम करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले. शेतकरी शात्रज्ञ मंच' सुरु करण्यात आला असुन याची दुसरी सभा ८ फेब्रुवारीला जगदीशभाऊ चव्हाण, गाझीपुर, दारव्हा यांच्या प्रक्षेत्रावर घेण्यात आली. 'शेतकरी शात्रज्ञ मंच' च्यामाध्यमातून आधुनिक शेतीमध्ये यांत्रिकीकरणाचा प्रचार आणि प्रसार करण्यात येणार आहे. यावेळी जिल्हाधिकारी, अमोल येडगे यांनी मार्गदर्शन केले. जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर, वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा केंद्र प्रमुख, कृषी विज्ञान केंद्र, डॉ. सुरेश नेमाडे, जिल्हा रेशीम अधिकारी विलास शिंदे, महाबीजचे जिल्हा व्यवस्थापक अशोकराव ठाकरे, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक अमर गजभिये, दारव्हा तालुका कृषी अधिकारी एम. जे. थोरात, शेतकरी शास्त्रज्ञ मंचचे अध्यक्ष अशोकराव वानखडे, सुकळी, उपाध्यक्ष जगदीशभाऊ चव्हाण, गाझीपुर, शेतकरी मनीष जाधव, प्रगतशील शेतकरी, वागद-इजारा अमृतराव देशमुख, अंबोडा इत्यादी मान्यवर उपस्थित होते. जिल्ह्यातील शेतक-यांना आधुनिक शेतीची माहिती मिळावी व प्रयोगशील, पुरस्कृत व अनुभवी शेतकरी बांधवांनी अवगत केलेले तंत्रज्ञान व अनुभव हे इतर शेतकरी बांधवांनी सुद्धा अनुकरण करून त्यातुन उन्नती साधावी यासाठी शेतकरी शास्त्रज्ञ मंच सुरु केल्याची माहिती जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिली. कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ यांनी हा मंच सुरु केल्याबद्दल आणि त्यांच्या पुढील कार्याकरिता शुभेच्छा दिल्यात. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकमध्ये डॉ. सुरेश नेमाडे, शेतकरी शात्रज्ञ मंचाचे उद्देश व महत्त्व विषद केले. तसेच उपस्थित शेतकरी बांधवांना ड्रोन तंत्रज्ञानाचा शेती मध्ये वापर या विषयी प्रात्यक्षिक स्वरुपात माहिती दिली. कार्यक्रमाच्या तांत्रिक सत्रामध्ये जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर यांनी कृषी विभागामध्ये उपलब्ध असलेल्या कृषी विषयक योजनांविषयी उपस्थित शेतकरी बांधवांना माहिती दिली. जिल्हा रेशीम अधिकारी विलास शिंदे रेशीम उत्पादन विषयी सखोल मार्गदर्शन केले. जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक अमर गजबीये,यांनी शेतकऱ्यांसाठी उपलब्ध असलेल्या बँकेतील योजनांविषयी माहिती दिली. अशोकराव ठाकरे, जिल्हा व्यवस्थापक, महाबीज यांनी बीजउत्पादन कार्यक्रमाविषयी सखोल मार्गदर्शन केले. तालुका कृषी अधिकारी, दारव्हा एम. जे. थोरात यांनी शेतीला पूरक प्रक्रिया उद्योग या विषयी सखोल माहिती दिली. वागद-इजारा येथील प्रगतशील शेतकरी मनीष जाधव यांनी कृषी विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञच्या संपर्कात राहून शेतीमध्ये शिफारशीत तंत्रज्ञानाचा वापर करावा असे आवाहन उपस्थित शेतक-यांना केले. या प्रसंगी कृषी विज्ञान केंद्रातील डॉ. प्रमोद मगर, शास्त्रज्ञ, कीटकशास्त्र, गणेश काळूसे, शास्त्रज्ञ पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र, राधेश्याम देशमुख, तांत्रिक सहायक, भरतसिंग सुलाणे, सहायक, उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्र संचालन मयूर ढोले, तर आभार जगदीशभाऊ चव्हाण यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गाजीपूर येथील शेतकरी बांधव व शेतकरी शात्रज्ञ मंचाचे सर्व सदस्य यांनी सहभाग नोंदविला.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी