छत्रपती शिवाजी महराज जयंतीदिनी वैद्यकीय महाविद्यालयात रक्तदान अभियान *रक्तदानाबाबत नागरिकांमध्ये करणार जनजागृती*

यवतमाळ, दि १७ फेब्रु जिमाका:- आजच्या तंत्रज्ञानानाने सज्ज असणा-या युगातही रक्त हे मानवी शरीर सोडून प्रयोगशाळेत तयार होत नाही. रुग्णसेवेमध्ये औषधोपचारा सोबत रुग्णांना रक्तपुरवठ्याची गरज भागवण्यासाठी रक्तदान हा एकमेव पर्याय आहे. म्हणुनच वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभाग मुंबई मार्फत शिवजयंतीचे औचित्य साधून सबंध महाराष्ट्रातील वैद्यकीय महाविद्यालयाव्दारे रक्तदानाबाबत जनजागृती करणे तसेच शक्य तेवढे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्याचा संकल्प केला आहे. यवतमाळ येथिल शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या वतीने रविवारी १९ फेब्रुवारीला शिवजयंतीदिनी चार ठिकाणी रक्तदान शिबिर व जन जागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. रुग्णालयामध्ये मोठया प्रकारच्या शस्त्रक्रिया, गर्भवती माता, सिकलसेल, थॅलेसिमीया यासाठी रक्ताची मोठ्य प्रमाणातआवश्यकता भासते. त्यामुळे सर्व शासकीय रुग्णालयामध्ये रक्ताची उपलब्धता होण्यासाठी रक्तदान अभियान राबविण्यात येत आहे. श्री.वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथील रक्तपेढीमध्ये तसेच शिवतीर्थ यवतमाळ गार्डन रोड, बोरी अरब, रुंझा असे एकूण चार ठिकाणी रक्तदान शिबीराचे आयोजन केलेले आहे. रक्तदानाविषयी जनजागृती करण्यासाठी शिबीरस्थळी तज्ञाव्दारे मार्गदर्शन करण्यात येणार आहे. वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई मार्फत हे रक्तदान अभियान वर्षभर राबविल्या जाणार आहे वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातही रक्तदानाविषयी जनजागृतीकरीता पथनाटय, रांगोळी स्पर्धा, वकृत्व स्पर्धा, पोस्टर स्पर्धा इत्यादी उपक्रम राबविण्यात येतील. सदरील अभियानास प्रोत्साहन देण्याकरीता या महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. गिरीश जतकर, वैद्यकीय अधिक्षक डॉ. सुरेंद्र भुयार, विभाग प्रमुख डॉ. विकास येडशीकर, रक्तपेढी प्रमुख डॉ. निलीमा लोढा यांनी संस्थेतील सर्व अध्यापक व सर्व विद्यार्थ्यांना रविवारी १९ फेब्रुवारीला उत्फुर्तपणे रक्तदान करण्याचे आवाहन केले आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी