Posts

Showing posts from March, 2021

टेस्टिंग व लसीकरणासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक – जिल्हाधिकारी अमोल येडगे

Image
  Ø सामाजिक संघटनांसोबत बैठक यवतमाळ, दि. 30 : जिल्ह्यात कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येला आळा घालण्यासाठी तसेच मृत्युदर कमी करण्यासाठी मास्कचा वापर, सामाजिक अंतराचे पालन आणि वारंवार हात धुणे या त्रिसुत्रीचा अवलंब करणे आवश्यक आहे. यासोबतच आता टेस्टिंग आणि लसीकरण याला सुध्दा प्राधान्य देण्यात आले असून यात सर्वांचे सहकार्य आवश्यक आहे, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींसोबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार व-हाडे, उपविभागीय अधिकारी अनिरुध्द बक्षी, तहसीलदार कुणाल झाल्टे आदी उपस्थित होते. आयसोलेशन, टेस्टिंग, ट्रेसिंग, लसीकरण आदी कामे प्रशासनाकडून करीत आहे. मात्र नागरिकांचा प्रतिसाद कमी पडत असल्यामुळे विविध सामाजिक संघटनांनी यासाठी प्रशासनासोबत काम करून जनजागृती करणे आवश्यक आहे. कोव्हीडवर नियंत्रण तसेच मृत्युदर कमी करायचा असेल तर टेस्टिंग आणि लसीकरणावर भर देण्याचा प्रशासनाचा मानस आहे. वाढता मृत्युदर ही अतिशय गंभीर बाब असून नागरिकांच्या

10 मृत्युसह जिल्ह्यात 441 जण पॉझेटिव्ह

  Ø 351 जण कोरोनामुक्त         यवतमाळ, दि. 30 : गत 24 तासात जिल्ह्यात 10 मृत्युसह 441 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत. तसेच वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 351 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.              जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार मृत झालेल्या व्यक्तिंमध्ये यवतमाळ येथील 57 व 58 वर्षीय पुरुष आणि 43 व 74 वर्षीय महिला, महागाव तालुक्यातील 50 व 60 वर्षीय पुरुष, दारव्हा तालुक्यातील 65 वर्षीय पुरुष, नेर तालुक्यातील 45 वर्षीय महिला, उमरखेड येथील 73 वर्षीय पुरुष आणि मानोरा (जि. वाशिम) येथील 40 वर्षीय महिलेचा समावेश आहे. तसेच आज (दि.31) पॉझेटिव्ह आलेल्या 441 जणांमध्ये 276 पुरुष आणि 165 महिला आहेत. यात यवतमाळातील 163, पुसद 68,   उमरखेड 41, वणी 27, दिग्रस 25, दारव्हा 21,   आर्णि 18, महागाव 14, घाटंजी 13, नेर 11, पांढरकवडा 9, झरीजामणी 8, मारेगाव 7, कळंब 6, बाभुळगाव 2, राळेगाव 1 आणि इतर शहरातील 7 रुग्ण आहे.              बुधवार

45 वर्षावरील शासकीय कर्मचारी व कुटूंबियांना लसीकरण बंधनकारक

  यवतमाळ, दि. 31 : जिल्ह्यात कोरोना बाधितांची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून 45 वर्षांवरील जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करण्याला प्राधान्य देण्यात आले आहे. याच अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयातील 45 वर्षावरील अधिकारी, कर्मचारी व त्यांच्या कुटुंबातील 45 वर्षावरील सर्व सदस्य यांना लसीकरण करणे बंधनकारक करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी निर्गमित केले आहे. नागरिकांनी जवळच्या लसीकरण केंद्रावर जाऊन लसीकरण करून घ्यावे व लसीकरणबाबतची माहिती विभाग प्रमुखांना देण्यात यावी, असे आदेशात नमुद आहे. कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेकरीता नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती : जिल्ह्यातील कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे राबविण्यासाठी नोडल अधिका-यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या अंतर्गत जनजागृती करणे, लसीकरणासाठी पात्र लोकांची माहिती घेणे, लसीकरण होते आहे किंवा नाही याबाबत तपासणी करणे, लोकांना लसीकरणासाठी प्रवृत्त करणे, लसीकरण केंद्राबाबत समन्वय अधिकारी म्हणून आवश्यक ती जबाबदारी पार पाडणे, तहसीलदार, तालुका आरोग्य अधिकारी यांनी लसीकरणाबाब

वडगाव, लोहारा लसीकरण केंद्राला जिल्हाधिकारी यांची भेट

Image
              यवतमाळ ३१: दिवसेंदिवस कोरोनाच्या वाढत्या रूग्ण संख्येला आळा घालण्याकरीता जास्तीत जास्त कोविड लसीकरण करणे आवश्यक आहे. जिल्हाधिकारी अमोल येडगे रुजू झाल्यानंतरच आज यवतमाळ तालुक्‍यातील वडगाव व लोहारा येथील लसीकरण केंद्राला भेट देवून लसीकरणाची पाहणी केली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकुष्ण पांचाळ, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तंरगतुषार वारे, जिल्हा आरोग्य अधिकारी हरी पवार, डॉ. सुभाष ढोले, डॉ. सुषमा खोडवे, डॉ. जया चव्हाण व सर्व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते. आजपर्यंत जवळपास ८५ हजार लोकांना कोविडची लस देण्यात आली असुन येत्या १ एप्रील पासुन ४५ वर्षावरील सर्वांना विना अट लसीकरण सुरु होणार असुन कोविड लस घेण्याचे सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी आरोग्य यंत्रनेचा व इतर महसूल यंत्रनेचा रोज आढावा घेत असून नियमित पाठपुरावा करण्यात येत आहे. संबंधीत यंत्रनेला कोरोना बाधितांचे कॉन्टेक्ट ट्सिंग करुन त्यांचा शोध घेवून चाचणी करणे कोरोना चाचणीचे प्रमाण वाढविने, कर्मचारी व दुकानदाराचे १००% लसीकरण पूर्ण करणे, दैनंदिन माहिती ऑ

टेस्टिंग आणि लसीकरणासाठी नागरीकांनी समोर यावे - जिल्हाधिकारी अमोल येडगे

Image
  * कोविड संदर्भात जिल्हास्तरीय आढावा यवतमाळ   दि. 30 : जिल्ह्यात गत काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या तसेच मृत्यूचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. यात प्रामुख्याने यवतमाळ, पुसद, दिग्रस, दारव्हा, केळापूर, वणी व इतर मोठ्या शहरांचा समावेश आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी जास्तीत जास्त नागरीकांनी टेस्टिंग व लसीकरण करून घेणे आवश्यक असल्यामुळे नागरीकांनी यासाठी स्वत:हून समोर यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात कोविड संदर्भात आयोजित जिल्हास्तरीय आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलींद कांबळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरी पवार आदी उपस्थित होते. प्रादुर्भाव असलेल्या जिल्ह्यातील उपरोक्त तालुक्यात तसेच शहरात टेस्टिंगची संख्या व लसीकरण केंद्र वाढविण्याबाबत नियोजन करण्यात आले आहे, असे सांगून जिल्हाधिकारी श्री. येडगे म्हणाले, 45 वर्षापेक्षा जास्त व

13 मृत्युसह जिल्ह्यात 247 जण पॉझेटिव्ह

  Ø 312 जण कोरोनामुक्त         यवतमाळ, दि. 30 : गत 24 तासात जिल्ह्यात 13 मृत्युसह 247 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत. तसेच वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 312 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.              जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार मृत झालेल्या व्यक्तिंमध्ये यवतमाळ येथील 56, 82, 68, 73, 73, 77 वर्षीय पुरुष आणि 65 वर्षीय महिला, उमरखेड तालुक्यातील 68 आणि 63 वर्षीय पुरुष, घाटंजी तालुक्यातील 32 वर्षीय पुरुष, दिग्रस येथील 85 वर्षीय पुरुष तर तालुक्यातील 45 वर्षीय पुरुष आणि पुलगाव (जि. वर्धा) येथील 72 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. तसेच आज (दि.30) पॉझेटिव्ह आलेल्या 247 जणांमध्ये 166 पुरुष आणि 81 महिला आहेत. यात यवतमाळातील 123, वणी 25, पांढरकवडा 24, बाभुळगाव 17, दारव्हा 17, पुसद 10, उमरखेड 10, महागाव 9, दिग्रस 3, कळंब 2, नेर 2, राळेगाव 2, आर्णि 1, घाटंजी 1 आणि झरीजामणी येथील 1 रुग्ण आहे.              मंगळवारी एकूण 1972 रिपोर

नऊ मृत्युसह जिल्ह्यात 400 जण पॉझेटिव्ह

  Ø 235 जण कोरोनामुक्त        यवतमाळ, दि. 28 : गत 24 तासात जिल्ह्यात नऊ मृत्युसह 400 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत. तसेच वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 235 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.             जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार मृत झालेल्या व्यक्तिंमध्ये यवतमाळ येथील 80 व 62 वर्षीय पुरुष आणि 93 वर्षीय महिला, वणी तालुक्यातील 50 वर्षीय महिला, कळंब येथील 45 वर्षीय पुरुष, दारव्हा तालुक्यातील 68 वर्षीय पुरुष, चंद्रपूर येथील 51 वर्षीय पुरुष, धामणगाव येथील 75 वर्षीय पुरुष आणि आर्णि येथील एका पुरुषाचा समावेश आहे. तसेच आज (दि.28) पॉझेटिव्ह आलेल्या 400 जणांमध्ये 274 पुरुष आणि 126 महिला आहेत. यात यवतमाळातील 133, दिग्रस 32, नेर 21, आर्णि 4, पुसद 34, पांढरकवडा 23, उमरखेड 23, वणी 33, घाटंजी 10, दारव्हा 19, राळेगाव 4, बाभुळगाव 17, झरी जामणी 7, कळंब 12, महागाव 25 आणि इतर शहरातील 3 रुग्ण आहे.             रविवारी एकूण 4618 रिपोर्ट

रात्री 8 ते सकाळी 7 वाजेपर्यंत संपूर्ण जिल्ह्यात जमावबंदी

  Ø 15 एप्रिलपर्यंत आदेश लागू यवतमाळ, दि. 28 : 'मिशन बिगीन अगेन' अंतर्गत निर्बंधामध्ये देण्यात आलेली सुलभता व टप्पानिहाय लॉकडाऊनबाबत सुधारीत आदेश देण्यात आले आहे. त्यानुसार रात्री 8 ते सकाळी 7 या कालावधीत कलम 144 अन्वये संपूर्ण यवतमाळ शहर व जिल्ह्यातील शहरी तसेच ग्रामीण भागात जमावबंदी लागू राहील. या कालावधीत पाच पेक्षा जास्त लोकांनी एकत्र येऊ नये, असे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या आदेशात नमुद आहे. सदर आदेश 28 मार्चपासून 15 एप्रिलच्या मध्यरात्रीपर्यंत लागू राहतील. आदेशात नमुद केल्याप्रमाणे सर्व सार्वजनिक आणि कामाच्या ठिकाणी तसेच प्रवास करतांना प्रत्येक व्यक्तिने मास्क घालणे बंधनकारक राहील. सर्व प्रकारच्या सार्वजनिक स्थळी वाहतुकीच्या व कामाच्या ठिकाणी सामाजिक अंतराचे (सोशल डिस्टन्सिंग) पालन करावे. एकाच वेळी पाच पेक्षा जास्त लोकांनी एकत्र येऊ नये. या कालावधीत जास्तीत जास्त लोकांनी घरूनच काम करण्याची सुविधा देण्यात यावी. त्याकरीता कार्यालये, दुकाने, औद्योगिक क्षेत्र, वाणिज्यिक आस्थापना यांनी त्यांच्या कामाच्या वेळा निश्चित कराव्यात. सर्व प्रकारचे कार्यालये, दुकाने, आस्थापना

पाच मृत्युसह जिल्ह्यात 418 जण पॉझेटिव्ह

  Ø 392 जण कोरोनामुक्त         यवतमाळ, दि. 27 : गत 24 तासात जिल्ह्यात पाच मृत्युसह 418 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत. तसेच वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 392 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.              जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार मृत झालेल्या व्यक्तिंमध्ये यवतमाळ येथील 62 व 56 वर्षीय पुरुष, दिग्रस तालुक्यातील 65 वर्षीय पुरुष, आर्णि तालुक्यातील 59 वर्षीय पुरुष आणि माहूर (जि. नांदेड) येथील 63 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. तसेच आज (दि.27) पॉझेटिव्ह आलेल्या 418 जणांमध्ये 309 पुरुष आणि 109 महिला आहेत. यात यवतमाळातील 165, दिग्रस 70, नेर 28, आर्णि 22, पुसद 20, उमरखेड 20, वणी 16, घाटंजी 14, दारव्हा 12, मारेगाव 11, राळेगाव 9, बाभुळगाव 8, झरी जामणी 7, कळंब 5, महागाव 5, पांढरकवडा 5 आणि इतर शहरातील 1 रुग्ण आहे.              शनिवारी एकूण 4439 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 418 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 4021 जणांचे रिपोर्ट निगेट

कोरोनाबाधितांची संख्या व मृत्युदर कमी करण्याला सर्वोच्च प्राधान्य

Image
  Ø अमोल येडगे यांनी स्वीकारला जिल्हाधिकारीपदाचा कार्यभार यवतमाळ, दि. 27 : गत काही दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत तसेच मृत्युच्या संख्येत झालेली वाढ कमी करण्याला आपले सर्वोच्च प्राधान्य आहे, असे नुतन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सांगितले. यवतमाळ जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर ते जिल्हाधिकारी कार्यालयात बोलत होते. जिल्ह्यात कोव्हीड प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येईल. तसेच लसीकरण मोहीम आणखी गतिमान करण्याचे नियोजन आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन आणि प्रशासनाने सांगितलेल्या त्रिसुत्रीबाबत नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती करणे. नागरिकांनीसुध्दा नियमितपणे मास्कचा वापर करणे, गर्दी टाळणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे, हात वारंवार स्वच्छ धुणे आदी नियमांचे पालन करावे, असे आवाहनही त्यांनी केले. कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कातील जास्तीत जास्त नागरिकांचे ट्रेसिं आणि टेस्टिंग करून जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर तसेच मृत्युदर कमी करण्यावर भर देण्यात येईल. यासोबतच जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने सर्वच क्षेत्राचा सर्वांगि

सात मृत्युसह 458 जण पॉझेटिव्ह

  Ø 548 जण कोरोनामुक्त         यवतमाळ, दि. 26 : गत 24 तासात जिल्ह्यात सात मृत्युसह 458 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत. तसेच वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 548 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.              जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार मृत झालेल्या व्यक्तिंमध्ये यवतमाळ येथील 58, 90, 67, 68, 62 वर्षीय पुरुष आणि 62 आणि 68 वर्षीय महिलेचा समावेश आहे. तसेच आज (दि.26) पॉजिटिव आलेल्या 458 जणांमध्ये 312 पुरुष आणि 146 महिला आहेत. यात यवतमाळातील 178, उमरखेड 64, पुसद 57, दिग्रस 32, दारव्हा 25, बाभुळगाव 20, नेर 19, आर्णि 15, महागाव 15, पांढरकवडा 12, वणी 7, राळेगाव 5, कळंब 4, घाटंजी 3 आणि इतर शहरातील 2 रुग्ण आहे.              शुक्रवारी एकूण 4892 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 458 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 4434 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 2427 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह असून रुग्णालयात भरती 1318 आणि गृह विलगीकरणात

जिल्ह्यातील 16 रेतीघाटांचा 22 कोटींमध्ये लिलाव

  Ø 89952 ब्रास रेतीसाठा मंजूर         यवतमाळ, दि. 25 : जिल्ह्यातील 16 रेतीघाटांचा लिलाव करण्यात आला असून यासाठी सर्वोच्च बोली एकूण 22 कोटी 82 लाख 57 हजार 064 रुपये लावण्यात आली आहे. विशेष म्हणजे सन 2019 – 20 मध्ये या सर्व रेतीघाटासाठी निश्चित केलेली सरकारी रक्कम 14 कोटी 3 लाख 93 हजार रुपये होती. निश्चित केलेल्या दरापेक्षा 8 कोटी 78 लाख रुपये या माध्यमातून शासनाकडे अतिरिक्त जमा होणार आहे.             बाभुळगाव तालुक्यातील भैयापूर रेतीघाटाची सर्वोच्च बोली 87 लाख 68 हजार 500 रुपये, नागरगाव रेतीघाट 53 लाख 53 हजार 500 रुपये, आर्णि तालुक्यातील साकूर – 1 रेतीघाटासाठी 1 कोटी 25 लाख 95 हजार 555 रुपये, साकूर – 2 रेतीघाटासाठी 1 कोटी 11 लाख 87 हजार 972 रुपये, राणीधानोरा – 2 रेतीघाटासाठी 3 कोटी 1 लाख 83 हजार रुपये, राळेगाव तालुक्यातील जागजाई रेतीघाट 2 कोटी 25 लाख रुपये, रोहिणी – 2 रेतीघाटासाठी 2 कोटी 87 हजार 14 लाख 141 रुपये, घाटंजी तालुक्यातील विलायता रेतीघाट 89 लाख 5 हजार रुपये, माणूसधारी रेतीघाटासाठी 2 कोटी 3 लाख 5 हजार 555 रुपये, वणी तालुक्यातील सुर्जापूर रेतीघाट 29 लाख 50 हजार रुपये, भ

पाच मृत्युसह 439 जण पॉझेटिव्ह

  Ø 321 जण कोरोनामुक्त         यवतमाळ, दि. 25 : गत 24 तासात जिल्ह्यात पाच मृत्युसह 439 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत. तसेच वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 321 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.              जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार मृत झालेल्या व्यक्तिंमध्ये यवतमाळ येथील 80 वर्षीय पुरुष, 68 आणि 64 वर्षीय महिला, दिग्रस येथील 65 वर्षीय पुरुष आणि दारव्हा तालुक्यातील 52 वर्षीय महिलेचा समावेश आहे. तसेच आज (दि.25) पॉजिटिव आलेल्या 439 जणांमध्ये 318 पुरुष आणि 121 महिला आहेत. यात यवतमाळातील 139, दिग्रस 85, पुसद 52, उमरखेड 40, आर्णि 26, पांढरकवडा 23, नेर 15, महागाव 14, घाटंजी 12, वणी 12 बाभुळगाव 7, मारेगाव 5, दारव्हा 3, कळंब 2, झरीजामणी 2 आणि इतर शहरातील 2 रुग्ण आहे.              गुरुवारी एकूण 5324 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 439 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 4885 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 2524 ॲक्

आठ मृत्युसह 440 जण पॉझेटिव्ह

  Ø 246 जण कोरोनामुक्त        यवतमाळ, दि. 24 : गत 24 तासात जिल्ह्यात आठ मृत्युसह 440 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत. तसेच वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 246 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.             जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार मृत झालेल्या व्यक्तिंमध्ये यवतमाळ येथील 37, 70, 80 वर्षीय पुरुष आणि 67 वर्षीय महिला, दारव्हा येथील 66 वर्षीय महिला, उमरखेड येथील 78 वर्षीय महिला, किनवट (जि. नांदेड) येथील 70 वर्षीय पुरुष आणि मानोरा (जि. वाशिम) येथील 76 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. तसेच आज (दि.24) पॉजिटिव आलेल्या 440 जणांमध्ये 339 पुरुष आणि 101 महिला आहेत. यात यवतमाळातील 231, दिग्रस 35, पुसद 35, नेर 27, उमरखेड 22, बाभुळगाव 19, पांढरकवडा 14, घाटंजी 12, राळेगाव 11, दारव्हा 9, कळंब 7, महागाव 6, वणी 6, आर्णि 3 आणि झरीजामणी येथील 3 रुग्ण आहे.             बुधवारी एकूण 5188 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 440 जण नव्याने पॉझेटिव्ह आले

कारागृहातील विविध समस्यांबाबत जिल्हाधिका-यांनी घेतला आढावा

Image
                                                                     यवतमाळ, दि. 23 : जिल्हा कारागृह येथे अभिविक्षीक मंडळाच्या बैठकीत जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी कारागृह व परिसरातील सोईसुविधा तसेच कर्मचा-यांच्या निवास व्यवस्थेच्या प्रश्नांसंदर्भात आढावा घेतला. बैठकीला अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. मोईनुद्दिन, मुख्य न्यायदंडाधिकारी पी.पी. मुळे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव एम. आर. ए. शेख, कारागृह अधिक्षक किर्ती चिंतामणी, उपविभागीय अधिकारी अनिरुध्द बक्षी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, तहसीलदार कुणाल झाल्टे आदी उपस्थित होते.       यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी श्री. सिंह म्हणाले, जिल्हा कारागृहामध्ये सीसीटीव्ही सर्व्हर रुम बांधकाम करण्याचे काम प्रलंबित आहे. यासाठी निधी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सुपूर्द करण्यात आला असून अद्यापही काम पूर्णत्वास गेले नाही. त्यामुळे सदर काम येत्या आठ दिवसांत त्रृटीसह पूर्ण करण्याचे आदेश त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले. जिल्हा कारागृहामध्ये पोलिस व तुरुंग विभागाच्या आस्थापनेमधील पायाभुत सुविधा पुरविणे, संनिरीक्षण य

जिल्ह्यात 10 मृत्युसह 556 जण पॉझेटिव्ह

  Ø 286 जण कोरोनामुक्त         यवतमाळ, दि. 23 : गत 24 तासात जिल्ह्यात 10 मृत्युसह 556 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत. तसेच वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 286 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.              जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार मृत झालेल्या व्यक्तिंमध्ये यवतमाळ येथील 75, 78, 62, 71 वर्षीय पुरुष आणि 60, 65 वर्षीय महिला, बाभुळगाव तालुक्यातील 50 वर्षीय महिला, दिग्रस येथील 52 वर्षीय पुरुष, पांढरकवडा येथील 62 वर्षीय पुरुष आणि मानोरा (जि. वाशिम) येथील 65 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. तसेच आज (दि.23) पॉजिटिव आलेल्या 556 जणांमध्ये 393 पुरुष आणि 163 महिला आहेत. यात यवतमाळातील 234, राळेगाव 59, दारव्हा 53, उमरखेड 40, दिग्रस 39, पांढरकवडा 39, पुसद 29, कळंब 23, नेर 13, वणी 6, बाभुळगाव 6, घाटंजी 5, आर्णि 3, मारेगाव 2, झरीजामणी 2 आणि 3 इतर शहरातील रुग्ण आहे.              मंगळवारी एकूण 5404 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 556 जण न

जिल्ह्यातील कुमारी मातांचे रोजगाराभिमुख पुनर्वसन करा - ॲङ यशोमती ठाकूर

Image
  Ø महिला व बालभवन तसेच कोरोनाचा आढावा यवतमाळ, दि. 23 : जिल्ह्यात झरीजामणी, पांढरकवडा, मारेगाव तसेच इतर आदिवासी बहुल भागातील कुमारी मातांच्या पुनर्वसनाचा प्रश्न ब-याच वर्षांपासून प्रलंबित आहे. या महिलांना विविध योजनेतून लाभ देऊन सामाजिक, आर्थिक आणि शारीरिकदृष्ट्या सक्षम बनविण्यासाठी त्यांचे रोजगाराभिमुख पुनर्वसन करावे, अशा सुचना महिला व बालविकास मंत्री ॲङ यशोमती ठाकूर यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात महिला व बालभवन तसेच कुमारी मातांच्या पुनर्वसनासंदर्भात आढावा घेतांना त्या बोलत होत्या. यावेळी आमदार इंद्रनील नाईक, जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, पोलिस अधिक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, सहाय्यक जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल जाधव, महिला व बालविकास अधिकारी ज्योती कडू, महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक डॉ. रंजन वानखेडे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष टिकाराम कोंगरे, उपाध्यक्ष संजय देरकर, मुंबई बाजार समितीचे अध्यक्ष प्रवीण देशमुख आदी उपस्थित होते. कुमारी मातांन

मृत्युदर कमी करण्यासाठी लसीकरण आणि टेस्टिंगवर लक्ष केंद्रीत करा

Image
  Ø जिल्हाधिका-यांनी घेतला तालुकास्तरीय यंत्रणेचा आढावा यवतमाळ, दि. 22 : जिल्ह्यात गत पंधरवड्यापासून कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्युच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. विशेष म्हणजे यातील बहुतांश मृत्युचे सरासरी वय 60 वर्षांच्या वर आहे. त्यामुळे 60 वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण प्राधान्याने करून टेस्टींगवरसुध्दा लक्ष केंद्रीत करा, असे निर्देश जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातून व्हीसीद्वारे तालुकास्तरीय यंत्रणेचा आढावा घेतांना ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार व-हाडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरी पवार आदी उपस्थित होते. जिल्ह्यात सद्यस्थितीत 93 केंद्रांवर लसीकरण करण्यात येत आहे, असे सांगून जिल्हाधिकारी श्री. सिंह म्हणाले, लसीकरणाची गती अतिशय संथ आहे. प्रत्येक केंद्राला रोज किमान 100 याप्रमाणे 9300 जणांना लस देणे अपेक्षित आहे. सध्यास्थितीत लसीकरणाचा आकडा केवळ 2600 ते 2700 आहे, ही अतिशय गंभीर बाब

जिल्ह्यात 13 मृत्युसह 247 जण पॉझेटिव्ह

  Ø 305 जण कोरोनामुक्त         यवतमाळ, दि. 22 : गत 24 तासात जिल्ह्यात 13 मृत्युसह 247 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत. तसेच वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 305 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.              जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार मृत झालेल्या व्यक्तिंमध्ये यवतमाळ येथील 69, 67, 87, 36 वर्षीय पुरुष, यवतमाळ तालुक्यातील 18 वर्षीय पुरुष आणि 78 वर्षीय महिला, दिग्रस येथील 75 वर्षीय पुरुष, दारव्हा येथील 78 वर्षीय पुरुष आणि 63 वर्षीय महिला, दारव्हा तालुक्यातील 70 वर्षीय पुरुष, बाभुळगाव तालुक्यातील 52 वर्षीय पुरुष आणि 56 वर्षीय महिला, उमरखेड तालुक्यातील 84 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. तसेच पॉजिटिव आलेल्या 247 जणांमध्ये 173 पुरुष आणि 74 महिला आहेत. यात यवतमाळातील 101, पुसद 29, दिग्रस 33, बाभुळगाव 20, मारेगाव 13, घाटंजी 12, नेर 12, राळेगाव 7, दारव्हा 6, वणी 6, कळंब 3, पांढरकवडा 2, आर्णि 2 आणि 1 इतर शहरातील रुग्ण आहे.      

नऊ मृत्युसह जिल्ह्यात 526 नव्याने पॉझेटिव्ह

  Ø 314 जण कोरोनामुक्त             यवतमाळ, दि. 19 : गत 24 तासात नऊ कोरोनाबाधितांचा मृत्यु झाला असून 526 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत. तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटर येथे भरती असलेल्या 314 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार मृत झालेल्या व्यक्तिंमध्ये यवतमाळ येथील 72 वर्षीय पुरुष आणि 70, 48, 11 वर्षीय महिला, दिग्रस शहरातील 41 वर्षीय पुरुष आणि दिग्रस तालुक्यातील 75   वर्षीय पुरुष, दारव्हा येथील 55 वर्षीय महिला, पांढरकवडा येथील 52 वर्षीय महिला आणि माहूर (जि.नांदेड) येथील 55 वर्षीय महिला आहे. शुक्रवारी पॉझेटिव्ह आलेल्या 526 जणांमध्ये 375 पुरुष आणि 151 महिला आहेत. यात यवतमाळातील 249, पुसद 81, दिग्रस 97, उमरखेड 24, महागाव 22, नेर 20, मारेगाव 11, कळंब 7, पांढरकवडा 3, घाटंजी 3, बाभुळगाव 2, दारव्हा 2, वणी 2, झरीजामणी 2 आणि आर्णि येथील 1 रुग्ण आहे.              शुक्रवारी एकूण 5039 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 526 जण नव्या

खाजगी कोचिंग क्लासेसला अटी व शर्तीच्या अधिन राहून परवानगी

  यवतमाळ, दि. 19 :   जिल्ह्यातील प्रतिबंधीत क्षेत्र वगळता संपूर्ण जिल्ह्यासाठी सुधारीत सुचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत. जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातील सर्व प्रकारची शाळा, महाविद्यालय, शैक्षणिक प्रशिक्षण केंद्रे, खाजगी शिकवणी वर्ग, कोचिंग क्लासेस बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र वर्ग दहावी आणि बारावीच्या परिक्षांचे वेळापत्रक जाहीर झालेले आहे. तसेच विविध स्पर्धा परिक्षांच्या तारखासध्दा जाहीर झाल्या आहेत. त्यामुळे वर्ग दहावी आणि बारावी तसेच विविध   स्पर्धा परिक्षांचे वेळापत्रक लक्षात घेता यवतमाळ जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी विभागातील खाजगी शिकवणी वर्ग, कोचिंग क्लासेस तसेच इतर प्रशिक्षण संस्था खालील अटींच्या अधीन सुरु करण्यास परवानगी देण्यात येत आहे. खाजगी शिकवणी वर्ग, कोचिंग क्लासेस, प्रशिक्षण संस्था यांनी त्यांचे प्रशिक्षण वर्ग सुरु करतांना आसान क्षमतेच्या 25 टक्के किंवा जास्तीत जास्त 20 विद्यार्थी राहतील. तसेच दोन बॅचमध्ये अर्ध्या तासाचा अवकाश ठेवून प्रत्येक वेळी हॉल, रुमचे निर्जंतूकीकरण करणे बंधनकारक राहील. विद्यार्थ्यांच्या पालकांचे संमतीपत्र प्राप्त करून घेणे आव