वडगाव, लोहारा लसीकरण केंद्राला जिल्हाधिकारी यांची भेट

 



            यवतमाळ ३१: दिवसेंदिवस कोरोनाच्या वाढत्या रूग्ण संख्येला आळा घालण्याकरीता जास्तीत जास्त कोविड लसीकरण करणे आवश्यक आहे. जिल्हाधिकारी अमोल येडगे रुजू झाल्यानंतरच आज यवतमाळ तालुक्‍यातील वडगाव व लोहारा येथील लसीकरण केंद्राला भेट देवून लसीकरणाची पाहणी केली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकुष्ण पांचाळ, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तंरगतुषार वारे, जिल्हा आरोग्य अधिकारी हरी पवार, डॉ. सुभाष ढोले, डॉ. सुषमा खोडवे, डॉ. जया चव्हाण व सर्व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.

आजपर्यंत जवळपास ८५ हजार लोकांना कोविडची लस देण्यात आली असुन येत्या १ एप्रील पासुन ४५ वर्षावरील सर्वांना विना अट लसीकरण सुरु होणार असुन कोविड लस घेण्याचे सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी आरोग्य यंत्रनेचा व इतर महसूल यंत्रनेचा रोज आढावा घेत असून नियमित पाठपुरावा करण्यात येत आहे. संबंधीत यंत्रनेला कोरोना बाधितांचे कॉन्टेक्ट ट्सिंग करुन त्यांचा शोध घेवून चाचणी करणे कोरोना चाचणीचे प्रमाण वाढविने, कर्मचारी व दुकानदाराचे १००% लसीकरण पूर्ण करणे, दैनंदिन माहिती ऑनलाईन करणे व १०० टक्के डाटा एन्ट्री पूर्ण करणे अशा सूचना देण्यात आल्या.

सध्या ग्रामीण भागात ५५ लसीकरण केंद्र व शहरी  भागात ४० लसीकरण केंद्र सुरु असून येत्या काळात लसीकरणाचा वेग वाढविणेकरीता सर्व उपकेंद्र स्तरावर कोविड लसीकरण सुरु करण्यात येणार आहे. प्रत्येक कर्मचा-यांनी, प्रतिष्ठीत  नागरीकांनी, स्वयंसेवी संस्था, संघटना यांनी लोकांना लस घेण्याकरीता प्रवृत्त करावे, अशा सुचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या.‍ प्रतिबंधीत क्षेत्रात आय. एल. आय. व सारीचा नियमीत सर्व्हेक्षण करण्यात येवून त्यांची माहिती देण्यात यावी. होम आयसोलेशन मध्ये असलेल्या व्यक्तीनी नियमाचे तंतोतत पालन करावे. पॉझीटीव्ह आलेल्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीनी तात्काळ कोविड तपासणी करुन ऊपचार घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

0000000


Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी