आठ मृत्युसह जिल्ह्यात 352 पॉझेटिव्ह

 


Ø 204 जण कोरोनामुक्त

            यवतमाळ, दि. 16 : गत 24 तासात जिल्ह्यात आठ मृत्युसह 352 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत. तसेच वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 204 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.

            जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार मृत झालेल्या व्यक्तिंमध्ये यवतमाळ येथील 50 वर्षीय पुरुष, बाभुळगाव येथील 70 वर्षीय पुरुष, पुसद येथील 65 वर्षीय पुरुष आणि 80 वर्षीय महिला, राळेगाव येथील 86 वर्षीय महिला, माहूर (जि. नांदेड) येथील 55 व 65 वर्षीय महिला आणि मानोरा (जि. वाशिम) येथील 63 वर्षीय महिला आहे. मंगळवारी पॉझेटिव्ह आलेल्या 352 जणांमध्ये 239 पुरुष आणि 113 महिला आहेत. यात यवतमाळातील 131, पुसद 74, महागाव 43, दिग्रस 37, दारव्हा 14, उमरखेड 13, वणी 12, नेर 10, पांढरकवडा 7, झरीजामणी 6, घाटंजी 2, राळेगाव 2 आणि इतर ठिकाणचा 1 रुग्ण आहे.

            मंगळवारी एकूण 5027 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 352 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 4675 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 2994 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 22454 झाली आहे. 24 तासात 204 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 18940 आहे. तर जिल्ह्यात एकूण 520 मृत्युची नोंद आहे.

            सुरवातीपासून आतापर्यंत 200165 नमुने पाठविले असून यापैकी 194705 प्राप्त तर 5460 अप्राप्त आहेत. तसेच 172251 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जि.प. आरोग्य विभागाने कळविले आहे. 

०००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी