जिल्ह्यात 291 पॉझेटिव्ह तर 235 कोरोनामुक्त

 


Ø माहूर येथील एकाचा मृत्यु

यवतमाळ, दि. 5 : गत 24 तासात जिल्ह्यात 291 जण नव्याने पॉझेटिव्ह आले असून 235 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर नांदेड जिल्ह्यातील माहूरचे रहिवासी असलेल्या 42 वर्षीय पुरुषाचा यवतमाळ येथे कोरोनामुळे मृत्यु झाला. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 175 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार शुक्रवारी पॉझेटिव्ह आलेल्या 291 जणांमध्ये 182  पुरुष आणि 109 महिलांचा समावेश आहे. यात यवतमाळातील 138, पुसद 52, दिग्रस 38, उमरखेड 20, बाभुळगाव 12, दारव्हा 7, नेर 5, पांढरकवडा 5, महागाव 4, आर्णि 4, मारेगाव 3, कळंब 1, वणी 1 आणि इतर 1 रुग्ण आहे.

शुक्रवारी एकूण 1675 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 291 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 1384 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 1781 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 18693 झाली आहे. 24 तासात 235 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 16441 आहे. तर जिल्ह्यात एकूण 471 मृत्युची नोंद आहे.

सुरवातीपासून आतापर्यंत 169492 नमुने पाठविले असून यापैकी 168033 प्राप्त तर 1459 अप्राप्त आहेत. तसेच 149340 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जि.प. आरोग्य विभागाने कळविले आहे. 

००००००

Comments

  1. सर 235 जण कोरोना मुक्त झाल्या नंतर 175 जनांनी कोरोनावर मात केल्या नंतर त्यांना सुट्टी देण्यात आली बाकी 60 जणांना कुठं ठेवण्यात आले.🙏🙏

    ReplyDelete
  2. सर 235 जण कोरोना मुक्त झाल्या नंतर 175 जनांनी कोरोनावर मात केल्या नंतर त्यांना सुट्टी देण्यात आली बाकी 60 जणांना कुठं ठेवण्यात आले.🙏🙏

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी