Posts

Showing posts from June, 2016
2 कोटी वृक्षलागवडीचा आज शुभारंभ जिल्ह्यात एकाच दिवशी 17 लाख वृक्षारोपण *नागरीकांना सहभागाचे आवाहन यवतमाळ, दि. 30 : यवतमाळ वन आणि सामाजिक वनीकरण विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या 2 कोटी वृक्ष लागवडीचा शुभारंभ रविवारी, दिनांक 1 जुलै रोजी सकाळी 8.30 वाजता होणार आहे. पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते वडगाव ते जांब रस्तावर वृक्षारोपणाचा कार्यक्रम होईल. जिल्हाभरात एकाच दिवशी तब्बल 17 लाख वृक्ष लागवड होणार आहे. यात नागरीकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन वन आणि सामाजिक वनीकरण विभागाने केले आहे. यावेळी केंद्रिय खते व रसायन राज्यमंत्री हंसराज अहिर, गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, कै. वसंतराव नाईक शेतकरी स्वालबंन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष डॉ. आरती फुफाटे, खासदार विजय दर्डा, भावना गवळी, राजीव सातव, आमदार माणिकराव ठाकरे, हरिभाऊ राठोड, संदीप बाजोरीया, ख्वॉजा बेग, श्रीकांत देशपांडे, मनोहर नाईक, मदन येरावार, राजू तोडसाम, राजेंद्र नजरधने, डॉ. अशोक उईके, संजिव रेड्डी बोदकुरवार, नगराध्यक्ष सुभाष राय, जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण सभापती लता खादवे, जिल्हाधिकारी
महिला व बालविकासच्या योजनांसाठी अर्ज आमंत्रित यवतमाळ दि. 30 : जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागातर्फे वैयक्तिक लाभाच्या विविध योजना राबविण्यात येते. या योजनांसाठी ग्रामीण भागातील इच्छुक आणि पात्र लाभार्थ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ग्रामीण आदिवासी क्षेत्रातील वर्ग 5 ते 10 वी मध्ये शिकणाऱ्या मुलींना सायकल पुरविणे, ग्रामीण आदिवासी क्षेत्रातील मुलींना व महिलांना 90 टक्के अनुदानावर शिलाई मशिन पुरविणे, मुली-महिलांना फॅशन डिझायनिंगचे व्यावसायिक तांत्रिक प्रशिक्षण देण्यात येणार आहे. योजनेच्या लाभासाठी दिनांक 31 ऑगस्टपर्यंत जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास येथे पंचायत समिती मार्फत इच्छुकांनी अर्ज करावा, असे आवाहन महिला बाल विकासचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केले आहे. 00000
माहिती खात्यात इंटर्नशिपची संधी यवतमाळ, दि. 30 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे प्रसार माध्यमातील विद्यार्थ्यांना इंटर्नशिप करण्याची संधी उपलब्ध करुन देण्यात आली आहे.             महाराष्ट्र शासनाच्या विविध निर्णयांची, योजनांची, कार्यक्रमांची प्रसिद्धी विविध प्रसार माध्यमांद्वारे करण्याचे कार्य माहिती व जनसंपर्क महासंचालनालय करीत असते. यासाठी महासंचालनालयाच्या वृत्त शाखा, महान्यूज, प्रकाशने, प्रदर्शने, वृत्तचित्र, संशोधन, आस्थापना तसेच लेखा शाखा अशा विविध शाखा कार्यरत आहेत.             या शाखांमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी जनसंवाद, जनसंपर्क, जाहिरात, फाईन आर्टस्, दूरदर्शन कार्यक्रम निर्मिती, चित्रपट निर्मिती यातील पदवी/पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन देण्यात येत आहे. या इंटर्नशिप कार्यक्रमाचा कालावधी 3 महिने एवढा असेल. यशस्वीरित्या इंटर्नशिप पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना महासंचालनालयातर्फे प्रमाणपत्रे देण्यात येतील.  या इंटर्नशिप उपक्रमासाठी विद्यावेतन लागू नाही. पुर्वानुभव असलेल्या व उच्च शैक्षणिक पात्रता धारण करणाऱ्या उमेदवारांना प्राधा
रेती घाट परिसरात प्रतिबंधात्मक आदेश             यवतमाळ , दि. 30 : जिल्ह्यातील रेतीघाटांवरील रेतीचे अवैध उत्खनन व वाहतुकीवर प्रतिबंध घालण्यासाठी जिल्ह्यातील 70 या घाटांवर प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहे.             जिल्ह्यातील पैनगंगा , वर्धा , बेंबळा , अरूणावती , निर्गुडा , वाघाडी , खुनी , विदर्भ इत्यादी नदीनाला पात्रांमध्ये लिलाव झाले नसलेले 37 आणि लिलाव झालेल्या 70 रेतीघाटातून विना परवानगीने यांत्रिक साधनांचा वापर करून अवैध रेती उत्खनन आणि वाहतुकीवर बंदी घालण्यात आली आहे. मात्र या घाटांवरील अवैध रेती उत्खननाचे  प्रकार निदर्शनास येत आहे. यावर  प्रतिबंध घालण्यासाठी जिल्ह्यातील सर्व नदी , नालेपात्रात ट्रक , ट्रक्टर , टिप्पर व तत्सम वाहनांना रेती , वाळूचे अवैध उत्खनन , वाहतूक करणे यावर प्रतिबंध घालण्यात आला आहे.             जिल्हा दंडाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 च्या कलम 144 अन्वये प्राप्त अधिकारानुसार या ठिकाणी विनापरवानगी वाहनास प्रवेश करण्यास बंदी घातली असून तसे आदेश जारी केले आहे. या घाटांवरून अवैध उत्खनन , वाहतूक व साठवणूक होणार न
विशेष लेख वृक्षलागवडीसाठी सरसावले हात * स्वयंसेवी संस्था करणार उ त्स्फू र्त वृक्षारोपण * कुणी करणार श्रमदान , तर कुणी लावणार ट्री गार्ड * वृक्षारोपणासाठी ग्रामस्तरावर जनजागृती झपाट्याने होत असलेले नागरीकरण , औद्योगिकरण आदी कारणांमुळे वनाखालील क्षेत्र कमी होत आहे . राज्याच्या एकूण भूभागापैकी सध्या केवळ 20 टक्केच वनक्षेत्र उरलेले असताना हे प्रमाण 33 टक्क्यापर्यंत नेण्यासाठी राज्य शासन प्रयत्न करीत आहे . या प्रयत्नांचा एक भाग म्हणून यावर्षी दोन कोटी वृक्षलागवड करण्यात येत आहे . या मोहिमेसाठी जिल्ह्यात वृत्रपत्रातून जन जागृती करण्यासोबतच चित्ररथ , गावोगावी ग्रामसभा घेऊन थेट नागरीकांनाच वृक्ष लागवड आणि संगोपणाचे महत्त्व समजावून सांगण्यात येत आहे . वन विभागाच्या या प्रयत्नांनी  नागरीकांमधूनही सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे . जिल्ह्याचे वनाखालील प्रमाण पाहता तेही 20 टक्केच एवढेच आहे . त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वृक्ष लावगडीची मोहिम हाती घेणे गरजेचे आहे . यात राज्य शासनाने पुढाकार घेऊन येत्या 1 जुलै रोजी दोन कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प केला आहे . या वृक्षारोपणात नागरीकांनी सक्रिय सह
लाभार्थ्यांनी सहमतीपत्र जमा करावे * तहसिल कार्यालयात संपर्क साधावा यवतमाळ, दि. 29 : केंद्र शासनाच्या इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय विकलांग निवृत्तीवेतन योजनांच्या लाभार्थ्यांनी आपले सहमतीपत्र 20 जून 2016 ते 8 जुलै 2016 या कालावधीमध्ये संबंधित तहसिल कार्यालयात संपर्क साधून सादर करावे, असे आवाहन यवतमाळचे जिल्हादंडाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी केले आहे. केंद्र शासनाकडून राष्ट्रीय सामाजिक अर्थसहाय्याच्या तीन योजना राबविण्यात येतात. जिल्ह्यात इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजनेचे 40 हजार 624 लाभार्थी, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजनेचे एक हजार 83 लाभार्थी, तर इंदिरा गांधी राष्ट्रीय विकलांग निवृत्तीवेतन योजनेचे 233 लाभार्थी योजनेचा लाभ घेत आहेत. योजनेच्या लाभार्थ्यांकडून त्यांचा आधार क्रमांक आणि भ्रमणध्वनी क्रमांक या योजनेचा लाभासाठी सहमतीपत्र भरून देण्यात येणार आहे. यासाठी संबंधित तहसिलमध्ये लाभार्थ्यांसाठी संजय गांधी योजनेच्या तहसिलदारामार्फत विशे
पोलिस स्टेशनमध्ये नागरिकांच्या तक्रारी नोंदवून घ्याव्यात * जिल्हाधिकऱ्यांचे निर्देश यवतमाळ, दि. 29 : जिल्ह्यातील शहर व तालुक्यातील नागरिकांच्या विविध तक्रारी असतात. या तक्रारी करण्यासाठी ते पोलिस स्टेशनमध्ये जातात. तथापि अनेक प्रकरणांमध्ये त्यांच्या तक्रारी दाखल करून घेतल्या जात नाहीत. त्यामुळे नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतो, पर्यायाने असे नागरिक जिल्हा दंडाधिकारी यांचेकडे तक्रार दाखल करण्याकरीता येतात. त्यामुळे संबंधित पोलिस स्टेशनमधील अधिकाऱ्यांनी नागरीकांच्या तक्रारी नोंदवाव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी केले आहे. कोणत्याही पोलिस स्टेशनमधील पोलिस स्टेशन अधिकारी नागरिकांच्या तक्रारी दाखल करून घेत नसतील, तर अशा प्रकरणाबाबतची माहिती संबंधितांनी त्यांच्या तालुक्याशी निगडीत तालुका दंडाधिकारी यांच्याकडे सादर करावी. अशा प्रकरणांमध्ये तालुका दंडाधिकारी हे पोलिस स्टेशन अधिकारी यांच्याशी तक्रार दाखल करून घेण्याबाबत चर्चा करून प्रकरणांमध्ये कार्यवाही करतील. ज्या नागरिकांच्या तक्रारी पोलिस सटोशन अधिकारी दाखल करून घेत नाही, अशा नागरिकांनी तालुका दंडाधिकार
जल साठ्याजवळील संभाव्य दुर्घटना टाळा *जिल्हाधिकारी यांचे आवाहन यवतमाळ, दि. 29 : जलयुक्त शिवार योजनेंतर्गत जिल्ह्यात झालेल्या कामांच्या ठिकाणी विशेषत: पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या जलसाठ्याच्या पाण्यात बुडून होणाऱ्या संभाव्य दुर्धटना टाळण्याकरीता विशेष दक्षता घेण्यात यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिं यानी केले आहे. राज्य शासनाने दुष्काळावर मात करणे आणि अल्पवृष्टीतही पाणीटंचाईवर उपयायोजना म्हणून जलयुक्त शिवार योजना हाती घेतली आहे. या योजनेंतर्गत जिल्ह्यात तलाव, सिमेंट, नाले, नाला सरळीकरण, बंधारे, गाळ काढणे आदींची कामे करण्यात आली आहे. जलयुक्त शिवार योजनेंतर्गत निर्माण झालेले जलसाठ्यांच्या ठिकाणी शालेय मुले, लहान बालके व जनावरे पाण्यात अपघाताने बुडण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशा ठिकाणी पाण्याचा खोलीचा अंदाज येत नसल्याने अपघात किंवा जिवीत हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या ठिकाणी दुर्घटना टाळण्याकरीता नागरिकांनी दक्षता घेण्यात यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.  00000
Image
दिग्रस आगारास पालकमंत्र्यांची भेट यवतमाळ, दि. 29 : पालकमंत्री संजय राठोड यांनी दिग्रस आगारास भेट दिली. दिग्रस बसस्थानक आणि आगाराची पाहणी दरम्यान त्यांनी एसटी कर्मचारी आणि बसस्थानकावर उपस्थितीत प्रवाश्यांसोबत संवाद साधला. तसेच त्यांच्या अडीअडचणी, समस्या जाणून घेतल्या. प्रवाशांच्या समस्या, अडीअडचणी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्यासमोर मांडू, तसेच लोकसहभाग आणि सामाजिक संस्थांच्या सहकार्याने आगार परिसराचे सौदर्यीकरण करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. पालकमंत्री श्री. राठोड म्हणाले, महामंडळापुढे खासगीकरणाचे मोठे आवाहन आहे. महामंडळाला या स्पर्धेत टिकवून ठेवण्याची   मोठी जबाबदारी कर्मचाऱ्यांवर आहे. स्पर्धेत टिकवून ठेवण्याची महामंडळाची प्रतिमा जिव्हाळ्याची राहिल, यासाठी प्रत्येक कर्मचाऱ्यांनी सातत्याने प्रयत्न करण्याची गरज आहे. परिवनह मंत्र्यांच्या प्रयत्नातून महामंडळाचे आधुनिकीकरण करण्यासाठी विविध योजना आखल्या जात आहे. भविष्यात शिवनरी आणि शिवशाही लक्‍झरी बस सेवा संपूर्ण राज्यात कार्यान्वित करणे, तसेच एअर पोर्टच्या धर्तीवर एसटी पोर्ट ही संकल्पना देखिल राबविण्यात येणार आहे. दिग्रस ब
जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू यवतमाळ, दि. 29 :   जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी जिल्ह्यात मुंबई पो लि स अधिनियमातील तरतुदी नुसार प्रतिबंध आदेश लागू करण्यात आ ले आहे. या आदेशानुसार जिल्ह्यात 27 जून ते 11 जुलै पर्यंत जमावास बंदी राहणार आहे. या आदेशान्वये जिल्ह्यात जमाव करणे, शस्त्र बाळगणे, माणसांचे एकत्रिकरण व पुतळ्याचे प्रदर्शन करणे आदी प्रकारांवर बंदी घालण्यात आली आहे. या कलमाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुध्द मुंबई पो लि स कायदा 1951 च्या कलम 37 (1) (3) नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे जिल्हा दंडाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी कळविले आहे. 00000
सोमवारी लोकशाही दिन यवतमाळ, दि. 29 : जुलै महिन्याच्या पहिल्या सोमवारी दि. 4 जुलै रोजी सकाळी 10 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे लोकशाही दिन आयोजित करण्यात आला आहे. तक्रारदारांनी सकाळी 10 वाजता आपले अर्ज दाखल करावेत, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.  00000000
अण्णासाहेब पाटील महामंडळाची बिज भांडवल योजना यवतमाळ, दि. 29 : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळातर्फे प्रवर्गातील बेरोजगार उमेदवारांसाठी बिज भांडवल योजना राबविण्यात येते. त्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ज्या प्रवर्गातील बेरोजगार उमेदवारांना कर्ज उपलब्ध करुन देण्यासाठी स्वतंत्र महामंडळ नाही, अशा आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील बेरोजगारांना या महामंडळातर्फे बिज भांडवल योजनेअंतर्गत कर्ज उपलब्ध करुन दिले जाते. योजनेंतर्गत 5 लाख रूपयांपर्यंत गुंतवणूकीची प्रकल्प मर्यादा असलेल्या व्यवसायास 60 टक्के बँक वाटा, बँक मंजूर रकमेच्या 35 टक्के महामंडळाची मार्जिन मनी आणि 5 टक्के लाभार्थी हिस्सा आहे. महामंडळाच्या रक्कमेवर 4 टक्के व्याज आकारल्या जाते. योजनेसाठी उमेदवार राज्याचा रहिवासी आणि 18 ते 45 वयोगटातील असावा, कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 55 हजार, ग्रामीण भागात 40 हजाराच्या आत असावे, कुटुंबातील कोणीही बँक थकबाकीदार नसावा, अशा अटी आहेत. अर्जासोबत उत्पन्न, शाळा सोडल्याचा दाखला, रेशन कार्ड, सेवायोजन ओळखपत्र, स्वत:चे प्रतिज्ञापत्र व सातबारा, व्हॅल्युएशन, जमानतदाराचे प्रतिज