महागाव, झरी जामणी तालुक्यातील रास्तभाव दुकानासाठी अर्ज आमंत्रित
यवतमाळ, दि. 28 : जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाच्यावतीने महागाव तालुक्यातील फुलसावंगी आणि महागाव तसेच झरी जामणी तालुक्यातील माथार्जून येथे रास्तभाव दुकानासाठी पात्र स्वयंसहायता गटाकडून अर्ज मागविण्यात येत आहे. यासाठी 6 जुलै पूर्वी अर्ज करावे लागतील.
रास्तभाव दुकाने स्वयंसहायता गटाना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठीचा अर्ज संबंधित तहसिल कार्यालयामधून 100 रूपयांना उपलब्ध असणार आहे. तसेच सबंधित गावातीलच स्वयंसहायता गटच यासाठी पात्र ठरणार आहेत. महिलांचा गट उपलब्ध नसल्यास पुरूष गटाचा विचार करण्यात येणार आहे. परतफेडीची क्षमता 80 टक्के असणे आवश्यक आहे. विहित नमुन्यातील अर्जासोबत गटाची नोंदणी प्रमाणपत्र, व्यवसासाच्या जागेच्या मालकी, भाडेपत्राची कागदपत्रे, बँकेकडून घेतलेल्या कर्जाची परतफेडची प्रमाणपत्र, तपासणी केलेल्या संस्थेचा अहवाल आदी माहितीसह अर्ज सादर करावे, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी