दिग्रस आगारास पालकमंत्र्यांची भेट
यवतमाळ, दि. 29 : पालकमंत्री संजय राठोड यांनी दिग्रस आगारास भेट दिली. दिग्रस बसस्थानक आणि आगाराची पाहणी दरम्यान त्यांनी एसटी कर्मचारी आणि बसस्थानकावर उपस्थितीत प्रवाश्यांसोबत संवाद साधला. तसेच त्यांच्या अडीअडचणी, समस्या जाणून घेतल्या. प्रवाशांच्या समस्या, अडीअडचणी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्यासमोर मांडू, तसेच लोकसहभाग आणि सामाजिक संस्थांच्या सहकार्याने आगार परिसराचे सौदर्यीकरण करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
पालकमंत्री श्री. राठोड म्हणाले, महामंडळापुढे खासगीकरणाचे मोठे आवाहन आहे. महामंडळाला या स्पर्धेत टिकवून ठेवण्याची  मोठी जबाबदारी कर्मचाऱ्यांवर आहे. स्पर्धेत टिकवून ठेवण्याची महामंडळाची प्रतिमा जिव्हाळ्याची राहिल, यासाठी प्रत्येक कर्मचाऱ्यांनी सातत्याने प्रयत्न करण्याची गरज आहे. परिवनह मंत्र्यांच्या प्रयत्नातून महामंडळाचे आधुनिकीकरण करण्यासाठी विविध योजना आखल्या जात आहे. भविष्यात शिवनरी आणि शिवशाही लक्‍झरी बस सेवा संपूर्ण राज्यात कार्यान्वित करणे, तसेच एअर पोर्टच्या धर्तीवर एसटी पोर्ट ही संकल्पना देखिल राबविण्यात येणार आहे. दिग्रस बसस्थानक आणि आगार परिसराला ऐतिहासिक महत्त्व असून या आगारास आदर्श करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे, असे आवाहन केले.
यावेळी उपविभागीय अधिकारी नितीन इंगोले, तहसिलदार किशोर बागडे, विभाग नियंत्रक अशोक वरठे, आगार व्यवस्थापक प्रताप राठोड उपस्थित होते.

0000000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी