मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते
वसंतराव नाईक शेतकरी मॉल व प्रशिक्षण केंद्राचे भूमिपूजन
यवतमाळ, दि. 5 : मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्‍या हस्‍ते बसस्‍थानक चौकातील कृषी विभागाच्‍या वतीने उभारण्‍यात येत असलेल्‍या स्‍व. वसंतराव नाईक शेतकरी स्‍वावलंबन केंद्र (मॉल) तसेच शेतकऱ्यांच्‍या प्रशिक्षण केंद्राचे भूमिपूजन करण्‍यात आले.
यावेळी महसूल राज्‍यमंत्री तथा पालकमंत्री संजय राठोड, गृह राज्‍यमंत्री रणजित पाटील, कै. वसंतराव नाईक शेती  स्‍वावलंबन मिशनचे अध्‍यक्ष किशोर तिवारी, आमदार मदन येरावार,  आमदार अशोक उईक, आमदार राजू तोडसाम, आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, आमदार राजेंद्र नजरधने, जिल्‍हा परिषदेच्‍या अध्‍यक्ष डॉ. आरती फुफाटे, विभागीय आयुक्‍त ज्ञानेश्‍वर राजुरकर, जिल्‍हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह, मुख्‍य कार्यकारी अधिकारी दीपककुमार सिंघला उपस्थित होते.
            जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्‍या शेतमाला बाजारपेठ उपलब्‍ध व्‍हावी, यासाठी जिल्‍हा परिषदेच्‍या कृषी विभागाच्‍या वतीने कै. वसंतराव नाईक शेतकरी स्‍वावलंबन केंद्र (मॉल) तसेच प्रशिक्षण केंद्र उभारण्‍यात येणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना आपला शेतमाल विक्रीसाठी हक्‍काची जागा मिळणार असल्‍याचे मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस म्‍हणाले. यावेळी याठिकाणी अद्यायावत इमारत उभारण्‍याचे सुचविले. यासाठी पाच कोटी रूपये नियोजन विभागाकडून मंजूर करण्‍यात आले असून  नाविन्यपूर्ण योजनेतून हे केंद्र उभारण्‍यात येणार आहे. यामध्‍ये शेतक-यांसाठी ३६ गाळे असून शेतक-यांच्‍या प्रशिक्षणसाठी कार्यक्रम व प्रशिक्षणसाठी दोन हॉल उभारण्‍यात येणार आहे.
            प्राथमिक अंदाजपत्रक आणि आराखडा तयार करण्यासाठी पाच कोटी रूपयांचा प्रस्ताव मान्यतेसाठी पाठविण्यात आला आहे. या इमारतीमध्ये तळमजल्यावरील 760 चौरस मिटरचे बांधकाम करण्यात येणार आहे. यात 36 गाळे, लिफ्ट, खुले वाहनतळ आदींचाही समावेश असणार आहे.

0000



Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी