निवासी शाळांमध्ये तासिका तत्वावर सहाय्यक शिक्षकांची पदभरती
यवतमाळ, दि. 25 : यवतमाळ जिल्ह्यात अनुसूचित जातीच्या मुला, मुलींच्या सात निवासी शाळा कार्यरत आहेत. या निवासी शाळेकरीता तासिका तत्वावर सहाय्यक शिक्षकाची पदे 6 महिन्यांच्या कालावधीसाठी घड्याळी तासिकेनुसार संबंधित ठिकाणी मानधन तत्वावर नेमणूक करावयाची आहे.
अनुसूचित जाती मुलांची शासकीय निवासी शाळा, परसोडा-वणी, मुलांची निवासी शाळा नेर, मुलांची निवासी शाळा ईसापूर-दिग्रस, मुलींची निवासी शाळा महागाव, मुलांची निवासी शाळा आर्णी, मुलींची निवासी शाळा मरसुळ-उमरखेड, मुलींची निवासी शाळा आसारपेंड-पुसद या ठिकाणी अहर्ताधारक सहाय्यक शिक्षकांची आवश्यकता आहे. बी. एस. सी., बी. एड (विज्ञान व गणित) बी. ए., बी. एड. (मराठी), एचएससी, डी. एड. इंग्रजी व मराठी माध्यम, बी. एस.सी. गणित व विज्ञान माध्यम, ही सहाय्यक शिक्षकांची पदे तात्पुरत्या स्वरूपात घड्याळी तासिकेनुसार मानधन तत्वावर भरावयाची आहेत. यासाठी इच्छुक उमेदवारांनी आपल्या शैक्षणिक कागदपत्रासह सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यवतमाळ यांच्या कार्यालयात दि. 30 जून पर्यंत अर्ज सादर करावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त विजय साळवे यांनी केले आहे.

0000000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी