2 जुलै रोजी नगर परिषदांचे आरक्षण
*प्राधिकृत अधिकारी नियुक्त
यवतमाळ, दि. 24 : यवतमाळ जिल्ह्यातील सात नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी प्रभागाचे आरक्षण शनिवारी, दि. 2 जुलै रोजी संबंधित नगर पालिकेच्या सभागृहात आरक्षण काढण्यात येणार आहे. त्यासाठी प्राधिकृत अधिकारी नियुक्त करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील यवतमाळ, वणी, पुसद, उमरखेड, दिग्रस , दारव्हा, घाटंजी आणि आर्णी नगर पालिकेच्या होणाऱ्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीकरीता प्रभागाचे आरक्षण निश्चित करण्यासाठी ही सोडत सकाळी  11 वाजता संबंधित नगरपरिषदांच्या सभागृहात काढण्यात येईल. या सोडतीमध्ये अनुसुचित जाती महिला, अनुसुचित जमाती महिला, नागरीकांचा मागासवर्गातील महिला आणि सर्वसाधारण महिला प्रभागासाठी आरक्षण निश्चित करण्यात येईल. या सोडतीकरीता खालील अधिकारी यांना प्राधिकृत करण्यात आले आहे.
यवतमाळ नगर परिषदेसाठी वर्ग उपविभागीय अधिकारी, यवतमाळ, वणी नगर परिषदेसाठी उपविभागीय अधिकारी वणी, पुसद नगर परिषदेसाठी उपविभागीय अधिकारी पुसद, उमरखेड नगर परिषदेसाठी उपविभागीय अधिकारी उमरखेड, दिग्रस नगर परिषदेसाठी उपजिल्हाधिकारी भुसंपादन रस्ते प्रकल्प, दारव्हा नगर परिषदेसाठी उपविभागीय अधिकारी दारव्हा, घाटंजी नगर परिषदेसाठी उपविभागीय अधिकारी केळापूर, आर्णी नगर परिषदेसाठी उपजिल्हाधिकारी महसूल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी