केबल ऑपरेटर निवडीसाठी शनिवारी अमरावतीमध्ये सोडत

यवतमाळ, दि. 29 : राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात केबल जोडणीच्या संदर्भात विनाक्रम (रॅन्डम) सर्वेक्षण करण्याकरीता केबल ऑपरेटर आणि बहुविध यंत्रणा परिचालकाची निवड शनिवार, दि. 2 मे रोजी अमरावती येथील विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृह क्रमांक 1 येथे दुपारी 12.30 वाजता काढण्यात येणार आहे.
प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शनिवारी सोडत काढून तीन केबल ऑपरेटर व एक बहुविध यंत्रणा परिचालकाची निवड करण्यात येणार आहे. सोडतीकरीता जिल्ह्यातील सर्व केबल ऑपरेटर आणि बहुविध यंत्रणा परिचालकांनी उपस्थित रहावे, असे अमरावती विभागाचे आयुक्त यांनी कळविले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी