जल साठ्याजवळील संभाव्य दुर्घटना टाळा
*जिल्हाधिकारी यांचे आवाहन
यवतमाळ, दि. 29 : जलयुक्त शिवार योजनेंतर्गत जिल्ह्यात झालेल्या कामांच्या ठिकाणी विशेषत: पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या जलसाठ्याच्या पाण्यात बुडून होणाऱ्या संभाव्य दुर्धटना टाळण्याकरीता विशेष दक्षता घेण्यात यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिं यानी केले आहे.
राज्य शासनाने दुष्काळावर मात करणे आणि अल्पवृष्टीतही पाणीटंचाईवर उपयायोजना म्हणून जलयुक्त शिवार योजना हाती घेतली आहे. या योजनेंतर्गत जिल्ह्यात तलाव, सिमेंट, नाले, नाला सरळीकरण, बंधारे, गाळ काढणे आदींची कामे करण्यात आली आहे. जलयुक्त शिवार योजनेंतर्गत निर्माण झालेले जलसाठ्यांच्या ठिकाणी शालेय मुले, लहान बालके व जनावरे पाण्यात अपघाताने बुडण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशा ठिकाणी पाण्याचा खोलीचा अंदाज येत नसल्याने अपघात किंवा जिवीत हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या ठिकाणी दुर्घटना टाळण्याकरीता नागरिकांनी दक्षता घेण्यात यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.
 00000


Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी