एड्स प्रतिबंध कार्यक्रमांचा आढावा
यवतमाळ, दि. 28 : जिल्हा एड्स प्रतिबंधक व नियंत्रण समितीची बैठक बुधवारी, दि. 22 जून रोजी जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.
सभेमध्ये जिल्हा एड्स प्रतिबंधक व नियंत्रण समितीच्या पथक सदस्यांनी जिल्ह्यातील एड्स प्रतिबंधक कार्यक्रमाचा मागील एक वर्षाचा आढावा सादर केला. एप्रिल 2015 ते मार्च 2016 या कालावधीत एचआयव्ही तपासणी झालेल्या एकूण रूग्णांपैकी 122 महिला रूग्ण असल्याचे निदर्शनास आणून दिले. तसेच 49 वरील वयोगटात एचआयव्ही बाधितांची संख्या अधिक आहे. ही बाब गांभिर्याने घेऊन जिल्हाधिकारी यांनी सर्व सेवा सुविधा देणाऱ्या संस्था आणि केंद्रांनी जिल्ह्यातील सर्व पातळीवर मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्याची सुचना केली. यावेळी जिल्ह्यातील कार्यरत विविध सेवा देणाऱ्या केंद्रांच्या कार्य आणि प्रगतीची माहिती देण्यात आली. एचआयव्ही संसर्गित, प्रभावित, अनाथ व असुरक्षित जोखीमीतील बालकांसाठी सामाजिक संरक्षण प्रकल्प, एआरटी केंद्र, सीटीसी याबाबत चर्चा करण्यात आली.
अनाथ व असुरक्षित बालकांना विविध सामाजिक संरक्षण योजनासोबत जोडण्याच्या सूचना देण्यात आल्या. बाल संगोपन योजनेचा निधी उपलब्धतेसाठी पाठपुरावा करण्याच्या सूचना जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांना जिल्हाधिकारी यांनी केल्या. एआरटी केंद्रातर्फे देण्यात येणाऱ्या सेवा-सुविधा याबाबत माहिती घेतली. औषधांचा तुटवडा जाणवल्यास त्याबाबची माहिती देण्यात यावी, तसेच याबाबत समितीला पत्र लिहिण्याच्या सूचना यावेळी जिल्हाधिकारी यांनी केल्या.

00000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी