शहिदांच्या आठवणी जपणे आपले कर्तव्य
- मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस
पोलिस मुख्यालयात हुतात्मा स्मारकाचे भूमिपूजन
यवतमाळ दि.5 : दहशतवादी हल्ले किंवा अतिरेक्यांशी लढतांना वीर जवान शौर्य दाखवित असतात. अनेकदा अशाप्रसंगी लढतांना जवानांना वीरमरण प्राप्त होते. या शहिदांच्या स्मृती कायमस्वरूपी जतन करणे आपले कर्तव्य आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
यवतमाळ येथील पोलीस मुख्यालयाच्या आवारात 10 लक्ष रूपये खर्च करून हुतात्मा स्मारक बांधण्यात येणार आहे. या स्मारकाचे भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी वीर जवानांप्रती आपल्या भावना व्यक्त करतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते.
कार्यक्रमाला पालकमंत्री संजय राठोड यांच्यासह परिवहन मंत्री दिवाकर रावते, जलसंपदा
मंत्री गिरीश महाजन, गृहराज्यमंत्री डॉ.रणजित पाटील, वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी, खा.भावना गवळी, आ.मदन येरावार, आ.संजीवरेड्डी बोदकुरवार, आ.राजू तोडसाम, आ.डॉ.अशोक ऊईके, आ.राजू नजरधने, विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर,  विशेष पोलीस महानिरीक्षक संजीवकुमार सिंघल, जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार सिंघला, पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार  सिंह आदी उपस्थित होते.
          शहिदांच्या स्मृती जपण्यासाठी हुतात्मा स्मारक उभारण्यात  येत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. 1960 पासून  राज्यात  पोलीस स्मृतीदिन पाळला जातो असे सांगून विविध हल्यात अतिरेक्याशी लढतांना वीर जवानांना आहुती द्यावी लागली. आपले कर्तव्य पार  पाडतांना जवान शौर्य दाखवित असते. अशा शूर विरांचे स्मरण होणे आवश्यक आहे. शूर विरांच्या कार्यातून सचोटीचे  कार्य व कर्तव्यातील चोखपणा आपण अंगीकारला पाहिजे, असे मुख्यमंत्री म्हणाले. हुतात्मा स्मारकासाठी जिल्हा नियोजन समितीने निधी उपलब्ध करून दिल्याबददल मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले.
          प्रारंभी हुतात्मा स्मारकाच्या जागेचे पूजन करून व कुदळ मारून मुख्यमंत्र्यांसह मान्यवरांनी विधीवत भूमिपूजन केले. शहिद विरांसह जिल्ह्यातील विविध घटनेत शहिद झालेल्या जवानांना मुख्यमंत्र्यांनी  मानवंदना अर्पण केली.
00000000





Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी